Hesse,Eva हस्से इव्हा
स्वछंदी ,स्वतंत्र,प्रयोगशिल, पोस्ट मिनिमल चित्रकार आणि स्वयंभू शिल्पकार :
इव्हा हस्से EvaHesse
मिनिम्यालिस्म ही चळवळ -किंवा प्रवाह : कलेच्या विविध प्रकारात व रचनांत विशेषत: दृष्य कलेतील आणि संगितातील कला विषयाचे सारतत्व ,तिच व्यक्तित्व-ओळख आणि नेमके आवश्यक घटक वगळता इतर सर्व अनावश्यक रचना-आकार,वैशिष्टे,आणि संकल्पना यातून मुक्त अशी काहींशी, करकरीत निखळ विषयाची सुबोध मांडणी ही या कला प्रवाहाची मागणी -मांडणी होती -एक प्रकारे कलेतील अमुर्त अभिव्यक्ती वरील प्रतिक्रिया व पोस्ट मिनिम्यलिसम कला याना जोडणारा सेतु असही या चळवळीला संबोधता येइल.
कलाकृतीच्या मूळ-प्राथमिक-गुणविशेषा वर लक्ष्य केंद्रीत करणारी कला-दृश्यकला -तिच्या भवतालाच- अवकाशाशी नात सांगते आणि दर्शकाशी संवाद -प्रतिसंवाद स्थापित करताना -साऱ्या अनावशक गोष्टीना त्यापासून मुक्त होत- फ़ाटा-देते- टाळते -कोणत्याही रूपकाचा वापर न करता अथवा इतर उद्देशाकाडे लक्ष-न वेधता. चित्र- कलाकृतीला निखळ मूळ स्वरूपात सादर करून दर्शकाला ती जशी दिसते आहे तशीच तिच्या मूलभूत रूपात सादर करणे. थोडक्यात साधी,सरळ,सोपी ,निखळ नितळ अशी कोणतीही कलाकृती - जिच्यातून कलेचा मूलभूत उद्देश प्रतित होइल अशी कलाकृती म्हणजे मिनिम्यलिस्ट कलाकृती-
इव्हा हस्से या अमेरिकेतील १९६० च्या दशकातील पोस्ट मिनिमल आर्ट कलाप्रवाहाची पुरस्कर्त्या होत्या. भौमित्तीक व विषेशत: कामसंवेदनांच सूचक निर्देशन करणाऱ्या आकृती बंधनामुळे त्यांचे कला जगतात नाव झाले होते.रॉबर्ट मॉर्रिस,जॅकी विनसर,लिंडा बेंगलीस या सारख्या समकालीन ,समव्यसनी कलाकाराप्रमाणेच, इव्हा हस्से यानी १९६० मधील ’मिनिम्यॅलीज्म ’ची पुर्नरेखाटन व भौमित्तीक मांडणिची संरचना विकसीत करून त्याला नवे आयाम दिले.या शैलीलाच -’पोस्ट-मिनिम्यॅलीज्म ’-असे म्हणतात.
रबर,कॉर्ड,फ़ायबर ग्लास,लॅटेक्स यासारखी कोणी विचारच केला नसता असली सामग्री वापरण्याच्या त्यांच्या या उद्देशातूनच त्यांची वेगळी सॄजनता प्रतीत होते.एवढेच नाही तर त्या शिवण,टिप्पण या सारख्या खास स्त्रियांच्या म्हणून समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातील तंत्राचाही वापर आपल्या कामात करत असत.इवा हस्से यांच्या कलाकृती / रचना यांत , शारिर ऐंद्रीय जाणिवांचा, अनअपेक्षित शक्यतांचा अंतरस्तर जाणवतो.आपल्या बहुतांश कलाकॄतीत मुद्दाम अपुर्णतेची झाक आणण्यासाठी त्यानी रचनातून हेतुपुरसर कुरूपता ,किन्चित वैग्युण्य राखून मिनिम्यॅलिझमच्या निर्दोष रचनेच्या आग्रहाला छेद दिलेलेला दिसतो.
त्यानी पौरष्य-स्त्रीत्व ,काठिण्य-कोमलता,स्वातंत्र्य-बंदिवास या सारख्या परस्पर विरूध्द विषयांचे संयोजन आपल्या कलाकृतीत केलेले आहे.या विसंगतीतून जोश,दया-करुणा व अमूर्तता यांची जाणीव प्रतीत होताना दिसते.समकालीन कलावंतात,यामूळेच त्यांच वेगळेपण ठसठशीतपणे अधोरेखीत होते.
मिनिम्यालीस्ट कलाकृती- रचना प्रेक्षकाचे भवतालच्या अवकाशाशी नात रेखांकीत करण्याचा-पकडण्याचा प्रयत्न करते,इव्हा हस्से यानी आपल्या रचनेत एकापेक्षा जास्त पृष्ट्भाग-बाजू रेखून हा परिणाम साधला. इवा नी आपल्या संरचनातून कामप्रेरणांचे अंतःप्रवाह गुम्फ़ून या प्रयत्नांचा रोख प्रेक्षकाला देह भानाची जाणीव देण्यावर केन्द्रीत केला होता.त्यांच्या शिल्पकॄतीतून आढळणारे स्त्रीत्त्व,लैंगीकता आणि देहावयव यांचे परोक्ष सूक्ष्म सूचन यानी नंतरच्या काळातील कित्येक कलावन्ताना/शिल्पकाराना प्रभावित केले पैकी काही म्हणजे; पेटन कोयन,रोना पण्डिक,किकि स्मिथ,हे व यांच्या सारखे शिल्पकार होत.
इव्हांचा जन्म हॅम्बूर्ग जर्मनी येथे ज्यू धर्मिय आई-वडलांच्या पोटी जानेवारी ११, १९३६ ला झाला. त्या तीन वर्षाच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलानी नाझींपासून पळ काढून १९३९ मधे अमेरिकेत आसरा घेतला .
त्यांच्या आईने आत्महत्या केली त्यावेळी त्या १० वर्षाच्या होत्या पण कौटुम्बिक तणावात देखिल हेस्सेनी चिकाटीने आपली कला साधना चालू ठेवली होती.त्यानी १९५२ मधे School of Industrial Art, नंतर Pratt Institute Brooklyn,आणि नंतर Cooper Union येथे १९५४ ते १९५७ या काळात चित्रकलेचा अभ्यास केला.नॉरफ़ोक,कनेक्टिक्युट येथिल येल नॉरफ़ोक समर स्कूल ऑफ़ म्युझिक अॅंड आर्ट ची शिष्यवॄती मिळाल्यामुळे, त्याना न्यूव हेवन येथील येल विदद्यापिठाच्या स्कूल ऑफ़ आर्ट अॅंड आर्किटेक्चर मधे जोसेफ़ अल्बर्स यांच्या बरोबर चित्रकलेचे शिक्षण घेण्याची संधी मिळाली.१९५९ मधे बी.एफ़.ए ची पदवी घेवून त्या न्यूयॉर्कला परतल्या व तेथे त्यानी टेक्स्टाइल डिझाइनर म्हणून काम करायला सूरवात केली .
१९६१ सालच्या,ब्रूक्लीन संग्रहालय व जॉन हेल्लर गॅलरी,न्यूयॉर्क येथील समूह प्रदर्शनात त्यांचा सह्भाग होता,याच सुमारास त्यानी टॉम डॉयले (Tom Doyle ) या शिल्पकारा बरोबर लग्न केल.१९६२ साली त्यानी आपले पहिले अपारम्पारिक त्रिमितीय शिल्प Allan Kaprow, Walter De Maria, व इतर यानी योजलेल्या एका कार्यक्रमात सादर केल.पूढच्याच वर्षी हेस्से यानी न्यूयॉर्क येथील अॅलन स्टोन गॅलरीत आपल एकल प्रदर्शन केल.१९६४ साल हेस्से अणि त्यांचे पती डोयल यानी जर्मिनीत Kettwig-am-Ruhr येथे एका जर्मन कापड गिरणी मालक अणि कलावस्तू संग्राहकाच्या सौजन्याने काढले व युरोपच्य्य प्रवासात, फ़्रांस,इटली व स्विट्झर्लंड लाही भेट दिली.हेस्से यानी त्यांच्या शिल्पांचे प्रदर्शन १९६५ मधे the Kunstverein für die Rheinlande und Westfalen, Düsseldorf. येथे सादर केले.
न्यूयॉर्कला परतल्यावर त्यांचा घट्स्फ़ोट झला.आता त्याच्यां कामाला रसिक आणि समीक्षकांची दाद मिळू लागली होती.या नंतर त्यांच्या कलाकॄती कित्येक महत्त्वाच्या प्रदर्शनातून व एकल प्रदर्शनातूनही झळकल्या.१९६८ ते १९७० या काळात त्यानी स्कूल ऑफ़ व्यूजुअल आर्ट्स,न्यूयॉर्क येथे अध्यापन केले.
ज्यू धर्मिय म्हणून त्यांच्या कुटुंबियाना जर्मनीतून करावे लागलेले पलायन व अमेरिकेत घ्यावा लागलेला आसरा,आई-वडिलांची सततची भांडणे,त्यांचा घट्स्फ़ोट,आईची आत्महत्या,स्वत:चा असफल विवाह,पतीपासून फारकत,अशा एकामागून एक घडत गेलेल्या शोकात्म घटनांचा परिणाम त्यांचे मानसिक संतूलन ढळण्यावर झाला व आयुष्यभर त्याना त्यासाठी झगडावे लागले. त्यांचा कलाकृतीत याचे पडसाद नकळत उमटलेले दिसतात.
भावव्याकूळता टाळून मिनिम्यॅलिस्ममधे सुह्रदयता, मानवता आणण्यासाठी इवा हेस्से आयुष्यभर झटल्या.त्यांच्या या कामात एक जबरदस्त ताकद आहे आणि त्यात निश्चितच अंत:करणाची भाषाआहे .नियतीने या कलाकाराच कार्य मधेच खंडीत केल. ज्या वयात कलाकाराच्या कारकिर्दीला बहर यायला सुरुवात होते,अशा वयातच,३४ व्या वर्षी इव्हा हेस्से यांच १९ मे १९७० मधे मेंदूतील गाठी(ब्रेन ट्यूमर,मेंदूचा कॅंन्सर) मुळे न्युयॉर्क,अमेरिका येथे निधन झाले.
जयंत लीलावती रघुनाथ
Comments
Post a Comment