BARBARA HEPWORTH-बार्बारा हेपवर्थ

बार्बारा हेपवर्थ 

ब्रिटिश चित्रकार-शिल्पकार.ब्रिटिश आधुनिक /नवचित्र –नवशिल्प व अमुर्त शिल्प कलेच्या प्रणेत्या, काव्यमय शैलीतील अमूर्त शिल्पं आणि त्यासाठी हाताळलेली वेगळी सहित्यसामग्री  यामूळे   २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील एक प्रभावी शिल्प-चित्रकर्ती; ब्रिटन मधील अमूर्त चित्र- शिल्प कलेच्या विकासा साठीचे त्यांचे योगदान ब्रिटिश कलेच्या इतिहासात अत्यंत मह्त्वाचे मानले जाते. समकालिन शिल्पकार इव्हॉन हिचेन्स,हेन्री मूर,बेन निकोल्सन ,नाउम  गाबो यांच्या बरोबरीने हेपवर्थ यांच नाव त्यांच्या इतकच  सन्मानान घेतल जात. नवचित्र-शिल्प म्हणजे बार्बारा हेपवर्थ  अस जणू समिकरणच तयार झाल होत.

त्यांच्या प्रारंभीच्या शिल्पांत मुख्यत: आभासी नैसर्गिक आकारांद्वारे सुलभिकरण  आणि ’मूर’ यांच्या शैलीशी  साधर्म्य जाणवत.पण लवकरच त्या या  मैत्रीपूर्ण  कला सहधर्मातून बाहेर येऊन स्वत:च्या वेगळ्या वाटेवर पोचल्या. शिल्पांकनात लहान सहान,बारिक सारिक, तपशील टाळून सहज सुलभता आणता आणता त्या कळत नकळत अमूर्ततेकडे वळल्या.दगड आणि लाकूड या माध्यमावर  त्या काम करत होत्या. “दगडात/वर कोरीक काम करण्यात एक विलक्षण आनंद –रोमहर्षकता  आहे.” असे त्या म्हणत.शिल्पा साठी निवडलेल्या माध्यमातून/वर प्रत्यक्ष कोरून शिल्पांकन करण्यात त्या हेन्री मूर यांच्या इत्क्याच तरबेज होत्या.पण त्यांची शिल्पे-कलाकृती  मात्र भिन्न असत.मूर यांच्या कामात अमूर्ततेला नैसर्गीक मूळ आकाराचा पाया असे तर बार्बारां ची शिल्पे अमूर्त पण कोणत्याही पूर्व संदर्भाशी जोडलेली नसत.

निसर्गात आढळणारे साधे सुधे प्राकृतिक आकार  जसे दगड गोटे यांच्या मांडणी-रचने वर आधारीत आणि छन्नी –हातोड्याच  -कोरीव कामाचा अत्यल्प किंवा नगण्य वापर यातून साकारलेली शिल्पेही त्यानी केली. अभ्यास आणि चिंतनातून त्यांची शिल्पकला अधिक अधिक समृद्ध होत गेली.

१९३०-४० च्या दशकातील त्यांच्या कामात अवकाश आणि वस्तूमान यांचा अन्नोन्य संबंध, त्यांच एकमेकाशी असलेले नात –सबंध शोधण्यावर केंद्रीत झालेला होता. या काळातील त्यांची शिल्पे अधिक मोकळी-खुली व  पोकळी,आणि जाळिदार रचनातून अतंर्गत अवकाशाच मह्त्व त्याला वेढणाऱ्या वस्तूमाना इतकच महत्वाच आहे हे अधोरेखित करतात. त्यांच्या शिल्पात आणि चित्रांतून अंतर्गोल आकाराद्वारे त्या ही कल्पना परिणीत करताना  दिसतात. अंतर्गत अवकाशा चा परिचय आणि प्रत्यय आणण्यासाठी त्यानी आपल्या शिल्पात खुल्या पृष्ठ्भागावर तारां घट्ट ताणून बांधुन हा परिणाम आणला.या पुढचा त्यांच प्रयोगिक शिल्पांकन १९५० च्या दशकात त्यानी सादर केलेल्या  “ग्रुप्स “ या कामात दिसते. अतिशय तलम, झिरझिरीत संगरवराचे मानवाकृतीशी साधर्म्य साधणाऱ्या नैसर्गिक पारदर्शी आकाराच्या रचनातून  साकारलेल हे शिल्प अंतरजगताचा जादूई अनुभव देते.

 

हेपवर्थ,बार्बारा  : जन्म:१० जानेवारी,१९०३ वेकफ़िल्ड,यॉर्कशायर ,इंग्लंड ; मृत्यू २० मे,१९७५ ईव्ह्ज,कॉर्नवॉल.

 

डेम जोसलीन बार्बारा  हेपवर्थ  यांचा जन्म  हर्बट व गर्ट्रुड ( जॉन्सन)या दांपत्यापोटी झाला.त्यांचे वडिल हे स्थापत्य  अभियंता होते .भूमी निरीक्षक पदी नेमणूक झाल्यावर नोकरी निमित्ताने यॉर्कशायर परगाण्यात फ़िरताना ते बार्बाराना बरोबर घेऊन जात असत.

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण त्यानी  यॉर्कशायरच्या मुलींच्या शाळेतून पूर्ण केल.त्याना १९१५ मधे संगीत शिष्यवृत्ती व १९१७ मधे मुक्त शिष्यवृत्ती मिळाली होती. बालपणापासूनच त्याना  नैसर्गिक आकार आणि पोत या बद्दल विलक्षण कुतूहल होत.१५ व्या वर्षीच त्यानी मोठेपणी शिल्पकार होण्याचा ठरवल होत.

या ध्येयाच्या पुर्ततेच्या दृष्टीने त्यानी १९१९ मधे ’लीड्स स्कूल ऑफ़ आर्ट’ मधे प्रवेश घेतला.येथे त्यांचे सह अध्यायी होते  प्रसिध्द  शिल्पकार हेन्री मूर .या दोघांची मैत्री झाली आणि त्यांचा स्नेह अयुष्यभर राहिला. त्यांचा एकमेकां वरील प्रभाव त्यांच्या भावी शिल्पकारीच्या  कारकिर्दीच्या जडण घडणीत महत्वाचा ठरला .

मूर यांच्या बरोबरीने त्यानी ’रॉयल कॉलेज ऑफ़ आर्ट ’लंडन मधे  प्रवेश घेतला.व १९२३ मधे कलेतील पदवीका प्रात्प केली.लंडनच्या वास्तव्यात त्यांच्या अभ्यास आणि निरिक्षणाच्या निमित्ताने पॅरिसच्या वाऱ्या सूरू होत्याच.

बार्बारा हेपवर्थ  याना  १९१९-२१ स्कूल ऑफ़ आर्ट्स ,लीड्स आणि १९२१-२४ या काळात  रॉयल कॉलेज ऑफ़ आर्ट मधे शिष्यवृती मिळाली होती.त्या १९२४ च्या   Prix de Rome  स्पर्धेत २ ऱ्या आल्या पण या बक्षिसाच्या जागी त्यानी  प्रवासी शिष्यवृती स्विकारून इटलीत शिल्प आणि चित्रांचा अभ्यास केला.

त्यांचे पहिले पती   जॉन स्केअपिंग (John Skeaping) हे शिल्पकार होते आणि त्यांच्या सहवासात त्यानी इटलीत संगमरवरावरील  कोरीव कामात तज्ञ असलेल्या गिव्हानी आर्देनी (Giovanni Ardini  ) यांच्या कडून हे तंत्र शिकून घेतल. स्केअपिंग यांच्याशी घटस्फ़ोट झाल्यावर, बार्बारा, त्यांचे दुसरे पती बेन निकोल्सन (Ben Nicholson,) या अमुर्त चित्रकारांच्या सहवासात आल्या .त्यांचा प्रभाव त्यांच्या शिल्पांकनावर झाला त्या अमूर्त शिल्पांकना कडे वळल्या.शिल्पांकनातील  धारदार कडा,स्वच्छ नितळ, पृष्ठ्भाग असलेले  रेखिव भौमित्तिक आकार  हा निकोलसन यांच्या प्रभावाचा परिणाम दर्शवतात.


  


 प्रातिनिधिक चित्र रचना-संकल्पना –लेखक –-Representative Image –by Author

 पाषाण,लाकूड व विषेशत: संगमरवर या माध्यमा बरोबरीनेच त्या धातु –स्टील,लोखंड, ब्रांझ या माध्यमांकडे वळल्या. १९६० नंतर त्यांच्याकडे मोठ मोठी – २०फ़ूट ( ६ मीटर ) उंचीची शिल्पे उभी करण्याची कामे आली.पैकी गाजलेल प्रचंड शिल्प – भौमित्तिक  “चार चौरस ’” (Four-Square (Walk Through) (१९६६) होय.

जगभारातील शिल्पकला आणि कला क्षेत्रांतील नामवंत त्यांच्याशी परिचित होते आणि कित्यकांशी त्यांचा स्नेह होता. जसे की पिकसो,हेन्री मूर, ,ब्राक ,हेर्बिन, हेलिओन, इहॉन हिचिन्स, विल्यम मॉरगन Mondrian, Kandinsky, Arp, Giacometti, Miró, Calder, Moholy-Nagy, Hélion, Nicholson, Hepworth, Moore and Gabo , Moholy-Nagy, Gropius, Erni, Ozenfant .

त्याच प्रमाणे या लोकांच्या युरोपात त्या काळी  नव कलेच्या संदर्भात चाललेल्या विविध चळवळीत त्यांचा सक्रीय सह्भाग असे.नाझी-फ़ासिझम विरोधी मत प्रदर्शनातही त्यानी हिरीरीने  भाग घेतला होता.

कला क्षेत्रा बाहेरील नामांकितांशीही त्यांचा स्नेह होता.राष्ट्रसंघ (युनो)चे  महासचिव ( सेक्रेटरी जनरल) डाग हॅमरशिल्ड  हे अशा पैंकी एक होत. विमान अपघातातील त्यांच्या दुर्दैवी मृत्यू नंतर त्यांच्या ’ सिंगल फ़ॉर्म ’ या  स्मारकाच्या उद्घघाटन समारंभाला त्या जातीने  हजर राहिल्या होत्या.

त्यांच्यां कलाकृतींची सतत प्रदर्शन होत. कांही वेळा त्यांच्या पतींचा ही त्यात सह्भाग असे. एकल प्रदर्शनांबरोबरोबरच नामांकित कलकारांच्या बरोबरीने आयोजीत केलेल्या समूह प्रदर्शनातून त्यांचा सहभाग असे.ब्रिटन बाहेर विषेशत: युरोप आणि अमेरिकेत त्यांची प्रदर्शने सतंत आयोजीत केली जात. द्वैवार्षिक प्रद्रशनात त्यांच्या कलकृतीनी पारितोषिकेही जिंकली होती. ब्रिटन मधिल एक लोकप्रिय कलाकार असल्याने त्यांच्या कलाकृतींची वारंवार सिंव्हावलोकनी प्रदर्शने आयोजीत केली गेली.

त्यांच्या हयातीतच त्यांच्या आयुष्यावर व त्यांच्या शिल्पकलेवर लिहलेली पुस्तके प्रसिध्द झाली.लघूपट तयार झाले, वेस्टवर्ड टीव्ही,बीबीसी यानीही त्यांच्यावर चित्रमालिका  केल्या.  कांहीं पुस्तंकांच्या तर दुसऱ्या आवॄत्याही निघाल्या.त्यानी स्वत:ही शिल्पकलेवर अभ्यासू लेखन केल आहे.त्यानी पुस्तकांसाठी आरेखनेही केली आणि प्रत्यक्ष शल्य चिकित्सेची -शस्त्रक्रीयेचीही रेखाटने केली.संगीतिका आणि नाटकासाठी रंगमंच आणि कपडे पटाचे आरेखनही त्या करत .

त्यांची कांही प्रसिध्द शिल्पे म्हणजे  ’मदर ऍन्ड चाईल्ड ,(पिअर्स्ड फ़ॉर्म’ व मॉन्युमेंटल स्टेला”  ही शिल्पे बॉम्ब हल्ल्यात नष्ट झाली),कॉन्ट्राप्युन्टल फ़ॉर्म्स’,टर्नींग फ़ॉर्म्स’, “वर्टिकल फ़ॉर्म्स’’,’मोनोलिथ’,’मेरिडीअन’,विन्ग्ड फ़िगर’,द फ़ॅमिली ऑफ़ मॅन’, ’थीम ऍन्ड वेरीएशन’( Mother and Child. , (Pierced Form, नष्ठ झाले Monumental Stela,) Contrapuntal Forms  Turning Forms, Vertical Forms, Monolith (Empyrean), Meridian, Winged Figure, The Family of Man, Theme and Variations,) इत्यादी होत.

त्याना पहिल्या पती पासून एक मुलगा झाला होता .तो  रॉयल एअर फ़ोर्स मधे वैमानिक होता.थायलंडमधील विमान अपघातात त्याचा अपघाती मृत्यू झाला.त्याची स्मृती म्हणून त्यानी ’मॅडोना  ऍंड चाईल्ड’(Madonna and Child)  हे साकारल .

दुसऱ्या विवाहातून त्याना तीळे झाले होते  मुलगा व दोन मुली.त्यांच्या जावयाने त्यांच्या कलकृतींची सूची करून प्रसिध्द केली होती.

न्यूयॉर्क येथिल म्युजियम ऑफ़ मॉडर्न आर्ट ,टेट गॅलरी ( लंडन ) अशा प्रतिष्ठित संग्रहलयातून त्यांची शिल्पे जतन केली गेली आहेत.दुसऱ्या महायुध्दातील बॉम्ब हल्ल्यात त्यांच्या कांही कलकृती नष्ट झाल्या.

त्या आयुष्यभर कार्यरत होत्या. जिभेच्या कॅन्सरचे निदान होऊन ही त्या काम करत  होत्या.पण मांडीचे हाड मोडल्यानंतर मात्र त्यांच्या हालचालींवर निर्बंध आले.

ब्रिटन मधे त्यांनी १९४९ मधे विकत घेतलेला त्यांचा स्वत:चा  Trewyn Studio,  हा भव्य स्टुडिओ आहे.

१९७५ मधे या स्टुडिओला लागलेल्या आगीत वयाच्या ७२ व्या वर्षी दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले.आणि त्यांच्या कांही कलाकृतीही नष्ट झाल्या.

त्यांच्या मुलांनी त्यांच्या पश्चात या स्टुडिओचे ’बार्बारा हेपवर्थ म्युझियम’ मधे रुपांतरीत केल.आता ’टेट’ गॅलरी ,लंडन यानी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

 

मराठी विश्वकोशासाठी लिहलेल्या मूळ नोंदीवरून पुनर्संपादित.

जयंत लीलावती रघुनाथ


Comments

Popular posts from this blog

DESHPANDE DATTAMANDIR-KAGAL देशपांडे दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

MODERN ART -THOUGHT-FEATURES AND COMMENTARY-नव वा आधुनिककला –विचार ,वैशिष्टे आणि भाष्य

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 3