:Hunter,Clementine (Black Grandma Moses )-हन्टर, क्लेमेन्टाइन


अमेरिकन कृष्णवर्णीय -नेव्ह आर्ट कला प्रवाहातील महत्त्वाची चित्रकर्ती -

ग्रॅंड-मा-मोझेस- क्लेमेंनटाइन हंटर

Hunter,Clementine (Black Grandma Moses )

गुगलवरून  साभार

नेव्ह आर्ट - रांगड्या सहज प्रवृत्तीन,खुलेपणाने उत्स्फ़ुर्तपणे कोणत्याही माध्यमाच्या वापरातून केलेल्या संरचना आणि कल्पना विलास, निर्व्याज,प्रामाणिक,भाबडी,सहज,निर्मळ आणि नि:संकोचपणे चित्रकलेच्या क्षेत्रातील पायाभूत नियमापासून मुक्त,मनाला भावणारी -कांहीशी बाल-चित्रकलेच्या जवळ जाणारी.चित्रकलेच्या औपचारिक प्रशिक्षणाने बाधित न झालेली नेव्ह आर्ट,लोककले प्रमाणे मूळातून एखादी संस्कृती वा परंपरा यांतून पुढे आली आहे अस नाही.२०व्या शतकाच्यापूर्वी दृश्यकले/चित्रकले चे औपचारिक वा व्यावसायिक शिक्षण न घेतलेल्या-नसलेल्या व्यक्तींची कला ( चित्रकारांची कला/चित्रकलेला ) नेव्ह आर्ट म्हणून संबोधल जात असे.या शैलीतील सौंदर्याच अनुकरण करण्याचा मोह प्रशिक्षित चित्रकाराना न पडता तर नवलच!

रूढ कलेचे सर्व नियम झुगारून नेव्ह आर्ट मधील कलाकृतीत विरूप पृष्टभागावर गडद गर्द रंगातील असमान विविधाकारांच्या भौ़मित्तिक तपशीलवार ठळक रचननांची मांडणी अग्रभागावर किंवा पार्श्वतलावर कोठेही केलेली असते.

कलेच/चित्रकारीच कोणतच औपचारिक /व्यावसायिक शिक्षण वा कला जगताशी दुरान्वयानेही फ़ारसा संबंध नसलेल्या या कलाकारांच्या कामात त्यंतिक मानसिक क्षोभ,अपारंपारिक कल्पनांचा विलास आणि रेखीव स्वप्नील आभासी जगात घेतलेली भरारी याच चित्रण आढळत.

कलेच्या इतिहासाच्या सुरूवातीपासून आजपर्यंत या कला प्रकारातील चित्रकाम -कला कधी समोर आली -लक्षात आली ते ज्ञात नाही.अजाणता -निर्व्याजपणे चितारलेल्या या कलाकृतींच आजही सन्मानान स्वागत होतं.२० व्या शतकात जेव्हा कांही मोजक्या प्रतिथयश कलांकारानी नेव्ह आर्ट आमच स्फूर्ती स्थान आहे अस उघडपणे मान्य केल तेव्हां या,कलाप्रकाराला स्वतंत्र ओळख मिळाली.

कांहींशा विलंबाने कलाजगता समोर आलेल्या नेव्ह आर्ट ला आता कलाजगतात स्वतंत्र शैली -प्रकार म्हणून मान्यता मिळाली असून या शैलीचा अविष्कार आता जगभर विविध कलासंग्रहातून सादर होत आहे तर दृश्यकलाकर्मी आणि स्पष्टीकरण चित्ररचनाकार(illustrators ) यानाही त्यात रस उत्पन्न झाला आहे

****

चित्रकलेचे कोणतही शास्त्रशुद्ध शिक्षण नसलेल्या क्लेमेन्टाइन अशिक्षित होत्या,पण त्यांची चित्रे म्हणजे त्या काळच्या शेतमळा आणि आजुबाजूच्या रोजमर्राच्या, दररोजच्या जीवनाच्या कथांच पुस्तक आहे. काळाच्या ओघात नष्ट होत चाललेल्या,अखेरची घर घर लागलेल्या शेतमळ्यावरील जीवनाच,तेथील रोजच्या प्रसंगांच ऐतिहासिक चित्र-लेखांकन -दस्त ऐवजीकरणाचे श्रेय क्लेमेटाइन हंटर यांच्या कडे जाते.

त्यांची चित्रे क्वचितच १८ x २४ इंचा पेक्षा मोठी सत आणि पॄष्ठ्भागही असमान असे.१९४० ते १९६० या काळातील त्यांची चित्रे उत्कॄष्ट समजली जातात.ज्याना त्या माहित आहेत आणि ज्याना त्यांची चित्रे आवडतात त्यांनाच त्यांतील आदिम सौंदर्य जाणवते,भाबडेपणा भावतो,मोहकता भुरळ पाडते .या चित्राना अमेरिकन कला इतिहासात एकमेव मानाच स्थान मिळाल आहे.त्यांच चित्र ,शैलीमूळेक्लेमेन्टाइन हन्टरहेक्लेमेन्टाइन हन्टरम्हणूनच आपली ओळख प्रस्थापित करतं.

."देवच माझ्या डोक्यात ही चित्रे भरतो आणि त्याला हवी तशी माझ्याकडून काढून घेतो." अस त्या म्हणत.


अमेरिकन कॄष्णवर्णीय(निग्रो)असलेल्या क्लेमेन्टाइन यांचा जन्म Hidden Hill -Cloutierville, Louisiana, जवळील एका कपाशीच्या शेतमळ्यात 1887 साली झाला.ही जागा म्हणजे खडतर,कष्टमय,आधुनिक जगाचे वारे लागलेली जगापासून दूर अगदी आड्वळणाची होती.थोड़्याच दिवसात या कुटुंबानं येथून आपला मुक्काम उत्तरेकडे केन नदीच्या परिसरात हलवला.येथील Natchitoches जवळील Melrose Plantation या शेतमळ्यात काम करायाला सुरूवात केली.क्लेमेन्टाइनना शाळेचा भंयकर कंटाळा होता,त्यामूळे जेमतेम १० दिवस शाळेत काढल्यावर त्यानी शाळेला कायमचा रामराम ठोकला परिणामी त्या आयुष्यभर निरक्षर राहिल्या.

त्यांच्या चित्रांवरील त्यांची नाममुद्रा -स्वाक्षरीही मजेशीर आहे सीच्या आरशातील पतिमेला जोडलेला एच [ )h ]अशी


१९१४ सालि त्यांचे पहिले पती Charlie Dupree यांचे निधन झाल्यावर, क्लेमेन्टाइन यानी Emmanuel Hunter यांच्याशी १९२४ मधे लग्न केल.क्लेमेन्टाइन याना पहिल्या पतीपासून दोन दुसऱ्या पतीपासून पांच मुले झाली पैकी दोन जन्मताच गेली.पती-पत्नीनी मेलरोज मळ्यात कित्येक वर्षे काम केले.

केन नदीच्या परिसरातील शेतमळे आणि येथील कुटुंबेअफ़्रिकन आणि क्रेओलसंस्कॄतीची केन्द्रे होती. केन नदीच्या परिसरातील शेतीचे साम्राज्य आणि प्रमूख केन्द्र म्हणून ओळखला जाणारामेलरोजहा एक प्रचंड मोठा शेतमळा होता. येथे हजारो एकरात कापुस,मका,तंबाखू पिकवला जाइ.तर गोठ़्यात असंख्य गुरे ढोरे होती.

१८९८ मधे मेलरोज ची मालकी John Hampton आणि Carmelita Garritt Henry उर्फ़ मिस कॅमी यांच्याकडे आली.मिस कॅमी याना केन नदीच्या परीसरातील कला आणि कारागीरी जतन करायची होती.क्लेमेन्टाइनांच्या काळात मेलरोज शेतमळा म्हणजे कलाकारांची एक छोटीसी वसाहत झाली होती. यामूळे काही वर्षातच मेलरोज मळा हा साह्यितिक,लेखक, कलाकार आणि कलेच्या आस्वादकांच एक प्रमूख स्थान बनल.येथे लेखक,साह्यितिक, चित्रकार,कला समीक्षक,चित्रसंग्रहाक आणि कलाप्रेमी,अशांचा नेहमी राबता असे. येथे William Faulkner, John Steinbeck या सारख्या नामवंताचा सहवास Louisiana च्या लेखक,कलाकाराना Alberta Kinsey, Caroline Dorman ,Harnett Kane याना मिळत असे.

मळ्यातील या बड्या घराची सर्व जबाबदारी हंटर जोडप्यावर होती.क्लेमेन्टाइन मुलांसाठी बाहुल्या तयार करत असत,कपडे शिवत, टोपल्याही विणत पण त्यांच्या सॄजनतेला वाव मिळे तो पडदे आणि चमकदार,झळळीत रंगातील सुंदर रजया विणताना.

Francois Mignon या मळ्याच्या व्यवस्थापकाला क्लेमेन्टाइन यांच्यातील सूप्त गुणांची जाणीव झाली.त्यानी त्यांच्यातील कलागूण ओळखले. १९४० च्या अखेर मेलरोजला भेट द्यायला आलेल्या चित्रकारांचे अर्धवट वापरलेले काही रंग साहित्य तसेच तेथे राहिले होते.मिगनॉन यानी क्लेमेन्टाइनना ते रंगवापरून चित्र काढायला-रंगवायला संगितले.अशा तऱ्हेने वयाच्या ५४ व्या वर्षी क्लेमेन्टाइन यानी पहिल्यांदा हातात कुंचला धरला. या दिवसापासून क्लेमेन्टाइन यानी चित्रे रंगवण्याचा सपाटा लावला आणि ४० वर्षात जवळजवळ -५००० चित्रे काढली.

एक एक चित्र म्हणजे त्या काळातील शेतावरच आणि आजुबाजूच जीवन क्लेमेन्टाइनना जस दिसल त्याची प्रामाणिक सरळ भाबडी कथा आहे. मिगनॉन त्यांच्या करीता थोडाफ़ार रंग पुरवत.त्याना नेहमीच कॅनव्हास मिळत असेच असे नाही.त्यामुळे हाताला येइल त्या आणि सह्जी उपलब्ध असणाऱ्या वस्तू जसे, फेकून दिलेल्या खिडकीच्या जुन्या पदद्या,बाटल्या, खोक्यांचे कार्डबोर्ड,वाळके दोडके,दूधी भोपळे यासारख्या वस्तूंवर त्या चित्रे रंगवीत.शेतातील कामाला जाताना त्या आपल्या मुलाना बरोबार नेत असत.१९२८ ला त्यांच्या कडे वाड़्यातील स्वयपाक, बाग काम आणि कपडे धूणे हे घरकाम आले.त्या कपडे धूवून,इस्त्री करायला घरी घेवून जात.अधू बनलेल्या नवऱ्याचे देखभाल आणि घरातील काम आटोपून त्याना चित्रे काढायला वेळ- सवड मिळे ती रात्री १२ च्या नंतर.त्यांची सारी चित्रे आहेत ती स्मरणातून काढलेली.आणि त्यांच्या चित्रांचे विषयकापूस वेचणी,फ़ळे उतरविणे,कपडे धूणे,नामकरण (बाप्टिस्मा),अंतयात्रा या सारखे असत---.


मेलरोजला येणारे पाहूणे त्यांची चित्रे २५ -४० सेंट ला विकत घेत.त्यांच्या चाहत्यांचा वर्ग वाढत चालला. या लोकानी त्यांची चित्रे प्रदर्शनातून मांडायला सूरूवात केली.१९४९ च्या न्यू ऑरलिन्स मधीलआर्टऍंड क्राफ़्टशोमधील चित्रांमूळे समीक्षकांचे त्यांच्या कडे लक्ष्य गेले या स्वयं-शिक्षित चित्रकाराबद्दल त्यानी उद्गार काढले " या प्रदर्शनाचे यश म्हणजेक्लेमेन्टाइन हंटरया केन नदीच्या परीसरात आड बाजूला रहाणाऱ्या सरळ साध्या आदिम खऱ्या भाबड़्या लोककलाकाराचा शोध होय.त्यांच्या चित्रात रचनेवरील प्रभुत्व आणि रंगसंगतीची बहार दिसते" लूक मासिकाने जून १९५३ अंकात त्यांच्यावर लेख प्रसिद्ध केला आणि त्यांचे नाव देशभर झाले.काही कलासमीक्षकानी त्याना ''the black Grandma Moses " असे नामानिधान दिले.१९७० अखेर खाजगी आणि सार्वजनीक संग्रहालातून हंटर यांच्यी खूप चित्रे जमा झाली होती.१९८० नंतर कीत्येक फ़िरत्या प्रदर्शनातून त्यांची चित्रे मांडली गेली. Delgado Museum -the New Orleans Museum of Art.मधे एकल प्रदर्शन करणारी पहिली कॄष्णवर्णीय अमेरिकन म्हणजे क्लेमेन्ताइन हंटर होय.अमेरिकेचे अध्यक्ष जीमी कार्टर यानी त्याना सन्मानिय पाहूणे म्हणून व्हाइट हॉउस वर आमंत्रीत केले होते.Northwestern State University ने त्यांचा सन्माननीय ऑनररी " डॉक्टरेट ऑफ़ फ़ाइन आर्ट्स" ची पदवी देऊन गौरव केला होता.

अस असल तरी त्याना प्रारंभिच्या काळात कॄष्णवर्णीय म्हणून आलेला दाहक अनुभव म्हणजे इतरगोरेसामान्यजन संग्रहालयात असताना चित्रकारालाच-हंटरनाच प्रवेश नव्हता.त्यांच्या एका चाहत्याने-मित्राने सुट्टीच्या दिवशी मागच्या दाराने आत नेवून त्याना प्रदर्शन दाखवले होते.

फ़क्त २५-४० सेंटला विकली जाणारी चित्रे आता रसिक हजारो डॉलर देउन खरेदी करत होते. इतकी प्रसिद्धी मिळून ही त्या या भागातच रहात होत्या.केन नदीच्या काठावरील भाड़्याची खोली सोडून त्यानी एक ट्रेलर विकत घेतला होता.वयाची शंभरी गाठ्लेल्या क्लेमेन्टाइन हंटर यांचे चित्रे रंगवणे अखेर पर्यंत चालू होते.ज्या मिगनॉन यानी त्याना चित्रे काढायल प्रोत्साहन दिले,उद्यूक्त केल त्यांच्या कबरी शेजारीच क्लेमेन्टाइन यानाजान, १९८८ ला मॄत्यू नंतर चिर विश्रांती देण्यात आली.

कित्येक खाजगी आणि प्रतिष्ठीत संग्रहा्लयात त्यांची मूळ चित्रे पहावयाला मिळतात.त्यांच्या चित्रांची सद़्बीकडून आन्तरराष्ट्रीय लिलावात बोली लावली जाते. अमेरिकेतील श्रेष्ठ लोकलाकार म्हणून मान्यता मिळालेल्या क्लेमेन्टाइन हंटर यांचे नाव त्यांच्या मॄत्यू नंतरही सतत चर्चेत असते.सर्व प्रतिष्ठीत नियतकालीकातून त्यांचा फोटो चित्रे याना ठळक प्रसिध्दी दिली गेली. इतके नाव,प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळूनही क्लेमेन्टाइन हंटर अतिशय नम्र होत्या." देवच माझ्या डोक्यात ही चित्रे भरतो आणि त्याला हवी तशी माझ्याकडून काढून घेतो." अस त्या म्हणत.त्यांच्या कामाची सिंहावलोकनी प्रदर्शने भरवली जातात डीसे.२०००-जाने.२००१ मधे असे एक प्रदर्शन आयोजीत केल गेले होते. अलिकडे ऑक्टो २००७ ला Roger Ogden Museum,New Orleans येथील प्रदर्शनाच्या वेळी तेथे क्लेमेन्टाइन हंटर शैक्षणिक केन्द्र सूरू करण्यात आले..

नेव्ह आर्ट या कला प्रवाहातील एक महत्वाची चित्रकार हंटर- ग्रांड मा मोझॆस आजही चर्चेत असतात आणि त्यांच्या कलेचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करणारे लेख प्रसिद्ध होत असतात.आजही त्यांच्या चित्रांना मागणी आहे.


जयंत लीलावती रघुनाथ






 



Comments

Popular posts from this blog

DESHPANDE DATTAMANDIR-KAGAL देशपांडे दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

MODERN ART -THOUGHT-FEATURES AND COMMENTARY-नव वा आधुनिककला –विचार ,वैशिष्टे आणि भाष्य

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 3