AUTOBIOGRAPHY -"माझ्या जगण्याचे पुस्तक"-परीक्षण

पुस्तक परीक्षण 


माझ्या जगण्याचे पुस्तक-
लेखक: वि.म.बोते

“माझ्या जगण्याचे पुस्तक “ म्हणजे:-

एका साध्यासुध्या माणसाची प्रांजळपणे मांडलेली तितकीच भाबडी जीवन कथा असे थोडक्यात म्हणता येईल. एकूण पुस्तक वाचताना लक्षात येते की आयुष्यात ज्या ज्या व्यक्ती, सहकारी,वरीष्ठ अधिकारी,संस्था,वृत्तपत्रे,लेखक वा कवी वा मित्रपरिवार, गुरु, मार्गदर्शक ,शेजारी इत्यादी इत्यादी वा  इतर कोणीही, ज्यानी  मदत केली, कौतुक केले, प्रोत्साहन दिले., शाबासकी दिली.अशा सर्वांच्या  प्र्ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता, त्यांचे आभार मानण्यासाठी जणू काही हे पुस्तक लिहले आहे असे वाटते.
मुळातून  कोणाच्या तरी सांगण्यावरून, भरीला पडून, कोर्टकचेऱ्या करून खाता-पीता भरला संसार मोडून, कष्टकरी गरीबीच जीणं,वाटेल येणं ;अशा हकीकतितीलच ’बोतेंची’ ही जीवन कहाणी. पण या कथनात  कोठेही समाजावर राग नाही. पालकां(आई /वडिल) च्यां वर दोषारोपण  नाही. उलट सतत त्यांची आठवण आणि उपकार, माया स्मरण जागो जागी आलं आहे. वडिलांच्या आदरापोटी सुशिक्षित, संपन्न घरातील लग्नासाठी स्थळ घेऊन घरी आलेल्या लोकांनी अशिक्षित म्हणून वडीलांच्याकडे दुलक्ष केलं म्हणून त्या स्थळाला त्यानी चक्क नकार दिला . या साऱ्या लेखनात आपल्या परिस्थितीबद्दल कोणावर दोषारोप केलेले नाहीत वा  सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न ही नाही.
छत्रपती शाहु महाराजांच्या शिक्षण आणि समता, जात विच्छेद सारख्या प्रागतिक विचारांना त्यानी कृतीची जोड दिल्याने  कोल्हापूर संस्थानतील जनतेच्या  मनात त्यांच्या विचारांची जी बीजे रोवली गेली त्यातून शिक्षणाचे महत्त्व निरक्षरांना ही जाणवलं.
त्यामुळेच  परिस्थितीच्या रेट्यातून आठवीत शिक्षण सोडून रोजगाराच्या मागे लागलेल्य बोतेनी शिक्षणाची कास सोडली नाही. शेत मजुरी,लोकर विणकाम प्रशिक्षण हातमागावर काम आणि नंतर प्राथमिक शाळेत शिक्षक, दरम्यान पदवी आणि ग्रामिण पत्रकारीता व जनसंपर्क माध्यम पदविका  पर्यंतचा शैक्षणिक प्रवास आणि बरोबरीने लेखन,कवी,बातमीदर,,ग्रंथपाल,शेती ,वखारीचा व्यवसाय आणि अत्यंत आववडचा छंद नाटकात काम करणे , हे ही केलं.
मेंढपाळ धनगरी कुटुंबातील बोतेनी आपण हे सार करू शकलो  ते आपणाला आई-वडलांनी शाळेत घातलं म्हणून अन्यथा ’मी ही कुठल्यातरी मेंढराच्या खांडात गडी राहीलो असतो,पारंपारिक मेंढ पालनाचा व्यवसाय करत राहिलो असतो. किंवा मला त्याच पठडीचे शेत मजुराच जीणं भाग पडल असत."  असं ते लिहतात .   
पन्नासच्या दशकातील समजातील सौहाद्र,शेजारधर्म,आपुलकी,परस्पर प्रेम .स्नेह, एकोपा यांची उदाहरणे आज धक्कादायक वाटतील अशी परिस्थिती आहे  पण नक्कीच ती आशादायकही आहेत."बोते" यानी त्यांच्या नावाच ’विठ्ठल’ या नावांचा आणि त्याना पडलेली -लोक ज्या वेगवेगळ्या नावाने त्याना बोलाववत त्याच केलेल  वर्णन मजेशीर आहेच,पण त्यापेक्षा त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ’उस्तादबाबा(फ़कीरा)नी’ यांचा जन्म ’रमजान’ या पवित्र महिन्यात झाला म्हणून यांच नाव ’रमजान’ ठेवायला सांगितल आणि पालकानी ते ठेवलही. कांही काळ त्यांच  ’रमजान’ हे नावही इतर नावा बरोबर चालू राहिल.ते लिहतात "आमच्या घराच्या आसपास मुस्लिम कुटुंबे होती व आहेत.--आमच्या घरातल्या किंवा भावकीतल्या कोणीच रमजान या नावाला विरोध केला नाही.एवढ्या एकाच गोष्टीवरून त्या वेळच्या समाजात असणाऱ्या सौहाद्राची कल्पना येते. धर्माच्या कट्टरतेच खूळ नव्हतं.’--धर्माच्या पलीकडे माणूस म्हणून एकमेकाना उपयोगी पडणारी भावना होती,राहणीमान,पेहराव यात कुठलाच वेगळेपणा नव्हता.स्पृश्य-अस्पृश्य या संदभातही एक चालत आलेला रीवाज इतकीच (?)भावना आमच्या गल्लीत होती.जातीयते संदर्भात टोकाची भावना कधीच नव्हती."  
सुमारे २७० पानाचं आणि २१ प्रकरणांच   पसरट,विस्कळीत अस हे  निवेदन मात्र, ओघवती ,वाचकाशी संवाद साधत एखाद्या मैफ़िलितील गप्पा,हकिकती सांगितल्या सारख्या शैलीमुळे वाचकाला वाचत राहायल प्रेरीत करत,उत्सुक ठेवत.या पुस्तकातील लेखकाच्या जीवन प्रवासातील घटना,,हकीकती ,प्रसंग आणि निवेदन  हे ढोबळ मानाने नाटक-अभिनय,,रोजगार -व्यवसाय, -नोकरी,-(प्राथमिक शाळेत शिक्षक-मुख्याधापक)ध्ननगर     समाज राहणी,व्यवसाय,रीती रीवाज ,रूढी परंपरा व याला समांतर कौटुंबिक जीवन आणि सामाजिक परिसर-भवताल आणि त्याला लेखकाने  दिलेला -मांडलेला प्र्तिसाद असं म्हणता येईल.   
एका मागून एक घटना आणि हकिकती मांडताना, त्यात कोठेही एकसंघपणा नाही.शिवाय  एकदमच विषायांतर झाल्याने कांहीस गोंधळून जायला होत.तथापी स्वातंत्रोत्तरच्या पहिल्या दशकातील -एका तरूणाची  जगण्याची-आयुष्याशी झगडण्याची आणि कांहीशी जीद्दीची ही कहाणी खर तर एका तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या मर्यादित  भौगोलिक परिसरातील ;पण मला या पुस्तकाची -कहाणीची नोदं  घ्यावीशी वाटली कारण हे एक त्या काळाच दस्ताऐवजीकरण आहे.! 

 
जयंत लीलावती रघुनाथ 

 
*** माझ्या जगण्याचे पुस्तक (आत्मकथन) लेखक: वि..म.बोते प्रकाशक: मोहित प्रकाशन, वट वृक्ष कॉलनी ,पाचगांव, कोल्हापूर. मुल्य:रू.२५०/- पृष्ठे -२७२.
 प्रकाशन वर्ष २०२२


Comments

Popular posts from this blog

DESHPANDE DATTAMANDIR-KAGAL देशपांडे दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

MODERN ART -THOUGHT-FEATURES AND COMMENTARY-नव वा आधुनिककला –विचार ,वैशिष्टे आणि भाष्य

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 3