AUTOBIOGRAPHY -"माझ्या जगण्याचे पुस्तक"-परीक्षण
पुस्तक परीक्षण माझ्या जगण्याचे पुस्तक- लेखक: वि.म.बोते “माझ्या जगण्याचे पुस्तक “ म्हणजे:- एका साध्यासुध्या माणसाची प्रांजळपणे मांडलेली तितकीच भाबडी जीवन कथा असे थोडक्यात म्हणता येईल. एकूण पुस्तक वाचताना लक्षात येते की आयुष्यात ज्या ज्या व्यक्ती, सहकारी,वरीष्ठ अधिकारी,संस्था,वृत्तपत्रे,लेखक वा कवी वा मित्रपरिवार, गुरु, मार्गदर्शक ,शेजारी इत्यादी इत्यादी वा इतर कोणीही, ज्यानी मदत केली, कौतुक केले, प्रोत्साहन दिले., शाबासकी दिली.अशा सर्वांच्या प्र्ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता, त्यांचे आभार मानण्यासाठी जणू काही हे पुस्तक लिहले आहे असे वाटते. मुळातून कोणाच्या तरी सांगण्यावरून, भरीला पडून, कोर्टकचेऱ्या करून खाता-पीता भरला संसार मोडून, कष्टकरी गरीबीच जीणं,वाटेल येणं ;अशा हकीकतितीलच ’बोतेंची’ ही जीवन कहाणी. पण या कथनात कोठेही समाजावर राग नाही. पालकां(आई /वडिल) च्यां वर दोषारोपण नाही. उलट सतत त्यांची आठवण आणि उपकार, माया स्मरण जागो जागी आलं आहे. वडिलांच्या आदरापोटी सुशिक्षित, संपन्न घरातील लग्नासाठी स्थळ घेऊन घरी आलेल्या लोकांनी अशिक्षित म्हणून वडीलांच्याकडे दुलक्ष केलं म्हणून त्य