BARBARA HEPWORTH-बार्बारा हेपवर्थ
बार्बारा हेपवर्थ ब्रिटिश चित्रकार-शिल्पकार.ब्रिटिश आधुनिक /नवचित्र –नवशिल्प व अमुर्त शिल्प कलेच्या प्रणेत्या, काव्यमय शैलीतील अमूर्त शिल्पं आणि त्यासाठी हाताळलेली वेगळी सहित्यसामग्री यामूळे २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील एक प्रभावी शिल्प-चित्रकर्ती; ब्रिटन मधील अमूर्त चित्र- शिल्प कलेच्या विकासा साठीचे त्यांचे योगदान ब्रिटिश कलेच्या इतिहासात अत्यंत मह्त्वाचे मानले जाते. समकालिन शिल्पकार इव्हॉन हिचेन्स,हेन्री मूर,बेन निकोल्सन ,नाउम गाबो यांच्या बरोबरीने हेपवर्थ यांच नाव त्यांच्या इतकच सन्मानान घेतल जात. नवचित्र-शिल्प म्हणजे बार्बारा हेपवर्थ अस जणू समिकरणच तयार झाल होत. त्यांच्या प्रारंभीच्या शिल्पांत मुख्यत: आभासी नैसर्गिक आकारांद्वारे सुलभिकरण आणि ’मूर’ यांच्या शैलीशी साधर्म्य जाणवत.पण लवकरच त्या या मैत्रीपूर्ण कला सहधर्मातून बाहेर येऊन स्वत:च्या वेगळ्या वाटेवर पोचल्या. शिल्पांकनात लहान सहान,बारिक सारिक, तपशील टाळून सहज सुलभता आणता आणता त्या कळत नकळत अमूर्ततेकडे वळल्या.दगड आणि लाकूड या माध्यमावर त्या काम करत होत्या. “दगडात/वर कोरीक काम करण्यात एक विलक्षण आनंद