Posts

Showing posts from May, 2023

PATTA CHITRA -BALIGHAT पत्तचित्र-पट्टचित्र(चित्रमालिका) व बालिघाट चित्र

Image
   पत्तचित्र-पट्टचित्र(चित्रमालिका) व बालिघाट चित्र  पत्तचित्र ,पट्टचित्र(चित्रमालिका ) व बालिघाट या  ’लोककलांमधे ’ हिंदू देवदेवतांची ,पुराण  कथांवर आधारीत चित्रे प्राकृतिक रंगानी रंगवण्याची प्राचिन परंपरा आहे. ती भारतभर वेगवेगळ्या प्रांतात  वेगवेगळ्या  नावांनी व वेगवेगळ्या प्रकाराने ओळखली जाते. भारतात ताडाच्या पानांचा चित्रफ़लक म्हणून वापर करण्याची प्राचिन परंपरा  आहे. या कलाकृती मुख्यत:तीन प्रकारच्या असतात. १. तालपत्त चित्र : ताडपत्रावर रंगवलेली चित्रे  २.पटचित्र-चित्रमालिका  : कापडावर  रंगवलेली चित्रमालिका ३. भित्तीचित्र : भिंतींवर  रेखलेली-रंगवलेली चित्रे ओडिसातील  पुरीच्या जगन्नाथाच्या- चित्रांकनातून –प्रचार,प्रसार यातून १५-१६ व्या शतकात सूरू झालेल्या या लोककलेच्या स्वरूपात आजपर्यंत तसा कांही मूलभूत फ़रक झालेला नाही,मात्र कांही नवे प्रयोग केले जात आहेत. जगन्नाथा बरोबरच ,रामायण –महाभारत व पौराणिक कथा या लोककलांचा मुख्य विषय राहिला आहे नंतर  राजे महाराजांची स्तुती-गौरव चित्रे, प्रादेशिक नृत्यावर आधारीत चित्रे याच बरोबरीने कुलदेवतांच्या प्रतिमा आणि राधाकृष्ण,सरस्वती,दुर्गा आणि गणपती य