MODERN ART -THOUGHT-FEATURES AND COMMENTARY-नव वा आधुनिककला –विचार ,वैशिष्टे आणि भाष्य

                       नव वा आधुनिककलाविचार ,वैशिष्टे आणि  भाष्य

 

नवचित्रकला -आधुनिक कला म्हणजे पूर्ण विसाव शतकच तिचा प्रारंभ मात्र एकोणिसाव्या शतकातील इ..१८८० च्या सुमारास नवचित्रकलेचे पहिले प्रणेते पॉल सेझान,व्हिन्सेंट व्हॅन गॉख व पॉल गोगॅं या कलकारानी  प्रभाववादी  कला प्रवाहाच्या पल्याड (इंप्रेशिझन्सच्या) आपल्या चित्रांकनासाठी वेगळी नवी नैतिक आणि भावनिक चौकट शोधून त्याद्वारे केली

 


प्रभाववाद(Impressionism)  हा कलाप्रवाहआणि त्याचे प्रवर्तक- किंवा कलावंतांचा संघ-गट (ग्रूप) १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आला.काताच्या रंगासारख्या काळ्या व चॉकलेटी रंगावाचून चित्रे काढताच येत नाहीत यापरंपरेला या कलाप्रवाहाच्या अनुयायानी हरताळ फ़ासून स्वत:च्या चित्रात भडक ,ताजे रंग भरून चित्रात ताजेपणा आणि अनुभवाचा अस्सलपणा यावा म्हणून ते स्वत:ची अंधार कोठडी सोडून निसर्गाच्या मोकळ्या वातावरणात आले.स्वच्छ सूर्यप्रकाश,मोकळी हवा,खुले आकाश अशा वातावरणात केलेल्या त्यांच्या चित्रांकना मुळे चित्रकलेच्या परंपरागत विचारांत आमुलाग्र परिवर्तने झाली.प्रभावाद्यानी  रंग,प्रकाश व वातावरणाचा आभास यावर भर दिला होता.परिणामी त्यांच्या चित्रात आकाराचे (फ़ॉर्म)चे महत्व जवळ जवळ नाहिसे झाले.

प्रभाववादी कलाकार क्षणो क्षणी बदलाणाऱ्या घटकांचे रेखाटन तत्परतेने करीत,या तत्पर्तेमुळे त्यांच्या चित्रातून शाश्वत तत्वांचा लोप होऊ लागला.त्या मुळे अपरिवर्तनीय,शाश्वत चिरंतन महत्वाचे अनुभव चितारण्यास त्याना वावच उरला नाही. प्रभाववादी (इंप्रेशिनिस्ट) निसर्गाच्या आविष्कारावरच  संतुष्ट होते. त्यात भारवलेपण  नव्हत आणि त्यानी ना प्रश्न विचारले ना ते त्यात समरसून उतरले.त्यांमुळे त्यांची  कुचंबणा झाली.  

चित्रकलेला जीर्ण प्रणालीतून बाहेर काढण्याची महत्वाची कामगिरी प्रभाववाद्यानी  केली हे खरे,या पण यामुळे कुंठित झालेल्या कलाप्रवाहाला वाहता केला तो  उत्तर प्रभाववाद्यानी. क्षणिक अनुभवा पासून दूर राहून,शाश्वत स्वरूपाच्या ,सापेक्षतया चिरंतन अनुभवांचे चित्रण-आकार व त्यांची सुंदर मांडणी-योग्यतो-तेवढा विस्तार, या द्वारे केला.   

उत्तर प्रभाववाद्यानी (पोस्ट इंप्रेशिनिस्ट) त्यात स्वत:ला झोकून देण अपेक्षितच होत. त्यांच्या कामातील नाविन्य -ताजेपणा ,प्रामाणिकपणा,सचोटी यामुळे कलाजगतात खळबळ माजली ,सुरूवातीच्या या लहरींच थोड्याच काळात धडका देणाऱ्या भरतीच्या  लाटात रूपांतर हो़ऊन त्यांच्या कलाकृतीतून विविधरंगी भावनांचा महापूर आला.कांही काळ तर चैत्यन्याच्या अविष्कारान चित्रफ़लक परिपूर्ण करणे हे चित्रकाराचे आद्य कर्तव्यच झाल होत. नव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत या कला प्रवाहाच्या प्रतिक्रीयेने घनवादाला ( क्युबिजम) उद्युक्त करेपर्यंत  तो असाच चालू होता.           

 

या घनवादाच्या  प्रणेत्यांच्या पिकासो व ब्राक या  उद्गारातून घनवादाचे निकष जोखता येतील."माझ्या करिता चित्रांकन चित्र (काढणे-रंगवणे ) कला म्हणजे  एक नाट्यमय कृती आहे, जिच्या सादरीकरणात वास्तव स्वत:च दुभंगत जाते"अस मोठ्या जोशात पाब्लो पिकासो म्हणाले तर घनवादाचे दुसरे प्रणेते जॉर्ज ब्राक यानी नवचित्रत्रकलेवर प्रहार करताना कांहीसा सौम्य पवित्रा घेतला.ते म्हणतात "माझा वस्तुनिष्ट्तेवर विश्वास नाही मी नातेसंबंधाना मानतो" घनवादाबद्दलची त्याच्या प्रणेत्यांची ही भाषा आणि विषेशेकरून त्याला अनुसरून त्यानी काढलेली चित्रं ९५% पेक्षा जास्त लोकाना ती अनाकलनीय, दुर्बोध वाटली.त्यानी फ़क्त या बहुदा दोन वेडसर  माथेफ़ीरूंनी काढलेली असलीच   चित्रे पाहिलीअसावीत

 

आता आपल्या ल्क्षात येतय की घनवादाला वेड्यात काढल गेल,१८७० मधे प्रभाववादाला पण असच वेड्यात काढल गेल होत.त्यांच्यावरही असेच आरोप झाले होते.कांहीही असल तरी नवचित्रकला  म्हणजे या नव निर्मात्यांच्या सर्जनशीलतेच्या अविष्कारापलिकडे कांहीतरी होत.पिकासो आणि ब्राक यांच्या कामात घनवादाचा नवोन्मेष होताच.

 

फ़ॉविजम -उजळ आणि अनैसर्गिक रंग व सुटसुतित रचना यांचा पुरस्कार करणारा कलाप्रवाह -नाबिज(Nabis) आणि उत्तर प्रभावादी यांच्या कामातील बेलगाम भावनोत्कट्तेच्या प्रश्नाला घनवाद  हे उत्तर होत.हे उत्तर -हा जबाब - विसाव्या शतकात रूजू लागलेल्या विरोधाभासाच संपृक्त रूप व त्यावर अत्यंत टोकाची आणि हेलपाटून टाकणारी भुमिका घेऊन घनवादान दिला. लेखक आणि कला समीक्षक कार्ल क्रॉ़ऊस यानी घनवाद्यांच्या या कृतीच वर्णनउत्तरातून कूटता " किंवा "सोडवणूकीतूनच गुंता " ( Making Riddle Out Of solution) या सहा शब्दात  केल आहे. या सहा शब्दातून  घनवादाच सूत्र  जवळ जवळ नेमकेपणान स्पष्ट होत.दाहक,जहाल आणि भडकू अशी जरी त्यांची ख्याती असली तरी  त्यांच्या कलेत बुद्धीमत्तेची चमक होती, विषयाची मांडणी जाणिवपूर्वक,,व्यासंगी रचना आणि संयत रंगलेपन होत. 

घनवादाची भाषा भडकवाणारी होती हे खरेच आहे.पुनरुथानाच्या  यथार्थ दर्शन (-perspective ) च्या कल्पने नंतर दृककला जगतात एवढी मोठी बौद्धिक क्रांती घडून आली नव्हती त्यामुळे घनवादाने मोठ्या स्फ़ोटाची जणू वातच पेटवली.तर तिचे प्रणेते मॉंटमॅत्र स्टुडि़ओत बसून अवकाश आणि काल यांचा अनोन्य संबंध,अणू,परमाणू,स्पर्श गंधादी शारीर अनुभवांची प्रत्ययता या सारख्या विसाव्या शतकातील  मध्यवर्ती  व अहम विषयांच्या चिंतनात मग्न होते.

यात ते एकटेच नव्हते.हे शतक विज्ञान युग होत, ज्यात समोर दिसणार वास्तव हे मृगजळ आहे का किंवा एखादी फ़सवा विश्वास देणारी शक्कल तर नाही ना या शंकेन या शतकातील मानवजात संभ्रमित झाली होती. काय सांगाव कुलिन खानदानी आणि अमर आत्म्याच्या जागी आपल्या आत जीवघेण्या स्पर्धेच्या वासनांनी भरलेली अक्राळ विक्राळ नरकाची खाई तर नाही ना का त्या पेक्षा भयंकर म्हणजे नुसतीच अर्थशून्य पोकळी तर नाही ना अशा मुळातून हादरून टाकणाऱ्या विचारांनी हडबडून गेली होती याच वेळी  वेगवेगवेळ्या दिशातून ,माध्यमातून खळबळजनक थक्क करणाऱ्या विचारधारा कांही व्यक्तीं कडून प्रस्तुत होत होत्या.या विचाधारांच्या प्रवक्त्यांपैकी दोन अत्यंत मह्त्वाच्या व्यक्ती -आईन्स्टाईन आणि फ़्रॉईड होत आणि तिसरी विचारधारा म्हणजे घनवाद होय.

 

उत्तर प्रभाववाद्यांची मांडणी अशी होती कीपहाण म्हणजे निरखणं नव्हे.आता ब्राक आणि पिकासो यांच्या समोरच  पहिल आव्हान होत आपल्या बहुआयामी दुभंग रचनांच्या माध्यमातून हे उलगडून दाखवायच की न्याहायण -निरखण म्हणजे समजणे_जाणण नाही आणि दुसर त्या पेक्षा कठिण आव्हान होत ते  दृष्टीपल्याडची दृकभाषा शोधणे हे! घनवादाच्या आरंभानंतर त्याच्या उत्साही शाखानी आपल्या अविष्कारातून हे आव्हान पूर्ण क्षमतेने  स्वीकारल.

 

सैन्यात आघाडी वरील सैनिकाना -बिन्नीचे शिलेदार म्हणतात.आधुनिक-नवचित्रकलेचे आघाडीचे -बिन्नीचे शिलेदार बनलेले ,घनवादी आणि त्याचे पुरसकर्ते-यांची घनवादी चित्रशैली नवचित्रत्रकलेच्या आघाडीवरील-बिन्नीची-आघाडीची कला (avant-garde of art) म्हणून प्रस्थापित हो़ऊ लागली.घनवादाचा वारू आता चौफ़ेर उधळला.कला जगतावर तो घिरट्या घालू लागल,त्याला कवेत घेऊ लागला इतकच नव्हे तर त्याला भेदून पार जाऊ लगला.

घनवादाच्या अनुयायानी या कला चळवळीचा नेमका आत्मा आत्मसात करून यशस्वी धाडी घालणाऱ्या टोळी प्रमाणे कला प्रांतातील गैरसमज-विपरीत अर्थ,भ्रम उघडकीस आणले व आकलनाच्या मूलभूत कल्पनांना मूळापासून धक्का दिला.जगाला हादरवून टाकणाऱ्या पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या कांहीवर्षातील नव-आधुनिक कलेतील घनवादाच्या चळवळीचा कला जगतावर गंभीर आणि अपरिवर्तनीय असा परिणाम झला.कले बाबत गंभीर असणाऱ्या सर्वच कलाकारांच्या मनातील आभासी आश्वासक चित्रमय चौकटीला घनवादान खिंडार पाडल आणि या भगदाडातून नवकलेचा रांगडा आणि बेधुंद  प्रवाह  मुक्तीचा उदघोष  करीत वाहता झाला.

या बेधुंद स्वात्यंत्रान कांही कलाकराना  झपाटून टाकल आणि खाजगी आयुष्यतही ते बेछूट,भणंग,कफ़्फ़लक आणि  मदिरेराधीन स्वछंदी बनले.मॉडिगिनीली सारखे असे कांही कलाकार सोडले तर बहुतेक जण आपल्या कामाबद्दल अतिशय गंभीर होते.कांही वेळा अतीच सावध ! अर्थात हे सार त्यांच्या भल्यासाठीच होत.अस अस असलं तरी ब्राकच्या नाव लौकिकाला त्याचा आळशीपणा आणि पिकासोच्या चलाखी मुळे कांहीसा धका पोचला.आरशील,गॉर्की,आणि जॅकसन पोलॉक याना तेवढा त्रास झाला नाही.

 

आधुनिककलेची निखळ अविष्कारआग्रही भूमिकेची पहिल्या महाय्द्धातून उदय पावलेल्या हुकूमशाही राजकीय प्रवृत्तीशी टक्कर होणे अप्रिहार्य होते.ही एक स्वाभाविक प्रतिक्रीयाच म्हणावी लागेल.कारण कलेच्या प्रांतात या नव आधुनिक कलावंतांची -बिन्नीच्या योद्ध्या सारखी भूमिका समाजाला आलेल्या मरगळीची ,बेशिस्तीची प्रतिक्रीयाच  होती. स्टालिनच्या कम्युनिस्ट संस्कृती रक्षकानी या कलेला आणि कलावंताना "शिष्ठ"ठरवून कित्येकांना वेठबिगारी करायला श्रम छावणीत धाडल  तरनाझीनी तिची क्षूद्र,निकृष्ट कला आशी हेटाळणी केली.

 

आणि पुढे जावून यांचा कडवटपणाने  समाचार घेण्यासाठी १९३७ मधे मुनिक येथे एक प्रदर्शन भरविल.या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना  जलरंगात काम करण्यात चित्रकार म्हणून अपयशी झालेला  हिटलर म्हणाला होताजर चित्रकाराना शेतं निळी दिसत असतील तर ते वेडॆ आहेत-त्यांच डोक फ़िरल आहे आणि त्याना वेड्यांच्या इस्पितळात पाठवल पाहिजे,ते शेतं निळी दिसतात अस ढोंगीपणाने म्हणत असतील तर त्याना तुरूंगात पाठवलं पाहिजे

हिटलर आणि स्टालिन यांच्या व्ययक्तीक पूर्वग्रहा व्यतिरिक्त या कला चळवळीचा त्यानी अत्यंतिक तिरस्कार करण्याच कारण म्हणजे नव-आधुनिक कला आणि त्यांचे पुरस्कर्ते आणि या चळवळीतील आघाडीचे बहुतेक कलावंत हे जरी डाव्या विचारसरणीचे नसले आणि त्यात प्रत्यक्ष सह्भागी नसले, तरी बहुतेकांची सहानुभुती आणि  कल डाव्या क्रांतीकारी चळवळी कडे होता. ’फ़्रॅंकोया हुकुमशहाचा स्पेन मधील उदय व त्याने नागरी लढ्यात जनतेवर  केलेला अमानूष बॉंम्ब हल्ल्याच्या तीव्र निषेधाच जळजळीत प्रतिक म्हणजे पिकासोचेगर्निकाहे चित्र होय.          

दादा आणि अतिवास्तवादी हे सूरूवातीपासूनच डाव्या राजकीय विचारसरणीकडे झुकलेले होते आणि १९६० च्या दशकात तर कलेच्या कांही क्षेत्रात कला चळवळ आणि राजकीय विचार यांची सरमिसळ हो़ऊन गेली.

          

एकीकडे अशी राजकीय विचारसरणी तर दुसरीकडे अध्यात्म आणि आध्यात्मिक पातळीवरून नव-आधुनिक कले कडे पाहाणाऱ्याना राजकीय विचारसरणीशी कांही देणघेण नव्हत.नव-आधुनिक कला प्रवाहात हा आध्यात्मिक विचार येण्याच एक  कारण होत  रशियन मॅडम ब्लावट्स्की व त्यांची समविचारी ब्रिटिश -ऍनि बेजंट या दोन महिलांच्या प्रयत्नातून झपाट्याने उदय पावलेला आणि शतकाच्या मध्यावर अस्तास गेलेलाइश्वरी सत्ता’(Theology) हा नवा धर्म.थि़ऑलॉजी ला घनवादाशी कांही देण घेण नव्ह्त,  पण या विचारांनी भारावून गेलेल्या, वासिली कॅंडेस्की,कॉनस्टॅनटीन ब्रांकुशी,पिएट मॉंनड्रियान आणि जॅक पोलॉक या चार अव्हांत गार्ड -बिन्नीच्या  चित्रकारांच्या कलाकृतीत या विचारांचा ठसा उमटला आहे. पिकोसोच्यागर्निकात आढळणाऱ्या उघड राजकीय सामाजिक आक्रोषाच्या पूर्णपणे दुसऱ्या टोकाची भुमिका या कलाकारांच्या कलेतून दृगोचर होते.अत्यंत खाजगी,व्ययक्तिक अत:करणातील आत्म्याशी संवाद साधणारी कला  ही भूमिका.या आत्मसंवादी कलेचा हिरीरिने पुरस्कार करणारा जॅकसन पॉलॉक म्हणतोप्रत्येक नवचित्र म्हणजे स्वत:चा नव्यानेच  लागलेला शोध होय.प्रत्येक चित्रकार स्वत:चीच प्रतिमा रंगवत असतो,तो जो कांही आहे तेच रंगवत असतोअस असल तरी तो पुढे म्हणतो ज्या त्या कलाकृतीला तिच अस स्वतंत्र अस्तित्व असतेया साऱ्या प्रतिपादनाचा इत्यर्थ हाच की कलावंत याजीवंतकलाकृतीचा निर्माता म्हणून त्याची पूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारतो ही गोष्ट  माणसाच्या प्रवुत्तीतील  एकमेवा द्वितीयच म्हणावी लागेल.             

 

नवकलेच्या उद्गमपासून,तिच्या प्रणेत्यांना,प्रवर्तकांना आणि अनुयांयांनाही वाटत  होते की त्यानी विज्ञानाच्या सर्व शाखातील नव नव्या प्रयोगांचे स्वागतच करायला हव.अर्थातच त्यामुळे दृष्य भौतिकी विज्ञान आणि रंगांचे उपपत्ती शास्त्र  याना विशेषत: कॅंडिनस्कीच्या पासून पुढे अन्यन्य साधारण महत्त्व येण ओघानच आले.तर घनवादाच्या निर्मितीत गणिताचाही हातभार लागला होता.आईनस्टाईन यांच्या भौतिकीतील  संशोधनात भविष्यकालीन चौथ्या मितीच्या शक्यतांच्या विचाराना आधार मिळत होता, ’मिरोआणिक्लीयांच्या कामातील विलक्षण सजीवांच्या सजावटीच्या चित्रांकनाच सूक्ष्मदर्शी यंत्रातून दिसणाऱ्या सूक्ष्म जीवाशी साधर्म्य जाणवतं.पण या सर्वा पेक्षा आधुनिक कलेला  मानव शास्त्रांच्या शाखां पैकी सुक्ष्म आणि तरल संकल्पानांचे भांडार असलेल्या वैचारिक विज्ञान शाखातील सर्वात मृदू आणि आज आणखिनच सौम्य  जाणवणारी  शाखा म्हणजे फ़्रॉईड आणि जंगयुंग यांचे मानस शास्त्र.आधुनिक नवकलेला यात त्यांच्या तत्वज्ञानाला हिंमत आणि वैविध्यपूर्ण विषयांचा खजजिनाच गवसला.सुप्तमनाच्या संकल्पनेत त्यांच्या कल्पनाना मुक्त अवकाश मिळाल.अद्भूत स्वप्नाना विहार करायला नव विश्व खुल झाल.    

 ,

स्वप्नाळू अतिवास्तववाद आणि चिंतनविरहीत स्वच्छंदी  लेखन.रेखांकन आणि चित्रांकन यांची एक दीर्घ छाया विसाव्या शतकाच्या संस्कृतीवर दाटून आली. युंग या मानसोपचार डॉक्टरांचा इतिहाच्या पानावरून अस्त झाल्या नंतरही त्यांच्या प्रतिक -प्रतीमानांचा प्रभाव दिर्घ काल टिकून होता,अगदी अलिकडील पिटर ब्लेक याच्या उत्तर लोकप्रिय कलेत (post pop art )तील कामात तो  आढळतो.   

                          

अलिकाडच्या काळात शास्त्रीय-वैज्ञानिक कल्पनांपेक्षा तांत्रिक उपकरणांनी दृष्य कला प्रेरीत झालेली आहे अस  दिसत. यातून निसंदेहपणे अस म्हणता येइल की मोठ्या प्रमाणात सामान्य आणि निकृष्ठ दर्जाची कला समोर येऊ लागली आहे. हेही खर आहे की कॅनव्हासवरील तैल रंगातील चित्रांकनातसुध्दा खूपदा एकसूरीपणा येतो.

 

मन:कल्पित आणि कालसुसंगत प्रतिके आणि प्रतिमांची भाषा शोधणे  हा कलाकारांचा स्थायी भाव आहे.त्यामुळे तंत्रज्ञानाने समोर आलेल्या संधिंचा त्यानी दोन हातानी फ़ायदा उचलला नसता तर नवलच.

त्यामुळे कांहीनी (त्यांच्या कामात) तर चक्क शतकाच्या पूर्वार्धातील भाषा-(शैली) शतकाच्या उत्तरार्धात उसनी  घेऊन -उचलुन ,ती फ़क्त नव्या कालसुसंगत परिभाषेत मांडली. बहुतेक व्हिडि़ओ रचना-मांडणी कला,  दादाकलाकाराना त्या काळात नशिबाने व्हिडि़ओ तंत्रज्ञान उपलब्ध असत तर त्यानी त्या जशा सादर केल्या असत्या, तशाच वाटतात.

 

Representative Illustration

तर दुसरीकडे कलेच्या सादरीकरणासाठी स्टेनलेस स्टील,प्लास्टिक,फ़ायबर ग्लास,पॉलिस्टर,रेसिन,नायलॉन,ऍक्रिलिक रंग आणि "नासा"अढ्हेजीव्हज,तसेच एअर ब्रश,एरोसेल स्प्रेज,पोलोरॉइड कॅमेरे,झेरॉक्स आणि फ़ॅक्स यंत्रे या सारखी इतकी विविध माध्यमे उपलब्ध झाली की त्यांच्या त्यांच्या गुणाप्रमाणे परिणाम विचारात घेऊन काय सादर करावयाचे त्यात आमुलाग्र बदल झाला.यातील कांहीचा आपल्या कामात उपयोग  करायला मालेव्हीच वा बोसि़ओनी या सारख्या सुधारणावादी कलावंताना आवडल असत,पण त्यानी नक्कीच आपली कला आणि शैली,बदलली असती.ती  ६० च्या दशकातील,हलक्या संगणकानी व रंगीत छपाइ यंत्रानी लोकप्रिय(पॉप) कलावंत आणि लोकप्रिय कला-(पॉपआर्ट) यात घडून आली त्याशी सुसंगत झाली असती.

या आधुनिक युगात कलावंतांची विश्वाकडे पहायची दृष्टी विविधांगी-बहुआयामी झाली.एका टोकाला अतिशयोक्त, एकांगी,निराशेने खंतावलेले तळमळणारे,त्याना आधुनिक समाज म्हणजे जळून खाक झालेले चर्च-मंदिर किंवा अपघातात चोळामोळा झालेली मोटार जसा वाटे.अवंत गादच्या या शाखेचा अस्तित्ववाद हा जणू गृहधर्मच झाला होता.त्यानी आध्यात्मिक,सांस्क्रुतिक आणि राजकीय स्वातंत्त्र्य यांच स्वागत आणि स्वीकार केला आपल्यात सामावून घेतल.पण हा कांही तसा समाधानक वा सुखकारक तोडगा नव्हता.अव्यवहारी,अतार्किक भोग निषेध,शेंडा बुडखा नसलेला धर्म,आणि अविचारी सामाजिक अपेक्षा  यातस्वएक अशी खाई बनला की ज्यात स्वातंत्र्याला भितींची झालर होती,आनंद उल्हासावर कंटाळवाणेपणाच सावट होत.प्रत्यक्षातल्या जीवनात सगळ कांही चालू होत.पण अस्तित्व म्हणजे बाहेर पडायला दुसरा मार्ग नसलेली बंदिस्त गल्ली ज्यात व्यक्तीगत विनाश शाश्वत बनला होता.अशा अवकाशात कला नेहमीच अविचारी आतताई आणि टोकाला खेचल्या गेलेल्या कृतीत परावर्तीत होते आणि अर्थहीनही.   या अस्तित्वाच्या संभ्रमित अवस्थेत अगदी उलट- विरूध्द बहुतांशी आधुनिक कला ही आनंद,उल्हास मोद,हर्ष यांचा उत्सव साजरी करत होती.मातीस,बल्ला,ओकिफ़्फ़,ब्रांकुसी,क्ली,मूर आणि जॉन्स अशा  काही निवडक चित्रकाराना आपल्या कामात समाजाच्या ,जनतेच्या,दु:ख भऱ्या कहाण्यांचे चित्रण करण्याची  निकड तळमळ  जाणवली नाही ,गरज वाटली नाही.

क्लिफ़ोर्ड,स्टील, किंवा बेन निकोलसन यांच्या कलाकृतींच्या सानिध्यात काढलेला एक तास ही आपणाला विचार करायला प्रवृत्त करतात. आधुनिक नव कलेतील अत्यंत मोहक गोष्ट म्हण्जे त्यात आढ्ळणारे विनोदी छटांचे पदर.हाच अनुभव मॅग्रीटच्या कलाकतींच्या सानिध्द्यात येइल आणि त्या बरोबर तुम्ही खुशीत स्मितही कराल.

 

विसाव्या शतकातील कला म्हणजे विसंवादाने भरलेले जटील धर्मपिठ आहे.अशी कला जिच्यात एकाच वेळी  मंगल एकात्मता आणि आवेगी छिन्नता असा विरोधाभास एकनिष्टतेने सामावला आहे..रोथको आणि मॉन्ड्रीयन्च्या यांच्या स्वयंसाधनेतून दृगोच्चर होणारी मंगल एकात्मतता,, पिकासोच्या सामाजिक स्थितीवरील परखड राजकीय निशेधाच भाष्यगर्निकासारख्या प्र्तिकातील आवेगी छिन्नता  असा विरोधाभासाना सामावणारी ही आधुनिक कला;यंत्र आणि यांत्रीकीकरणाच हात पसरून स्वागत करत असताना मात्र आफ़्रीकेतील पाश्चिमात्यांच्या आक्रमणापूर्वीच्या कृष्णवर्णी  मूलनिवासिंच्या कलेसाठी तळमळ्त होती.

साल्वोदार दालीच्या अतिरेकी अतिवस्तवादाला तीन सामा़ऊन घेतल ,अलबर्टच्या ऋषीतुल्य संतत्वालाही ममतेन स्वीकारल;उपभोगवादाच्या नावान शंख करत असतानाच ऍंडी वॉरहोलला डोक्यावर घेतल.

जिच्या पोटात इझम्च्या जंजाळाच जंगल सामावल आहेअशी आधुनिक -नव कला ही कायमच एक चळवळ राहीली आहे.

या कालखंडातील कोणताच कला प्रवाह पूर्णत्वाला पोचेल अस म्हणता येणार नाही.काटेरी झुडपांच्या या जंगलात एक किल्ला आहे ज्यात एक निद्रीस्त सुंदरी आहे,पण ती ज्याची त्यान आप आपली शोधायची आहे.

 

साभार--

---  Essential Modern Art  -by Robin Blake -Paragaon Book -2001  from the back of cover Jacket

प्रास्तविकावर आधारित कांहीशी स्वैर रूपांतरीत मांड्णी,- आढळलेच तर दोष माझे-

 

**

जाता जाता....

 

१९०४ साली -दोनाल्ड कुस्पिट या अमेरिकन कला समिक्षकांन कलेचा अंत (end of art) झाल्याची घोषणा केली होती.त्यांच्या मते -दृष्य्कलेचा प्रामुख्याने जो सौंदर्यपूर्णता,सौष्टव,कलाकुसर असे जे कांही गुणविशेष होते,त्याचा आता अंत झाला असून मोठ्या प्रमाणावर तिथे अध:पतन झाले आहे.एका अर्थाने ही कलेनंतरची कला आहे.---आधुनिक कलेचा अस्त हो़ऊन उत्तराधुनिक कलेन कला विश्वाचा ताबा घेतला आहे.कलेनंतरची कला (post Art) ही एक उत्तराधुनिकतेच्याही पलिकडे जाणारी विचारधारा आहे.सार्वत्रिक मानवी जाणिवेची अभिव्यक्ती असणारी आधुनिक कला या नव्या आगमनामुळे हद्दपार हो़ऊ लागली आहे.एक क्रय वस्तू म्हणून या कलेन स्वत:ला बाजारासाठी सिद्ध केल आहे.तिच कलामूल्य काय आहे या पेक्षा ती खरेदी -विक्री होणारी वस्तू म्हणून तिचे अस्तित्व गृहित धरल जावू लागल आहे.आर्थिक सत्तेत असणारी कला असल्याने तिच हे रूप अटळ आहे.--कलेकडे केवळ कला म्हणून पहाणाचे दिवस आता इतिहास जमा झालेत.-- कुस्पिट म्हणतो त्याप्रमाणे -भांडवली सता स्वत:ला पूरक असणाऱ्या रचनेत,निर्मितीच स्वारस्य दाखवत असते.

 

मंगेश नाराय़ण काळे-विशेष -.टा.रविवार -१८/०२/१८ मधुन.

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

DESHPANDE DATTAMANDIR-KAGAL देशपांडे दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 3