Posts

Showing posts from May, 2021

:Hunter,Clementine (Black Grandma Moses )-हन्टर, क्लेमेन्टाइन

Image
अमेरिकन कृष्णवर्णीय - नेव्ह आर्ट कला प्रवाहातील महत्त्वाची चित्रकर्ती - ग्रॅंड - मा - मोझेस - क्लेमेंनटाइन हंटर Hunter,Clementine (Black Grandma Moses ) गुगलवरून  साभार नेव्ह आर्ट - रांगड्या सहज प्रवृत्तीन , खुलेपणाने उत्स्फ़ुर्तपणे कोणत्याही माध्यमाच्या वापरातून केलेल्या संरचना आणि कल्पना विलास , निर्व्याज , प्रामाणिक , भाबडी , सहज , निर्मळ आणि नि : संकोचपणे चित्रकलेच्या क्षेत्रातील पायाभूत नियमापासून मुक्त , मनाला भावणारी - कांहीशी बाल - चित्रकलेच्या जवळ जाणारी . चित्रकलेच्या औपचारिक प्रशिक्षणाने बाधित न झालेली नेव्ह आर्ट , लोककले प्रमाणे मूळातून एखादी संस्कृती वा परंपरा यांतून पुढे आली आहे अस नाही . २०व्या शतकाच्यापूर्वी दृश्यकले / चित्रकले चे औपचारिक वा व्यावसायिक शिक्षण न घेतलेल्या - नसलेल्या व्यक्तींची कला ( चित्रकारांची कला / चित्रकलेला ) नेव्ह आर्ट म्हणून संबोधल जात असे . या शैलीतील सौंदर्याच अनुकरण करण्याचा मोह प्रशिक्षित चित्रकाराना न पडता तर नवलच ! रूढ कलेचे सर्व नियम झुगारून नेव्ह आर्ट मधील कलाकृतीत विरूप पृष्टभागावर गडद गर्द रंगातील असमान विविधाकारांच्य