Posts

Showing posts from August, 2021

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! -1

विवाह - सोहळा- लग्न समारंभ –एक  उन्मादी   उत्सव  ! WEDDING -A FRENZIED CELEBRATION !             -1   घरच्या , जवळच्या , नातेवाईकांची , लांबच्या , बाहेरच्या , ओळखितल्या , नोकरीतल्या , सह्काऱ्यांची , नोकरीतील पदामुळे   थोपल्या गेलेल्या आमंत्रणातून   ज्या ज्या लग्नांना गेलो त्यातून आणि त्यातला तोच तोच – वधु ची तिच्या नातेवाइकासह सर्वांची ( स्त्रीयांची) दुय्यमता , मूळ ( घोर)अर्थ समजून न घेता डोळे झाकून केलेले विधी आणि   पैशाची अवाढव्य उधळपट्टी , अ न्नाची नासाडी , एक /दोन दिवसातल्या एक दोन तासात कसल्या भेटी गांठी आणि नव्या ऒळखी ? श्रींमंतीच प्रदर्शनच आणि बिझिनेस कॉंट्यॅंक्ट्स मग लोकाना नको का बोलवायला ?. या गर्दीत मुलांची हेळसांड आणि वृद्धांची हालत तर बघवत नांही.चार लोकांसमोर फ़क्त नमस्काराच नाटक तेही अगदी जवळच्या वडिल धाऱ्यांना , लग्नाला आलेल्या इतर   जेष्टांची काळजी मग त्यांचाच कोणी तरी मुलगा/नातू बघतो म्हणजे हात धरून एका कोपऱ्यात बसवतो .   १९९० च्या सुमारास आम्ही निर्णय घेतला की.नवपरिणीतांना आपले शुभ आशिर्वाद-सदिच्छा द्यायच्या , पण ,   आपण अशा लग्नाला/समारंभाला ज

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 2

  विवाह - सोहळा-   लग्न समारंभ –एक  उन्मादी   उत्सव  !                                                    WEDDING -A FRENZIED CELEBRATION !            2 थोरल्या मुलाच लग्न रजिष्टर आणि रू.१२०००/-त ( रू.६०००+६०००) केल ं आणि धाकट्याच्या समारंभ पूर्वक केलेल्या लग्नात नाइलाजानं  घेऊन गेलेल्या अगदी जवळच्या नातेवाईंकांच्या ( दोन गाडी चालकासह ) ३९ लोकांच्या जेवण्याच्या खर्चा एव्हढी देणगी एका उत्तम समाज सेवी संस्थेला देऊन प्रा यश्चित्त घेतल .   खरंतर  ९० साला पासून लग्न समारंभाला जाणं आम्ही सोडलं होतं त्यासाठी आम्ही पती पत्नीने लोकांकडून येणारे वागबाण  व उपेक्षाही सहन केलीच. पण २०१४/१५ ला स्वत:ला अति मॉडर्न किंवा सुधारलेले समजणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या विचारसरणीत काही फ़रक पडलाय का हे पाहण्या साठी मध्यम वर्गातीलच अतीउच्च मध्यम , उच्चमध्यम , मध्यम व सुखवस्तु लग्न  ’अटेंड’  करायची अस ठरवलं . पण प्रत्येक लग्नात तोच अनुभव !  पैशाची उधळपट्टी कमी जास्त , एव्हढाच तो काय फ़रक ! तेच कर्ण कर्कश्श बँड , तीच तीच गाणी , तोच तोच मेनू. जॆवतना कुणीतरी एकदा मधेच येऊन “सावकाश होऊ द्या ” चा यांत