VICTIM -ALWAYS-IN DROUGHT -IN PROSPERITY-काल चा दुष्काळाचा बळी आता सुकाळाचा बळी
काल चा दुष्काळाचा बळी
आता सुकाळाचा बळी !
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला देश भारत; राज्य
महाराष्ट्र –सुदूर- मराठवाड्यातलं एका टोकाच आंध्रच्या हद्दी जवळच खेडं.या गावात .
काळी
भोर जमीन लांबच लांब पसरलेले त्यांचे पट्टे –अधुन मधून खुणेच्या दगडासारखी झाड.
पाणी
आल तर सोन उगवेल ,ऊनच ऊन अन सार सुनं.
तुस्त
तुर,टम्म कापुस, गच्च हायब्रीड,मूग, मधेच भूईमूगाचे वेल ,सूर्यफ़ूल . शोभादर्शकात
डोकावल तर दिसेल अस सार दृष्य; श्रावण सरी नंतर उन्हात तकाकणारं !
–
हायब्रीड भरलेला – कपाशी बोंड फ़ूटून पांढरलेली,सूर्यफुल काळवंडायला लागलेले,शेंगांचे वेल सुकायला लागलेत.
अशी
-! पंधरा दिवसावर सुगी ठेपलेली.पावसानं पण
चांगला उतार दिलेला.
पिकल्या
रानाचा गर्द वास;घुसमटून टाकणारा घमघमाट -शहरी माणसाना गुदमरायला होइल इतकी स्वच्छ
हवा –असा सारा माहोल प्रसन्न –प्रफ़ुल्लित.
अन
-! त्यातच दसरा-दिवाळी लौकर आलेली. वर्षाचा सण तोंडावर आलेला-?
गेली
३-४ वर्ष पावसान जस ओढून धरल तस सावकारनी हात ढिला करायला सुरवात केली.सवाई,दिडकी पर्यंत
उचल करायची लोकांची तयारी म्हणजे चालून आलेली पर्वणीच.
निम्म
रान पिकल ,निम्म वाळ्ल
–वाळल जीतराबान खाल,पिकल सावकारन खाल्लं.
आता हाता तोंडाशी घास आलेला आणि वर्षाचा सण - दिवाळी – अशी समोर .--!
पिकल तर तिपट देणाऱ्या जमीनीत पीक कस तर तरारून उठलय .१५-२०दिवसात
हातात दुपट्टीन पैसा येणार,पण आता काय ?
पिकल तर तिपट देणाऱ्या जमीनीत पीक कस तर तरारून उठलय .१५-२०दिवसात हातात दुपट्टीन पैसा येणार,पण आता काय ?
दिवाळी
अशी मधेच आल्यान सुकाळान जणू सरत्या दु:खाची कळ जिरून गेलेली.
--
आणि वसुलिचाही हंगामच.
ऊभ्या
पिकाची बोली ,एक रकमी एकदम खरेदी .दोन एकरातील हायब्रीड रू.५०००/- रोख उचल तर कापणी नंतर ८५-ते९० रुपये
क्वींटल हिशोब –त्यात काटा,कर,गाडी भाडं आणि अर्थातच देव-देवूळ टक्का आलाच .पण आता
सणाला पैसे तर हातात आलेत !.
फ़क्त
१५ दिवसासाठी .१५ दिवसात ज्वारी खूडून, मळून, वाळावून एकाधिकारी केंद्रावर घातली तर भाव होता
क्वींटल ला रू.१२०/ च्या आस पास.या वर्षी उतारा पडला एकरी ३० क्वींटल – कमी जास्त धरल
तरी सरासरी २५ क्वींटल
म्हणजे
एका एकराच्या ज्वारीचे होतात २५*१२० =३०००.दोन एकराचे ६००० /- कड्ब्याचा हिशोब सोडून.
१५
दिवसासाठी १०००/- व्याज . ५००० ला १००० व्याज
१५ दिवसाला तर महिन्याला २००० व वर्षाला २४०००/-
हा
हिशोब. ४८०% टक्क्या पेक्षा जास्त व्याज देऊन
आमच्या शेतकरी बंधू ची दिवाळी.१५-२० दिवस थांबवत नांही.५-५ वर्ष दुष्काळात काढतो पण
महिनाभर दम निघत नाही. मग फ़ावत दुसऱ्या सधन शेतकऱ्याचं-सावकारांचं.
काल
चा दुष्काळाचा बळी आता सुकाळाचा बळी !
वर दिलेला हिशोब समजावून सांगून वर हे सांगितलं की बाबानो आमचीही
दिवाळी आहे.मलाही पगार महिना संपल्यावर मिळणार,आम्हीही साधीच दिवाळी करणार आहोत.या
वर्षी दिवाळी साधी करा,पुढच्या वर्षी आपोआपच जोरात होइल पण येरे माझ्या मागल्या !
जयंत लीलावती रघुनाथ
Comments
Post a Comment