SCULPTURE FRAGMENTED -खंडित शिल्प
खंडित शिल्प पाश्चिमात्य कलाकारानी आपल संपन्न पुरातन कला वैभव जे कालौघात छिन्न वा खराब वा क्षतीशत झाल आहे अशा कलाकॄतींच्या प्रतिकॄती तयार करून त्यांच सौंदर्य आणि अमुल्यपण जपत नव्या-येणाऱ्या पिढिलाही ते उपलब्द्ध करून दिल.उदा.प्रॅक्सिलाईटची -ऍफ़्रोड्राइट(नीड) वा इतर अशाच शिल्पांच्या पूर्ण प्रतिकृती तयार केल्या. आपणाकडे अशा प्रकारचे प्रयोग एक अजंठाच्या भित्तिचित्रांच्या प्रतिकृती सोडता खंडित शिल्पांच्या बाबतीत झालेले मला आढळले नाहीत. दी लुडीव्हीज ऎफ़्रोडाइट-व्हिनस-२०५ से.मि-८१ इंच रोमन संगमरवरी प्रतिकॄती –कबंध व मांड्य़ा -मूळ शिल्प-इतर मस्तक,ह्स्त ,पाय व वस्त्राचा आधार -या तुट्लेल्य खंडीत भागांचे पुनर्संचयन करून ही प्रतिकॄती केली आहे. शिल्पी कलाकार -प्रेक्सीटॆलेस -ख्रिस्त पूर्व -४ थे शतक- ग्रीक दर्जेदर कला प्रवाहातील शिल्प वृक्ष देवता आणि तिची सहचरी-साह्ययक सॅंड स्टोन -२१.१/२ इंच राजस्थान -वायव्य प्रांत -सिकर-हर्शगिरि-१० वे शतक सध्या क्लेव्हलॅंड संग्रहालय खाजगी देणगी बौध्द स्मारकावरील निसर्ग देवतांच्या शिल्पांकनाची स्मरण देणार, मध्य युगीन हिंदू मंदिरांच्या बाह्यांगवरील अस हे शिल्प.