WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 2
विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव !
WEDDING -A
FRENZIED CELEBRATION ! 2
थोरल्या मुलाच लग्न रजिष्टर आणि रू.१२०००/-त( रू.६०००+६०००) केलं आणि धाकट्याच्या समारंभ पूर्वक केलेल्या लग्नात नाइलाजानं घेऊन गेलेल्या अगदी जवळच्या नातेवाईंकांच्या ( दोन गाडी चालकासह ) ३९ लोकांच्या जेवण्याच्या खर्चा एव्हढी देणगी एका उत्तम समाज सेवी संस्थेला देऊन प्रायश्चित्त घेतल.
खरंतर ९० साला पासून लग्न समारंभाला जाणं आम्ही सोडलं
होतं त्यासाठी आम्ही पती पत्नीने लोकांकडून येणारे वागबाण व उपेक्षाही सहन केलीच. पण २०१४/१५ ला स्वत:ला अति
मॉडर्न किंवा सुधारलेले समजणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या विचारसरणीत काही फ़रक पडलाय का
हे पाहण्या साठी मध्यम वर्गातीलच अतीउच्च मध्यम ,उच्चमध्यम ,मध्यम व सुखवस्तु लग्न ’अटेंड’ करायची अस ठरवलं.
पण प्रत्येक लग्नात तोच अनुभव
! पैशाची उधळपट्टी कमी जास्त ,एव्हढाच तो काय फ़रक ! तेच कर्ण कर्कश्श
बँड ,तीच तीच गाणी, तोच तोच मेनू. जॆवतना कुणीतरी एकदा मधेच येऊन “सावकाश होऊ द्या” चा यांत्रिक नारा देऊन जातो. मग लग्नातली आमंत्रित मंडळी
आपापलं कोंडाळ करून ब्युफ़े जेवण उरकतात.
एका लग्नाचं कार्यालयच लोकांना लवकर
सापडलं नाही तर एक लग्न मुहुर्तानंतर एक दिड तासाने लागलं. लोक आपले ताटकळतायत. बर
उपचार म्हणून जे आलेले असतात त्यांची स्थिती अधिकच दयनीय.
हां दाखवायला म्हणून का होईना एक सुधारणा
झाली आहे ती म्हणजे आहेर घेतला जात नाही.पण याचं दुसरं टोकही फ़ोफ़ावतय ते म्हणजे पत्रिकेबरोबरच
भेट पाठवायची.कोणी कोणी पुन्हा लग्नातही दुसऱ्यांदा आहेर करतात .दानत आणि माणसं जपायची ही रीत मला तरी समजत नाही.
वस्तीतलीही लग्न ही अशाच प्रकारे साजरी केली जातात. रस्त्यावर
मांडव ,बॅंड जेवणावळी वगैरे.
आपण २४/२५ वर्षे या असल्या लग्नसमारंभा पासून दूर राहिलो.म्हणून
आज काल काय चालल आहे त्याचा अंदाज घ्यावा म्हणून कांही लग्नाला गेलो.ही लग्ने प्रातिनिधिक स्वरूपाची
.
àनिम्न मध्यम आर्थिक परिस्थिती,स्व कष्टाने,किंबहूना धडपड करून नोकरी –अर्थाजनाची सूरूवात केलेली आणि स्वत:च ठरवलेले लग्न –अंतर्जातीय विवाह .चर्चेत दोघांचही मत विवाह सोहळा साधा,आटोपशिर आणि शक्यतर रजिस्टर करावयाच. मुलीच्या वडिलांचा ठाम विरोध.मी लग्न करून देणार आणि थाटा माटात करून देणार !.मुलानं आवर्जून आहेर-भॆट याला नकार दिला. आई विना वाढलेल्या मुलाच्या प्रेमापोटी गेलेलो तर साजरा झालेला सोहळा तसाच एक तसुभरही फ़रक न होता. त्याच जेवणावळी,कर्कश बॅंड आणि १/२ तास उशिरान लागलेल लग्न.आपापली ताट घेऊन कोंड्याळ्यान जेऊन मोकळे . कोणी तरी अधून मधून मधेच म्हणायच
“ सावकाश होवू देत “
बऱ्यापैकी चांगली आर्थिक परिस्थिती,शिवाय लहानपणापासून विशिष्ट संस्कारात
प्रशिक्षित झालेलं मन,मतं त्यांमुळे त्याच
संस्कारात वाढलेल्या मुलाच लग्न अर्थातच त्याच कांदे पोहे,गोत्र पत्रिका गूण मिलन मार्गाने आणि आधुनिक विचाराचे
म्हणून ’ आहेर-भॆट
’ नाकारून साग्र संगीत साजर झाल.
शहराच्या उपनगरातील एका कोपऱ्यात असलेल हे कार्यालय नकाशाचा
अभाव आणि अपूर्ण पत्त्यामळे ,शहरातून यॆणाऱ्य़ा बहुतांश आमंत्रीताना
शोधाव लागल व कार्यालयात पोचे
तोवर थंडगार पोहे आणि बटाटा वड्याचा नाश्टा आणि त्याची
वेळही संपून गेली होती.
लग्ना साठी खास करून दुरून ,लांबून आलेलीनातेवाईक मंडळी आपल्या
नव्या सोयऱ्या धायऱ्यांच्या –मुलीचे सासू सासरे,किंवा जावई,नणंद आणि दिर यांच्याच सरबराईत गुंग
.
सुमारे ६००ते ७०० च्या आसपासचे आमंत्रीत आपाआपले
गट शोधत ,कोंडाळ करून उभे होते.भिडे खातीर,किंवा व्यावसायिक संबधाने आलेल्या लोकांच्या
चेहऱ्यावर सारवान हरवलेल्या उंटाचे भाव
होते.हातातील अक्षता घॊळवत कधी लग्न लागतय
आणि जेवणाची पंगत कधी सुरू होते आणि वॆळेत परत कार्यालयात व मग घरी कधी पोचणार याच गणित घड्याळ्यात (हळूच)बघून
मांडत होते.तेव्हढ्यात ’तदैव लग्नं ’ आणि “शुभ मंगल सावधान
“चा गलका झाला आणि लोकानी हात मोकळे
केले. बाहेर बॅंड इ वाजवण्याला सोसायटीने मनाई केलेली असल्याने
आतिल ध्वनी प्रणाली वरून जी कांही गाणी वाजत
होती त्या आवाजामुळे शेजाऱ्याचे बोलणे पण ऐकू येत नव्हतं.
मग नेहमीची गडबड , वधू वराना शुभाशिर्वाद देण्यासाठी रांग
लावून लोक उभे,त्यातही कांही व्ही आय पी आणि व्ही व्ही आय पीं च्या बरोबर फोटो ची गडबड.
ऑफ़िस गाठायच्या घाईत पाट/खुर्ची पटकन पटकावयाला लागते त्यामुळे पंगत असली की कोण शेजारी
येइल ते कळत नांही अन संकोचायला होत. उभ्याने आपल्याच हाताने घेण्याच्या जेवणावळीचा एक फ़ायदा म्हणजे कोपऱ्यात जावून
न लाजता जेवता येत.त्यामुळे एक एक जण आपला
आपला गोतावळा शोधून जथ्याने रांगेत उभे.कोणी
जावून टेबल पकडले,कोणी खुर्च्या उचलल्या कोणी दोन दोन
प्लेट घेवून खाण आटपायला लागले.आणि तेच नेहमीचे कोणी तरी अधून मधून मधेच म्हणायच “ सावकाश होवू देत “
ही झाली आपली नेहमीचीच लग्न !
“THE BIG INDIAN FAT WEDDING “ म्हणून ओळखल जाणारा तिततकाच म्हणता येइल असा दिखाऊ,चमको ,भपका,झगमगाटी आणि मेंहंदी,संगीत,हळदी,शादी+रिसेपशन आणि बिदाई असा फ़ेअर अॅंड लव्ह्लीच्या जाहिरातीत ल्या
पाचही दिवसांचा भरघोस लग्नोस्वव !
मध्यम वर्ग्रीय सधन (!) कुटुंबं,अंतर्जातीय उच्च शिक्षित वधुवरांचा
प्रितीविवाह सोहळा. अंतर्जातीय नातेसंबंधाना
असलेला सुरूवातीच्या नकार,नाराजीतून आता दोघेही व्याही जणू ’तुमभी क्या याद करोगे
’ ! असा समारंभ करायला उतरलेले मग ओघानच आलं ’साखरपुड्याच्या दुप्पट ’ खर्च आणि
देखावा.
मध्यम वर्गीय नोकरदारांच्या छोट्य़ा मॊठ्या बंगल्यांच्या वसाहतीतील मधला रस्ता
मांडव घालून आठ-दहा दिवसा साठी बंद केलेला.आत
प्लॅस्टिकच्या खुर्च्या अस्ता व्यस्त.लोक येताहेत जाताहेत ,चहा पाणी,फ़राळ ,जेवण चालू आहे.मग पहिल्या दिवशी रात्री संगीत
आणि मेंहंदीचा दणका ,दुसऱ्या दिवशी रात्री डीजे आणि नाचाचा
हे धुमाकूळ !शेजारी बसलेल्याच बोलण ऐकू येण मुष्कीलच पण आवाजाच्या दणदणाटाने छातीत धड धडायला लागल.तरूणाइला आवाज
कमी करायला सांगायला गेलो, तर एक संस्कारीत प्रौढ नातेवाईक म्हणाले “ चालू दे हो ,कधीतरीच अशी हौस करणार ना ही पोर इ.”!
शेजारच्या बंगल्यातील लोकांचे हे ७/८ दिवस काय हाल होत असतील त्याची कल्पनाच न केलेली
बरी.पण तेही त्यांच्या घरातील लग्नात असाच आवाजाचा धडाका लावून उट्ट काढतील ? का याच कोणालाच कांही वाटेनास झालय ? आपण कांही गैर करतोय ध्वनी प्रदूषण
करतो,इतरांच्या आरोग्याला,शांततेला,स्वाथ्याला किंबहूना त्यांच्या स्वातंत्र्यावर
आक्रमण करतो आहोत याची जाणीवच नांही.याना संस्कारीत तरी कस म्हणायच मजा म्हणजे ही सारी जनता संस्कार,धर्म,जात ,सण वार ,व्रत –वैकल्य,विधी या बाबत मात्र अत्यंत संवेदनल शील ,तीव्र भावनाशील आणि प्रसंगी भांडखोरी
आग्रही ! कर्णकर्कश आवाजाने ( डीजे,डॉल्बी-तीव्र ढोल ताशे बडवणे ) –वातावरणात एक प्रकारचा राक्षसी,रोगट,आक्रमकपणा निर्माण होते.
सुदैवाने “डीजे” ने रात्री१० च्या पुढे गाणी वाजवायच
ठाम नाकरल.त्यामुळे मंडळी नुस्तीच नाचत राहीली.
आणि लग्न समारंभ तर १०००/१२०० च्या उपस्थीतीत दोन भल्या मोठ्या हिरवळींच्या
मधे एकाच वेळी चार चार लग्न लावता येतील अशा कार्यलयातल्या सगळ्यात मोठ्या हॉल मधे.हुरडा,चाट ,पाव भाजी पासून पिठल भाकरी ,नान परोठे सह पंजाबी –मराठी पदार्थांचे
वेग वेगळे ठेले लागलेले.शेवटच्या ’शुभमंगल सावधान ’मधून हात रीकामा होतोय तो कांही मंडळी जेवणाच्या रांगेत प्लेट
घेऊन उभी.
नेहमीची गडबड , वधू वराना शुभाशिर्वाद देण्यासाठी रांग लावून लोक उभे,त्यातही कांही व्ही
आय पी आणि व्ही व्ही आय पीं च्या बरोबर फोटो
ची गडबड. व्हीडेयो शूटींग ,प्रकाशाचा झगमघाट ! विवाहाचे विधी वैगरे कोठे तरी चालले असणारच कारण मंडळी तशी श्रद्धाळू आणि धार्मिक!
आणि रिसेप्शन म्हणजे फ़ॅशन शो.एक दिवसाच्या विश्रांती
नंतर . भल्या मोठ्या हिरवळींच्या मुख्य दारा पासून आत पर्यंत गालिचा सदृष्य पट्टी,
वाटेवर रोषणाईसाठी झगमगाटी दिव्यांनी मढवलेले खांब,हिरवळीच्या निम्म्या भागात या टोका पासून
त्या टोकापर्यंत अर्ध वर्तुळात विविध खाद्य
पदर्थांचे ठेले ,पंजाबी ,मराठी इ.पूर्ण जेवणा पासून ते भॆळ-,चाट मसाला,पान ,कॉफ़ी,आईसक्रीम पर्यंत एका बाजुला नवपरिणीत जोडप
चकाचक रंगून दागिन्यान मढलेली मुलगी आणि सूटातला मुलगा आणि त्यांचे आई-वडिल चेहऱ्यावर हूकमी मंद हास्य खेळवत मंचावर अर्धे उभे/बसलेले ,समोर १००-२०० खुर्च्या
मांडलेल्या ,खूपशा रिकाम्याच, हिरवळी वर इकडे तिकडे टेबलं मांडलेली , एका कोपऱ्यात मोठ्या क्रेन सदृश्य बारला विडिओ कॅमेरा लावून शेजारच्या मोठ्या पडद्यावर स्वागत समारंभाच ३६० अंशात दर्शन..मधेच दृष्य बदलल आणि
मुलीचे फ़ोटो झळकायला लागले.कुणीतरी महिती पुरवली आता तिची संपूर्ण
सीडी लावणार आहेत. लोक बागडता आहेत. दारात दोन्ही कडची जराशी प्रौढ मंडळी स्वागताला
उभी.येणाऱ्याच हूकमी हसून स्वागत करत होते.सहज
विचारल ’यातल्या कोणाला तरी ओळखता/ते का? ’ “छे आपल हसत म्हणायच
“ या “.
सुमारे १५०० /२००० ची गर्दी ,प्लेटा घेऊन हिंडता आहेत.मधीच आठवल
तर ’मंचावर जाऊन नवविवाहिताना शुभेच्छा देताहेत मग फ़ोटो ची गडबड. चकचकीत ड्रेस,बायका दागिन्यानी लिडबिडलेल्या,पुरूष असे तसे सफ़ारी ,सूट इ.आणि कांहीं खास झब्बा पायजम्यात.मोबाईल वर फ़ोटो काढून व्हॉटस अप वर
टाकयच चालू होतच. संध्याकाळी ७
वाजल्यापासून ते तुम्ही येइपर्यंतच आमंत्रण.आता कोण कोण येऊन गेले कीती किती जणांची
पोट भरली आणि किती नव्या –जुन्या ओळखींच्य
गाठी भेटी झाल्या. आणि वधु पित्याने नक्की काय साधल ?
या लग्ना नंतर झालेल्या एका विवाह समारंभात
हाच वधुपिता व्याह्यांच्या मागे ( हात जोडून)
सतत हव नको बघायला उभा होता. ते जरा बाहेर गेल्यावर इतरांची चौकशी करायच त्याला सुचल !.
दोन वर्षानी नंतर पुन: असच आणखी दोन विवाह समारंभाना हजेरी लावली “THE BIG INDIAN FAT WEDDING “च्याच प्रकारातील या समारंभातआणखी दोन गोष्टींची भर पडली होती.एकात संगीत-मेंदी कार्यक्रमात नववधुच्या आजवरच्या आयुष्याच नाट्य रूपांतर(व्यावसायिक नृत्यदिग्दर्शकच्या साहाय्याने -इ.)व्हिडिओ शूटींगसह -सादर.आणि अत्यंत महत्वाच म्हणजे विवाह्पूर्व साग्रसंगीत शांभवीयुक्त शाही भोजन! दुसऱ्या लग्नात हा कर्यक्रम स्वागत समारंभाला जोडून ठेवला होता.
आता तर LIVE
STREAMING -हातातल्या मोबाइलवरून त
विवाह हा आयुष्यातला सुख सोहळा खराच आणि तो दिमाखात (!) साजरा करण्याची मानसिकताही समजू शकते.पण हा दिमाख दाखवण्याला/झगमगटाला कांही मर्यादा हवी ?
समारंभाला उत्सवी स्वरूप आल की त्यातली
उत्क्टता संपते आणि उरतो फ़क्त उन्मादाचा समारंभ.एकदा उत्सव झाला की संस्कार थांबतात
आणि उरतो श्रीमंतीचा देखावा.या भपके बाज सजावटीला श्रीमंतीचा एक उन्मादी दर्प येतो. बेगडी,भंपक,दिखाऊ प्रतिष्ठेच्या मागे लागून स्वत:च्या
मुलीच्या/मुलाच्या लग्नाच्या वेळी कसली भ्रांती येते की इतर वेळेस समानतेच्या ( आर्थिक,स्त्री-पुरूष,धर्म,जात ,वर्ण,वंश) गप्पा मारणारे हे
आई-वडिल(पालक) पुन: त्याच वाटेने का जातात ? (हिदू विवाह पद्धती,(पवित्र की विचित्र)विचारवेध -मुग्धा देशपांडे -किस्त्रीम दिवाळी -१९९९)
जयंत लीलावती रघुनाथ
Continued ----3
COMMENTS ARE MOST WELCOME
Comments
Post a Comment