Posts

Showing posts from March, 2022

THE QEEN AND THE REBELS ’दी क्वीन ऍंड दी रीबेल्स’

  THE QEEN AND THE REBELS ’ दी क्वीन ऍंड दी रीबेल्स’ मूळ इटालियन नाटक लेखक : - उगे बते ( Ugo Betti) उगे बते ( 1892-1953 ) या इटालियन नाटककाराचे हे नाटक , त्यांच्या २७ नाटकांपैकी एक उत्तम नाटक समजले जाते . पक्या धार्मिक विचारांचे , निराशावादी आणि नैतिकता , अपराध व क्षमा या मूल्यांचा पाठपुरावा करणारे बते रोमन हायकोर्टा त न्यायाधीश होते . कॅथॉलिक ख्रिश्चन तत्वज्ञानाचा त्याच्यांवर जबर पगडा आहे . आपल्या लिखाणातून ते माणसाची , देवाची उपेक्षा करण्याची घातक सवय आणि त्याचे अधःपतन यावर भाष्य करतात ; एका नाट्काच्या प्रस्तावनेत ते म्हणतात ’ दैव - देव - नशिब आपल अंतिम आयुष्य घडवत असत . आपल्या चलन वलनाच - जगण्याच तंत्र - रचना ही एका सततच्या हलत्या यंत्राचा भाग आहे , आपणाला त्याच्या स्पनंदनाचा - तरंगांचा अस्पष्टासा - अंधुकसा ध्वनी ऐकू येतो , आणि कदाचित क्षणभर का होइना   आपणाला आशा करायला वाव   आहे की   गोठ्वणाऱ्या एकटेपणाची भावना ही    कधी   कधी आपल्या बुद्धीला आलेला बुरसटपणामुळे आली असेल ., आशा करूयात की काही वेळा एवढ्ही पुरेस असेल की   गर्द गडद अंधारातील उजेडाची तिरिप आम्हाला दिसू दिली ज