Posts

Showing posts from July, 2021

VICTIM -ALWAYS-IN DROUGHT -IN PROSPERITY-काल चा दुष्काळाचा बळी आता सुकाळाचा बळी

Image
काल चा दुष्काळाचा बळी   आता सुकाळाचा बळी !   विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला देश भारत; राज्य महाराष्ट्र –सुदूर- मराठवाड्यातलं एका टोकाच आंध्रच्या हद्दी जवळच खेडं.या गावात . काळी भोर जमीन लांबच लांब पसरलेले त्यांचे पट्टे –अधुन मधून खुणेच्या दगडासारखी झाड. पाणी आल तर सोन उगवेल ,ऊनच ऊन अन सार सुनं.     या वर्षी अमाप पाणी पडल.सगळ कस गारेगार.बघलं ति थ हिरव रान . नजर पोचेपर्यंत. तुस्त तुर,टम्म कापुस, गच्च हायब्रीड,मूग , मधेच भूईमूगाचे वेल ,सूर्यफ़ूल . शोभादर्शकात डोकावल तर दिसेल अस सार दृष्य; श्रावण सरी नंतर उन्हात तकाकणारं ! – हायब्रीड भरलेला – कपाशी बोंड फ़ूटून पांढरलेली,सूर्यफुल काळ वं डायला लागलेले,शेंगांचे वेल सुकायला लागलेत. अशी -! पंधरा दिवसावर   सुगी ठेपलेली.पावसानं पण चांगला उतार दिलेला.   पिकल्या रानाचा गर्द वास;घुसमटून टाकणारा घमघमाट -शहरी माणसाना गुदमरायला होइल इतकी स्वच्छ हवा –असा सारा माहोल प्रसन्न –प्रफ़ुल्लित.       अन -! त्यातच दसरा-दिवाळी लौकर आलेली. वर्षाचा सण तोंडावर आलेला-? गेली ३-४ वर्ष पावसान जस ओढून धरल तस सावकारनी हात ढिला करायला सुरवात क