MODERN ART -THOUGHT-FEATURES AND COMMENTARY-नव वा आधुनिककला –विचार ,वैशिष्टे आणि भाष्य
नव वा आधुनिककला – विचार , वैशिष्टे आणि भाष्य नवचित्रकला - आधुनिक कला म्हणजे पूर्ण विसाव शतकच तिचा प्रारंभ मात्र एकोणिसाव्या शतकातील इ . स . १८८० च्या सुमारास नवचित्रकलेचे पहिले प्रणेते पॉल सेझान , व्हिन्सेंट व्हॅन गॉख व पॉल गोगॅं या कलकारानी प्रभाववादी कला प्रवाहाच्या पल्याड ( इंप्रेशिझन्सच्या ) आपल्या चित्रांकनासाठी वेगळी नवी नैतिक आणि भावनिक चौकट शोधून त्याद्वारे केली प्रभाववाद (Impressionism) हा कलाप्रवाह – आणि त्याचे प्रवर्तक - किंवा कलावंतांचा संघ - गट ( ग्रूप ) १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आला . काताच्या रंगासारख्या काळ्या व चॉकलेटी रंगावाचून चित्रे काढताच येत नाहीत यापरंपरेला या कलाप्रवाहाच्या अनुयायानी हरताळ फ़ासून स्वत : च्या चित्रात भडक , ताजे रंग भरून चित्रात ताजेपणा आणि अनुभवाचा अस्सलपणा यावा म्हणून ते स्वत : ची अंधार कोठडी सोडून निसर्गाच्या मोकळ्या वातावरणात आले . स्वच्छ सूर्यप्रकाश , मोकळी हवा , खुले आकाश अशा वातावरणात केलेल्या त्यांच्या चित्रांकना मुळे चित्रकलेच्या परंपरागत विचारांत आमुलाग्र परिवर्तने झाली . प्र