Posts

Showing posts from September, 2021

INCLUSIVE EDUCATION सर्व समावेशी एकात्म शिक्षण

INCLUSIVE EDUCATION सर्व समावेशी एकात्म शिक्षण Introduction : to be followed by more articles on the subject सर्व समावेशी एकात्म शिक्षणाचा विचार मांडताना त्याची सुयोग्य आणि फ़लदायी अंमलबजावणी करत असताना युनेस्कोच्या अभ्यास गटानी नोंदवलेल्या अडचणीं, निरीक्षणे ,अधोरेखीत केलेली क्षेत्रे , आणि या समस्यां वर मात करण्यासाठी सूचवलेले काही मुद्दे ,उपाय, यांचा गोषवारा खाली थोडक्यात मांडला आहे. 2000 सालापासून जगभरात सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षाणाच्या प्रयत्नानां नंतरही,शाळेपासून- प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांची संख्या लक्षणीय ,सुमारे 7.20 कोटी आहे.त्यात मुली 50 % पेक्षा जास्त आणि 10 मुलांपैकी 7 मुले ही सहारा ( अफ़्रिका ),दक्षिण व मध्य आशिया या भागातील आहेत. शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून च हे दुरावलेपण या मुलांच्या नशिबी येत त्याला कारण त्यांचे दारिद्र व कित्येक समाजात अजूनही तीव्रतेन अस्तित्वात असलेले वंशभेद,वर्ण भेद जातीव्यवस्था ई.मुळे आलेल समाजाच्या परिघावरील एकारलेपण . खेड्यांत सुदूर आत वसलेल्या वाड्या –पाड्यातील, वन –जंगलातील जाती-जमाती ची मुल