THE QEEN AND THE REBELS ’दी क्वीन ऍंड दी रीबेल्स’

 THE QEEN AND THE REBELS

दी क्वीन ऍंड दी रीबेल्स’ मूळ इटालियन नाटक लेखक: -उगे बते (Ugo Betti)

उगे बते (1892-1953 ) या इटालियन नाटककाराचे हे नाटक, त्यांच्या २७ नाटकांपैकी एक उत्तम नाटक समजले जाते. पक्या धार्मिक विचारांचे, निराशावादी आणि नैतिकता ,अपराध व क्षमा या मूल्यांचा पाठपुरावा करणारे बते रोमन हायकोर्टात न्यायाधीश होते. कॅथॉलिक ख्रिश्चन तत्वज्ञानाचा त्याच्यांवर जबर पगडा आहे.

आपल्या लिखाणातून ते माणसाची, देवाची उपेक्षा करण्याची घातक सवय आणि त्याचे अधःपतन यावर भाष्य करतात;

एका नाट्काच्या प्रस्तावनेत ते म्हणतात

दैव -देव -नशिब आपल अंतिम आयुष्य घडवत असत .

आपल्या चलन वलनाच- जगण्याच तंत्र -रचना ही एका सततच्या हलत्या यंत्राचा भाग आहे,आपणाला त्याच्या स्पनंदनाचा - तरंगांचा अस्पष्टासा-अंधुकसा ध्वनी ऐकू येतो,आणि कदाचित क्षणभर का होइना  आपणाला आशा करायला वाव  आहे की  गोठ्वणाऱ्या एकटेपणाची भावना ही   कधी  कधी आपल्या बुद्धीला आलेला बुरसटपणामुळे आली असेल.,आशा करूयात की काही वेळा एवढ्ही पुरेस असेल की  गर्द गडद अंधारातील उजेडाची तिरिप आम्हाला दिसू दिली जाइल,,कदाचित हेही पुरेस आहे की आपणाला आपल्यावर लादलेल्या या जगण्याक्डॆ - अयुष्याकडे थोड्या कणवेन  पाहू दिल जाइल. "

 

’असणे आणि असे असावेसे वाटणे’ -’वास्तव आणि आभासी वास्तव ’(हवे असे वाटणारे वास्तव)या द्वैताची त्याना असलेल्या जाणीवेतून त्यांच नाट्य आकाराला येत आणि चांगले - वाइट,, प्रेम- द्वेष, कोमलता- हिंसा यांच्या अविभाज्य गुंफणींची त्यांची समज पक्की आहे. आपणाला भारावून टाकणारा-आकर्षित करणारा त्यांच्या नाट्य संहितेतील भाग म्हणजे ,त्यांचा सततचा पण नगवसलेल्या शोधाच, ’म्हणजेच " आपण कस जगतो आणि कस जगायला हव यातील अघोरी विसंगतीच  मनाला शक्य होइल तस स्पष्टिकरण देण्यचा ,त्यांचा प्रयास "याच.

बतें’च्या नाटकातील पात्रांच्या कृतींची -वागण्याची तार्किक कार्य कारण भावानी संगती लावण्याचा प्रयत्न करू नये , ती पात्रे ते मान्यच करणार नाहीत कारण  माणसाच्या कृतीत-वागण्यात,अंतरमनातील  प्रेरणांमुळे  विसंगती असते. हे बते  जाणून आहेत.

कांहीशा पारंपारिक विचार सरणीच्या  ’बतें’ नी ” न्याय म्हणजे नक्की काय ?"'What is Justice ?'.विचारत; कल्पित आणि विचार करण्याला प्रवृत्त करणार कथना च्या संयोजनाचा प्रयत्न आपल्या नाटकातून केला.

 

पण हे सर्व करताना त्यांची नाटकाच्या संहितेवरची पकड, तंत्रावरची हुकूमत, पात्रांचे स्वभाव रेखाटन, भाषेचे सामर्थ्य ,नाट्यवस्तुला कोणत्याही क्षणी प्रचाराच्या, उपदेशाच्या पातळीवर आणत नाही. नैतिकतेचा सूर आळविणाऱ्या  या नाटककाराचे नाव ’ल्युइ पिरांदलो’(Pirandello)या प्रसिद्ध इटालियन नाटककाराच्या बरोबरीने घेतले जाते; अभिजात ग्रीक शोकांतीकांच्या  इतक्या ताकदीच त्यांच लिखाण असूनही त्याना तेवढी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही.

 

आपल्या नाट्य संहितेचा -नाटकाच्या गर्भित अर्थ सारांशाने का होइना पण निसंदिग्ध्पणे  प्रतिकात्मक रूपात व्यक्त होइल असेच शीर्षक आपल्या नाटकाला देण्यावर त्यांचा कटाक्ष होता . एका नाटाकाच्या सुयोग्य शीर्षकाकरिता ते लिहून झाल्यावर सुयोग्य  नावाकरिता त्यानी चार वर्षे घेतली.

 

बतें’नी त्यांच्या डॉक्टरेटकरिता सादर केलेल्या प्रंबंधात जरी युद्ध हे एक धोरण म्हणून स्विकारण्यावर  कृतक-वरवरची माफ़ी मगितली असली तरी  लोकशाही व्यवस्थेवर मात्र त्यात त्यानी  जोरदार हल्ला केला होता.तथापी युद्ध आघाडीवरील तोफ़खान्यानाचा अधिकारी आणि नंतर जर्मन तुरूंगातील कैदी या अनुभवतात्तून त्याना परोपकार आणि सहनशक्ती या गुणांची मह्ती पटली.ते फ़ासिवादा ( Fascism) चे कट्टर विरोधक बनले.

 

**

- राणी आणि क्रांतिकारक ( The Queen and the Rebels) नाटकात

तर त्यानी केलेली मांडणी, राजकीय घडामोडी वर केलेले भाष्य, मानवी स्वभावाचे दाखवलेले कंगोरे नाटकाचा ताजेपणा टिकवून ठेवतात. यातील घटना आणि त्यांची  तर्कसंगत मांडणी जणू काही सार्वकालिक वाटावी अशी आहे.

 

बते’ आपल्या नाटकासाठी भौगोलिक परिस्थितीचे बंधन झुगारून देतात. कथेला पोषक अशा कल्पित स्थानात ते नाटकाची मांडणी करतात. या नाटकासाठी बतेने निवडले ठिकाण म्हणजे एका छोट्या गावातील ग्रामपंचायतीच्या समाज मंदिराचा दुर्लक्षित हॉल.आडावळणावरचे हे गाव डोंगराच्या कुशीत पण सरहद्दी जवळ आहे.

 

चारही अंकांसाठी हीच पार्श्वभूंमी असून, त्याला फ़ारशा नेपथ्याची गरज नाही. रंगमंचावरील प्रवेशद्वारांचा नाटाकातील ताण वाढवण्य़ासाठी केलेला उपयोग,बतेच्या तंत्रावरील हुकमतीची साक्ष पटवतात.या हॉलमध्ये झालेल्या पात्रांच्या संवादातून हे नाटक चढत जाते.

 

हा सारा एका रात्रीचा खेळ.

 

गेली पाच वर्षे राणीचे निष्ठावान सेवक आणि क्रांतिकारी यांच्यांत सत्तेसाठी लढाई चालू आहे. राजवाड्यावर हल्ला करून या बंडळींची सुरुवात झाली.मरून पडलेल्या सुरक्षा रक्षकांच्या रक्ताने माखलेली राणीपळून जाते. ही राणीगेली पाच वर्षे लपून छपून राहात आहे. तिच्याशी एकनिष्ठ असलेले, तिच्या संपर्कात आहेत.

बंडखो्रांचा विजय जवळजवळ निश्चित झाला आहे. पण त्याना अजून राणीसापडत नाही. धरपकड, चौकशा, झडत्या, गोळीबार,फ़ाशी,कोर्ट मार्शल,मारामाऱ्या,लूटमार यांना उत आला आहे.सर्वत्र अराजक माजल आहे;संशयाचे वातावरण आहे.

 

अशा वेळी सीमेकडे प्रवास करणाऱ्या, देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका गटात, राणी’ आहे असा संशय क्रांतिकारकांच्या पक्षाला येतो. या लोकांचा मार्ग बदलून त्यांना या आडबाजूच्या गावात यायला भाग पाडले जाते.

 

संध्याकाळची वेळ आहे.

 

येथून नाटकाला सुरुवात होते.

 

या प्रवासी लोकात दोन स्त्रिया आहेत. त्यातील एक अर्जिया’ ) वेश्या )   (दुसरी शेतकरीण बाई(राणीइतर काही प्रवासी, शेतकरी इ. आहेत. कमिसॉर अमॉस पण एक प्रवासी म्ह्णून आला आहे. ग्रामपंचायतीतील एक नोकर आणि "रेमहा स्वत:ला दुभाषा म्हणणारा आहे (ज्याला शोधायला अर्जियाआली आहे .जनरल ’बिएंतजो  जबर जखमी झाला आहे  तो पण येथे येतो.

 

रेमस्वतःला बंड्खोर पक्षाचा प्रतिनिधी म्हणून घेत, अधिकार दाखवत असतो. प्रवाशांचे कागदपत्रे तपासताना अर्जियात्याच्या समोर येते. तो तिची ओळख नाकारतो,भांडतो ; तिची निर्भत्सना कर्तो;तिचा वाटेल तसा अपमान पण करतो.

सर्व प्रवाशांना सांगण्यात येते की सुरक्षा आणि गुप्ततेच्या कारणास्तव त्यांना आजची रात्र येथेच राहावे लागेल. स्त्रीयां आणि पुरुषांची वेगवेगळी व्यवस्था करण्यात येते.

 

अर्थातअर्जियाआणि शेतकरीण बाई याना एका खोलित. अर्जियत्या शेतकरणीला राणीम्हणून ओळखते. रेमला तसे सांगते.रेमआणि अर्जियायातून फायदा उठवायचं ठरवतात.

 

रेमच्या योजनेप्रमाणे दारावर धक्का बसल्यावर रक्षक गोळीबार करतात, पण राणी दुसऱ्याच दाराने पळून गेलेली असते.आवाजामुळे रक्षक आत येतात.व अर्जियाच पळून जात होती असे म्हणून सर्वाना बोलवतात., अर्जिया  खरी राणी आहे असे सर्वांना वाटायला लागते..

 

जनरलबिएंतच्या अध्यक्षतेखाली  अर्जियावर राजद्रोहाचा आरोप ठेऊन खटला सुरू होतो. रेमघाबरून तिची ओळख नाकारतो. पळून गेलेली  राणी)शेतकरीणीच्या सोंगातील) ती पण  अर्जियासमोर विष घेऊन प्राण सोडते.  शेतकऱ्याच्या वेशातील राणीला विजनवासात झालेला मुलगा,अर्जियासमोर उभा करतात आणि आता तरी कबूल कर म्हणतात. पळून जाण्याच्या प्रयत्नातरेमगोळीबारात मारला जातो.अर्जियासमोर  ती खरी राणी नाही हे सिद्ध करायला कोणताच पुरावा राहात नाही.

 

तिला मृत्यू समोर दिसतो अर्जियाअत्यंत धीरोदत्तपणे त्याला सामोरी जाते. या मुलाला, कोवळ्या जिवाला तरी काही अपाय होऊ नये अशी विनंती करते. आपण राणीआहोत, स्वतंत्र आहोत. ज्या ताठ मानेने ती या चौकशीला सामोरे जाते, त्यांच्या आरोपांचा प्रत्यवाय करते, एका सामान्य स्त्रीच्या -माणसाच्या असामान्य धैर्याचे कौतुक करावेसे वाटते.अपमानास्पद-हेटाळणार जीवन आणि (तिला माहित झालेल्या) राणीच्या सह्काऱ्यांचा विश्वासघात अशा सशर्त क्षमायाचनेची सूचनाही ती नाकरते.

 

तिच्यावरराजद्रोहशाबूत झाला आहे आणि त्यासाठी मृत्युदंडहीच शिक्षा

 

अर्जिय’म्हणते मला फार थकायला झालय, थंडी वाजते आहे.ती शाल द्या आता मला गाढ निवांत झोप लागेल. ती बाहेर जाते. थोड्यावेळाने गोळीबाराचा आवाज येतो. अर्जियामरते

 

या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची नायिका अर्जियाएका वेश्येचे ,शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रीचे. वारांगनेचे वीरांगनेत झालेल रूपांतर.

 

ती स्वतःची ओळख मी म्हणजे तीन युद्धांच्या कचऱ्यातून वाढलेली कोठेही सहज आढळणारी ,अतिसामान्य झुडूप अशी करून देते.(One of those very common plants that you naturally find growing out of the manure of three wars)  चौकीदाराने कोणाची तरी ओळख आणायला सांगितल्यावर  ती म्हणते माझ्याकडे येणारे लोक स्वतःच पहिलं  किंवा टोपन नावच सांगतात आडनाव नाही.

ती म्हणते मी येथे एवढ्या लांबून धडपडत कशाला आली आहे तर एका माणसाची शेज सजवायला. तिचा मित्र रेमबद्दल तिला खरच प्रेम वाटतंय आणि त्यांन झिडकारले तरी ती त्याला सोडायचा विचार करत नाही.बाई असणच मला अपमानास्पद वाटतय,खर तर जगणच !ज्या माणसाल तुम्ही समोर उभ सुद्धा करणार नाही-त्याचीच शयासोबत करायला लागाव! .किती घृणास्पद आणि अपमानकारक आहे हे स्त्री असण!

पण तिच्यात एक प्रकारचा हट्टीपणा आहे .वाचनामुळे आलेली बोलण्यातली  सफाई आहे, तर स्वतःला घरंदाज रूपात बघायची स्वप्नं पाहायची सवय आहे.

 

पण तिचं खरं माणूसपण जागं होतं ते राणीची हकिकत ऐकून .ती राणीला पळून जायला मदत करते आणि स्वतः गोत्यात येते.

 

बतेनी अर्जियाआणि अमॉसयांच्या जुगलबंदीतील  अर्जियाचीउत्तर हे सर्वकालिक राजकीय ढोंग बाजीवर केलेल भाष्य ,हा या नाटकाचा परमोच्च बिंदू आहे.

 

माझ्या जन्मापासूनच तुमच्यासारखे लोक मला सतत स्थलांतर करायला, शहरं बदलायला लावता आहेत, माझी झडती घेत आहेत, मला हाकलून लावत आहेत

 

नुसते हुकूम सोडण्यापलिकडे तुम्ही काय करता? जगातल्या काही लोकांनी ठरवले आहे की इतरानी काय करावे हे फक्त त्यांनाच कळतं

 

आम्हाला काय आवडते, ते खाण्यावर बंदी, झोप आली तरी झोपण्यावर बंदी, थंडी वाजत असली तरी शेकोटी पेटवण्यावर बंदी ,कारण काय? तर राजकीय हेतू  साध्य होण्यासाठी हे आवश्यक आहे

 

भिती  मला ! कशाची? - उलट लोकांच्या मनात तुमच्याबद्दल जी घृणा साठली आहे, त्यामुळे तुम्ही स्वतःच समाधान करून घेण्यासाठी आपल्याला सर्व जण घाबरतात असं समजत राहता.

 

बिएंतम्हणतो म्हणतो दगड फोडणारे गरीब लोक आता नव्या राज्यात असणार नाहीत

 

यावर अर्जियाम्हणते याचा अर्थ आता तुम्ही आम्हा सामान्यासाठी नवीन काहीतरी कटकटी निर्माण करणार ,तुम्हाला दुसरं काय करता येतय.? तुम्ही लोकांना प्रथम हेवा करायला शिकवता,व्देषाची बीजं त्यांच्यात पेरता आणि त्यातून त्वेष निर्माण करता.जनमानसातील क्षोभ तुम्ही लोकांनी आणखीनच स्फोटक करून ठेवला आहे. हकनाक मरणाऱ्यांची  संख्या वाढली आहे. तुमच्या कोणत्याच नव्या योजना, तुम्हाला "येणारा नाहक बळी गेलेल्या लोकांच्या रक्ताचा वास बुजवू "शकणार नाहीत

 

लोकांच्या मनात विद्वेशाच बीज किती गहन पेरल आहे ते एका रक्षकाच्या ’माऊपा’च्या संवादातून समोर येत -’राणी’ सापडली आहे अस कानावर पडताच तो म्हण्तो ’अम्हाला तिचा कोथळा बाहेर काढलेला बघायचा आहे आमच्या साऱ्या त्रासांच मूळ ’राणी’ आहे.अजारी माणस जखमानी विव्हळत आहेत,आमची मूलं मोठी होवून विकलांग होत आहेत आणि मुलीनी तर लाज सोडली आहे.या सऱ्याला फ़क्त ’राणी’च जबाबदार आहे दुसर कोणी नाही"

 

रेमजेव्हा तिची ओळख दाखवायचे नाकारतो .तेव्हा ती म्हणते,

 

माझा मित्र घाबरला आहे. परिस्थिती त्याच्या अपेक्षेबाहेर गेली आहे मी राणीआहे की नाही किंवा तो माझा मित्र आहे की नाही यापेक्षा तुम्हा लोकांना या ठिकाणी काही जणांना गोळ्या घालायलाच  लागतील आणि त्याला तर जिवंत राहयच आहे

 

मला जाताना आनंद होतोय. देवाने माणसाला मुद्दाम असं बनवलं. अगदीच नम्र ,मऊ नाही तर, त्यापेक्षा थोडासा अंहकारी,जो त्याच्याशी भांडेल, त्याला धिक्कारेल , त्याला चकित करील असा. मला जाताना आनंद होतो आहे की मला एक मुलगा मिळाला. मी समृद्ध होऊन जाते आहेतिच्या या धीट संभाषणाने जणू तिच्यात खरंच खानदानी रक्त आहे असं वाटून बाजूचे लोक पण भारावून जातात. क्रांतिकारी पक्षाच्याच लोकानाच काय पण आपल्यालाही कबूल करावस वाटत की हिच्यात राज तेज आहे

 

स्वार्थी पक्ष बदलू रेमच्या स्वभावाचे दर्शन घडवणारा एक संवाद नमूद करणयासारखा आहे..

 

रेम’ म्हणतो जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक कांदा -चटणी -भाकरी खाणारे तर दुसरे चिकन-बिर्याणी - श्रीखंड -पुरी खाणारे ! आणि जीत कोणत्याही पक्षाची असो श्रीखंड-पुरी-चिकन -ब्रियाणी खाणारे  लोक तेच असतात-तेच राहतात,.म्हणून आपण नेहमी कोणत्या पक्षात राहायचं? तर श्रीखंड-पुरी-चिकन -ब्रियाणी खाणाऱ्यांच्या. त्यासाठी हुषारी लागते .

मह्त्वाच काय ! तर फ़क्त पैसा

 

या नाटकातीलराणीहे  एक सांकेतिक प्रतिक दाखवले आहे.सत्तेचं प्रतिक म्हणून. कुंकवाचा धनी’ - कळसूत्री बाहुली- कोणीतरी उभं करून- कांही लोक राजनिष्ठा म्हणून किंवा त्याविरूध्द क्रांती करायची ठरवून सत्ता उपभोगत असतात. यातील खऱ्या राणीने तिच्या बद्दल ,तिच्या )अर्जियाला राणी समजून अर्जिया(वर केलेल्या आरोपांपैकी,तसे) कांहींच केलेले नाही.ती लपून छपून दिवस काढते आहे.आणि स्वत:ची ओळख लपविण्यासाठी कांहीही करायला तयार होते,त्यातून तिला एक मुलगाही झाला आहे. ही लढाई चालू ठेवण्यात एकनिष्ठवाल्यांचाही स्वार्थ आहे. त्याना कोणाच्या तरी नावाने हे चालू ठेवायचे आहे. आणि म्हणून ते राणीला शोधून काढतात. त्यामुळे राणीक्रांतिकारकांप्रमाणेच, या निष्ठावंतांनाही घाबरत आहे.तिला काहीही नको आहे. फक्त भितीमुक्त शांत झोप हवी आहे.

 

या नाटकाचा प्रवास एका अपरिहार्य शेवटा कडे होत राहतो.नियतीच्या खेळातील ही पात्रे कोणाचाच  विजय किंवा हार साजरा करू शकत नाहीत. रेमो, बियांत, राणी आणि अर्जिया सर्वांचा मृत्यू होतो. मात्र अर्जियाच्या मृत्यूला एक वलय लाभते. नाटक संपल्यावर आपण सुन्न होतो.

 

तरीपण नंतर आपल्या लक्षात येतं की  हाक्रांती- बंडाळीचाखेळ कोठे कोठे चालूच आहे!

 

जयंत लीलावती रघुनाथ

 

संदर्भ:1.Three European plays :Introduction and Edited by-E.Martin Browne

:Ring round the Moon-Jean Anouilh-Tr-French to English -Christopher Fry- 1948 1st french publication

:The Queen And The Rebels -Ugo Betti -Tr-Italian to English -Henry Reed -1949 1st Italian publication

:In Camera :Jean Paul Satre-tr-French to English-Stuart Gilbert-1944 1st French Publication

This selection Penguin Books -2nd edition-1960-in the series Penguin Plays.

2.Introduction by -G.HMcWilliam (Trinity College ,Dublin)

to " Crime on Goat Island '-Ugo Betti -play tr-Peter Meyer-1946 1st 1st Italian publication.

Chandeler Publishing Company ,Library of Congress Catalog Card no.13654 USA.-1961

 

’विश्रांती’ दिवाळी -भाषांतर विशेषांक -२००३ मधून :पुन:संपादित व विस्तारित


from editor अक्षरनामा

Jun 19, 2022, 11:02 PM (3 days ago)

to me

  

नमस्कार,

तुमचा लेख मिळाला. वाचला. आवडला. 

पण 'अक्षरनामा'वर घेता येणार नाही.

कारण तो २००३ साली 'विश्रांती' या दिवाळी अंकात आलाय. नंतर तुम्ही तो ब्लॉगवर घेतलाय. म्हणजे त्याची आधीच दोन माध्यमांतरे झाली आहेत. एका ठिकाणी आलेला आणि चालू वर्तमानाशीही सांधा असलेला लेखच आम्ही घेतो. तोही प्रतिपाद्य विषय तितकाच महत्त्वाचा आणि समकालीन असेल तरच.

उगो बेट्टी यांचे नाटक 1946 सालचे आहे. त्यामुळे आता त्यावरचा लेख घेण्याचे काहीच प्रयोजन नाही. गेल्या वर्षी एक वेळ चालला असता.

तथापी आताहा लेख अक्षरनामा दिवाळी २०२२( 0nline) अंकात प्रकाशित झाला आहे

Comments

Popular posts from this blog

DESHPANDE DATTAMANDIR-KAGAL देशपांडे दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

MODERN ART -THOUGHT-FEATURES AND COMMENTARY-नव वा आधुनिककला –विचार ,वैशिष्टे आणि भाष्य

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 3