"DIALOGUE WITH SELF ’स्व’शी संवाद "-PAINTING
"DIALOGUE WITH SELF " ’ स्व’शी संवाद Dialogue With Self " ’ स्व’शी संवाद " ऑइल ऑन कॅन्व्हास-१६" X १७" - मुग्धा देशपांडे आत्ममग्न नयिकेचा एकाच वेळी अंतरमनाशी आणि बाह्य मनाशी(जगाशी) चाललेला संवाद असं काहीस याच स्वरूप जाणवत. साल २०००च्या सुरवातीच्या दशकातील ही कलाकृती आता कांहीशी धूसरअणि अधिक गडद झाली आहे चित्राच्या सुक्ष्म अवलोकनासाठी मी ती फोटोशॉप करून थोडी उजळ करून घेतली आहे. आत्ममग्न नयिका ही सुंदर आहे आणि तिने चित्र चौकटीची उजवी बाजू पूर्णपणे व्यापली आहे. लावण्यवती सारखे लांब सडक -केस (घनदाट केशसंभार) , निमुळती उंच मान , सरळ नासिका , विशाल भाल आणि मोठे डोळे , तर गच्च मिटून घेतलेले ओठ व हट्टी हनवटी यातून नयिकेच दृढ.मनस्वी , स्वतंत्र व्यक्तीमत्व दृगोच्चर होत. स्वत:च्याच विचारात , स्वप्नात ती चंद्रप्रकाशात तळ्याकाठी मग्न आहे. चित्र चौकटीच्या डाव्या बाजुच्या वरच्या कोपर्यात फ़िकटस चंद्राच पाण्यातील प्रतिबिंब आहे.तळ्याकाठी मंद आल्हाददायक झुळूक आहे , तिच्यामुळे पाण्यावर हल्केसे तरंग उमटले आहेत आणि चंद्राचे प्रतिबिंबही तसच त