INCLUSIVE EDUCATION सर्व समावेशी एकात्म शिक्षण


INCLUSIVE EDUCATION सर्व समावेशी एकात्म शिक्षण

Introduction :
to be followed by more articles on the subject


सर्व समावेशी एकात्म शिक्षणाचा विचार मांडताना त्याची सुयोग्य आणि फ़लदायी अंमलबजावणी करत असताना युनेस्कोच्या अभ्यास गटानी नोंदवलेल्या अडचणीं, निरीक्षणे ,अधोरेखीत केलेली क्षेत्रे , आणि या समस्यां वर मात करण्यासाठी सूचवलेले काही मुद्दे ,उपाय, यांचा गोषवारा खाली थोडक्यात मांडला आहे. 2000 सालापासून जगभरात सुरू असलेल्या प्राथमिक शिक्षाणाच्या प्रयत्नानां नंतरही,शाळेपासून- प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांची संख्या लक्षणीय ,सुमारे 7.20 कोटी आहे.त्यात मुली 50 % पेक्षा जास्त आणि 10 मुलांपैकी 7 मुले ही सहारा ( अफ़्रिका ),दक्षिण व मध्य आशिया या भागातील आहेत. शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून च हे दुरावलेपण या मुलांच्या नशिबी येत त्याला कारण त्यांचे दारिद्र व कित्येक समाजात अजूनही तीव्रतेन अस्तित्वात असलेले वंशभेद,वर्ण भेद जातीव्यवस्था ई.मुळे आलेल समाजाच्या परिघावरील एकारलेपण . खेड्यांत सुदूर आत वसलेल्या वाड्या –पाड्यातील, वन –जंगलातील जाती-जमाती ची मुले एकीकडे, तर शहरातल्या झोपडपट्टी – वस्तीतील मुले एकीकडे,विकलांग मुलांची आबाळ-शिक्षणापासूनची फ़ारकत हे तर ढळढळीत उदाहरण आहे. शाळेत न जाणऱ्य़ा –शिक्षणापासून तुटलेल्या मुलांत 1/3 मुले अपंग आहेत. आदिवासी,भटके आणि विमुक्त जनजाती व भाषिक अल्प संख्यांक यां गटातील मुले व एच.आय.व्ही-एड्स बाधीत मुले यांच शिकण्याशी असलेले नाते अतिशय कमकुवत आणि नाजूक आहे ,ते केव्हाही तुटण्याचा धोका आहे . नैसर्गिक आपत्ती –महापुर,भूकंप,तीव्र दुष्काळ आणि मानव निर्मित्त आपत्ती - वांशिक दंगली,असंतोष,राजकीय उठाव,सशस्त्र बंड ,रक्तरंजीत क्रांती ,जागतीकरण –मोठ मोठे आण्विक वा विद्युत प्रकल्प,धरणे ई.सारखे विकासाच्या नावाने सुरू असलेले कार्यक्रम आदिनी विस्थापीत झालेल्या जन जाती,लोकसमुह यांची मुले . धार्मिक उन्माद व पुरातत्त्ववादी हिंसक चळवळी, आतंकवाद –जहाल हिंसाचाराचा पुरस्कार व सद्द स्थितित अस्तिवात असलेली सत्ता खिळखिळी करुन उलथवण्याचे, राज्यसत्ता काबिज करण्याचे प्रयत्न यात गुरफ़टलेल्या संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर मुलां/मुलीं ची भर्ती केली जाते. या साऱ्या राजकीय साठमारीत या मुलांच बालपण करपून जात.अत्यंत क्लेश कारक अनुभवातून गेलेली मुले व विषेत:किषोरावस्थेत लैंगीक छळाचे बळी पडलेली अशी दू:स्वप्ननात हरवलेली मुलं व मुली. सर्वसमावेशी शिक्षणां समोर असलेलेल खर आव्हान म्हणजे वर उल्लेख केलेल्या मुलांची प्राथमिक शिक्षणाशी नाळ जोडण हे होय. संयुक्त राष्ट्र महासंघाच्या 1948 च्या मानवधिकार घोषणापत्रातील –कलम 26 मधे प्रत्येकाचा शिक्षणाचा अधिकार अंतर्भूत केला आहे म्हणजे पर्यायाने सर्व समावेशी शिक्षणाचं मूळतत्व यात अनुस्युत आहेच.महासंघाच्या विद्यमाने त्या नंतर वेळोवेळी झालेल्या राष्ट्रां राष्ट्रां तील सांमंजस्य करारांत व प्रस्तुत केलेल्या निवेदनातून,मार्गदर्शक पत्रकातून सर्व समावेशी शिक्षणाच्या मूळतत्वांचा पुनरोच्चार केला गेला आहे .विषेशत्वाने पुढील तीनांचा उल्लेख करावा लागेल अ)1960 च्या युनोस्कोच्या अधिवेशनात शिक्षणात केल्या जाणऱ्या भेदाभेदावर –पंगती प्रपंचावर निरीक्षण नोंदवल आहे .त्यावर टिपण्णी करताना सर्व राष्ट्राना सूचीत केल आहे की प्रत्येक राष्ट्रांच कर्तव्य आहे की शिक्षणापासून वंचित रहाणाऱ्याना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत. आ) 1966 च्या जागतीक आर्थिक,सामाजिक व सांस्कृतिक अधिकारां च्या अधिवेशनात सर्वांना शिक्षणाचा अधिकार याचं ठाम समर्थन असून , सक्तीचे नि:शुल्क प्राथमिक शिक्षणाच्या तत्त्वाचा विचार प्राधान्याने मांडला आहे . बालहक्क परिषद प्रस्तुत पथदर्शी पत्रक ज्यात , मानवाधिकारां चा सर्वांगाने पुन:विचारा बरोबरीने ,भेदाभेद परोक्ततता हा बालकांचा मूलभूत हक्क आहे हे मान्य करून ; मुलांच्या बाबतीत भेदाभेद केला जाणार नाही याचा उच्चार आहे . यात शिक्षाणाची उद्दिष्टे ठरविताना शिक्षणार्थी ला केंद्रस्थानी ठेऊनच ती निश्चित करण्याच्या बांधिलकीचा स्पष्ट उल्लेख आहे. परिणामत: शिक्षणशास्त्र ,शिक्षणाचा गाभा व शाळा व्यवस्थापन याचा पुनर्विचार करण्याची आवशकता निर्माण झाली आहे. .

Comments

Popular posts from this blog

DESHPANDE DATTAMANDIR-KAGAL देशपांडे दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

MODERN ART -THOUGHT-FEATURES AND COMMENTARY-नव वा आधुनिककला –विचार ,वैशिष्टे आणि भाष्य

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 3