WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! -1

विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक  उन्मादी  उत्सव  !

WEDDING -A FRENZIED CELEBRATION !            -1

 

घरच्या , जवळच्या,नातेवाईकांची ,लांबच्या, बाहेरच्या ,ओळखितल्या,नोकरीतल्या ,सह्काऱ्यांची, नोकरीतील पदामुळे  थोपल्या गेलेल्या आमंत्रणातून  ज्या ज्या लग्नांना गेलो त्यातून आणि त्यातला तोच तोच – वधु ची तिच्या नातेवाइकासह सर्वांची ( स्त्रीयांची) दुय्यमता, मूळ ( घोर)अर्थ समजून न घेता डोळे झाकून केलेले विधी आणि  पैशाची अवाढव्य उधळपट्टी ,न्नाची नासाडी ,एक /दोन दिवसातल्या एक दोन तासात कसल्या भेटी गांठी आणि नव्या ऒळखी ?

श्रींमंतीच प्रदर्शनच आणि बिझिनेस कॉंट्यॅंक्ट्स मग लोकाना नको का बोलवायला?.या गर्दीत मुलांची हेळसांड आणि वृद्धांची हालत तर बघवत नांही.चार लोकांसमोर फ़क्त नमस्काराच नाटक तेही अगदी जवळच्या वडिल धाऱ्यांना, लग्नाला आलेल्या इतर  जेष्टांची काळजी मग त्यांचाच कोणी तरी मुलगा/नातू बघतो म्हणजे हात धरून एका कोपऱ्यात बसवतो .

 

१९९० च्या सुमारास आम्ही निर्णय घेतला की.नवपरिणीतांना आपले शुभ आशिर्वाद-सदिच्छा द्यायच्या, पण, 

आपण अशा लग्नाला/समारंभाला जायच नांही. लग्न जर  मोजक्याच जवळच्या,आप्त ,मित्रपरीवारात आणि छोट्याश्या कौटुंबिक समारंभात करणार नसतील आणि असेच वरील प्रमाणे समारंभ पूर्वक  पैशाची अवाढव्य उधळपट्टी  इ.करणार असतील तर मग अगदी घरातील- सख्या पुतण्या/णी,भाचा/ची च्या लग्नाला सुद्धा ! नोकरीतील वरिष्टाच्या घरातील असो वा सख्या  मित्राच्या मुला/लीचे  लग्न असो आणि तो निर्णय आम्ही कटाक्षाने आजवर पाळत आहोत. या निर्णया पोटी  सहन करावा लागलेला एक प्रकारचा ’बहिष्कार (वाळित)’,आणि आमच्यावर झालेला भडिमार, माणूसघाणे पणाचे आरोप ते तु(आ)म्हाला लग्न संस्थाच मान्य नांही पर्यंत येऊन पोचला.

र पक्षाचं वर्चस्व,वधु पक्षाचं दुय्यमत्व सवाष्ण स्त्रीची प्रतिष्ठा,विधवा स्त्रियाना मिळणारी वेगळी वागणूक,हुंडा,देण घेणं,मानपान,जेवणावळी,एका दिवसाकाठी खर्च होणारा अमाप पैसा,त्या मागील खोट्या प्रतिष्टेपायी छुपी स्पर्धा.या सर्वामुळे समाजावर होणारे दुष्परिणामही मन बेचैन करत होते---

 

झापदबंद लग्न पद्धत ! तणाव पूर्ण वातावरणात बोलणी सूरू होतात.”प्रतिष्ठेप्रमाणेण लग्न व्हाव एवढीच आमची अपेक्षा ! पदराला जरा जास्त खार लागला तरी हरकत नांही अस मनात म्हणत मुली कडची मंडळी मान तु(झु)कवतात.सह्या होतात .सगळे सुटकेचा श्वास सोडतात.( लग्न समारंभ -एक आढावा -मुग्धा देशपांडे -स्त्री -मे -१९९५ मधून )

 

सुशिक्षित आणि तथाकथित सुसंस्कृत समाजात सुद्धा मुलंमुलीं  हुशारीन एका भयानक पद्धतीने बाजारात आणली जातात.बाजारासारखे सर्व व्यवहार,घासाघीस करून होत असले तरी त्याला सौदेबाजी न म्हणता परस्पर संमतीनं होणारी देवाणं घेवाण असं म्हटलं जातं.या व्यवहाराला नाव आहे-लग्न.या व्यवहारात वधु आणि वर दोघही विकली आणि खरेदली जातात.” (’माणसाची किंमत’-लेख-.विद्या बाळ )

 

त्या मुळेच मुली कडच्यांनी इ.स.पू.काळापासून चालत आलेले रिवाज तक्रार करत पण पाळत  रहायचे.एकाच भेटीत ’पसंत’ करायच.आईवडलांनी सौदा करायचा आणि  दुसरीकडे या सर्वाची सुरेख शब्दात भलावण करत राहायची.   

लग्नाच्या (एका) दिवसात –क्वचित दोनदा(स्वागत समारंभात पण) ’तट्ट पोट’ भरलेल्यांवर५/६ आकडी रक्कम उधळण/चुरा करण यात काय आनंद असेल तो  असो.१०/१५ प्रकारच्या पदार्थानी भरलेली ताट/ विविध व्यंजनांचे स्टॉल्स, कळत नांही की या तट्ट  पो भरलेल्यावरच हा जेवणाचा मारा का आणि वाया जाणर अन्न यांचा काही तळमेळ आहे का नांही.

 

सुशिक्षित, सुसंस्कृत(?) म्हणून मिरवणाऱ्या मध्यम वर्गात एका बाजुला कमालीचा संकुचित पणा आणि ’अलूफ़नेस’ एकारेलेपण –आणि अलिप्तपणा आलाय . मग लग्नसमारंभाला  मात्र बादरायण संबंध आठवून आठवून बोलावून  मोठ मोठ्या जेवणावळी उठवावयाच्या.यामागचे प्रेमाचे उमाळेही दांभिक आणि कोरडेच.अमुक इतका खर्च ,हजार माणस जेवली,बेत सुरेख होता यात आत्म प्रौढी असते आणि वधु पित्याची  खर्चा पोटी उभ्या केलेल्या ऋणाची चिंता हसुन लपवण्याचा (केविलवाणा) प्रयत्न असतो.धार्मिक विधिचा बडगा जर आधुनिक म्हणविणाऱ्या माणसाच्या मनात नसता तर विवाह समारंभाला फ़क्त बेगडी प्रदर्शनीय ,उत्सवी  रूपच त्यान दिल असतं.

भव्य कार्यालय,वीजेची –फ़ुलांची नेत्र दिपक (डोळे दिपवून टाकणारी) रोषणाई,भारी कपड्यांचा,दागिन्यांचा फ़ॅशन शो,फ़ोटो,व्हिडीयो-हे काय दर्शवत ?

परंपरेचा भास आणि हौस यांची बेमालूम मिसळ आजच्या लग्न समारंभात दिसून येते.पुन्हा जो तो या ’शो बिझनेस मधे आपापला वाटा किती अदबीनं व तत्परतेने उचलत असतो ! [ हिदू विवाह पद्धती,पवित्र की विचित्र)विचारवेध -मुग्धा देशपांडे -किस्त्रीम दिवाळी -१९९९ ]

 

जागतीकी करणाचा ,मुक्त अर्थ व्यवस्थेचा आणि एका अर्थाने जवळ येत चाललेल्या –संकोचणाऱ्या जगाने  -’स्व’ वाद’ मी ’ आधी,स्पर्धेत टिकून रहायच्या नावा खाली दुसऱ्याला टाचे खाली दाबायला संकोच वाटत नाही.’ओरबाड’ वृत्ती वाढीला लागली आहे.चंगळ वाद  फ़ोफ़ावत आहे.पैसा हेच अंतीम सुख ! श्रीमंती दाखवण,श्रीमंत असण आणि झटपट श्रीमंत होण हेच आजच्या घडील महत्वाच होऊन बसलय.!-

 

--“पैसा फ़ेका आणि मजा करा “ पारंपारिक संस्कृतीमुळे,कुटुम्ब,स्नेही मंडळी श्रद्धा अशा पारंपारिक गोष्टीमधून  जगण्याला आपसूक मिळणारा अर्थ आणि ’कशासाठी जगायच ?’ हा हेतू पार बदलून टाकला आहे .अभ्यासकांना असं वाटतं की,बहुतेक माणस कांही तरी विकत घेणं ( वस्तु/सेवा/व्यक्तींचा वेळ ..) यातच आनंद शोधताहेत. समृद्धीच्या अतिरेकामुळे निर्माण झालेली मनातील अनामिक पोकळी भरून काढण्या साठी ’ये दिल मांगे मोर’ चा घोशा आपण लावून घेत आहोत का ?  -

--- हा ’दिल मांगे मोर’ दृष्टिकोन खरं तर आपल्याला काय देतो माहित आहे  का? एक प्रकारची चिंता,रूखरूख,ताण आणि हो द्वेषसुद्धा! अनेक शास्त्रीय अभ्यास हेच दर्शवतात की किमान गरजांची पुर्ती झाल्यावरही जर मिळण्याची ’वखवख’ कायम राहिली तर ती असामाधानाकडे नेते.

या समृधी –स्पर्धे च्या चक्रात ’पळा पळा कोण पुढे पळे तो ’—अस जे अडकतात ,त्याना लक्षात येत की जी समृधी  येतीये ती हजार वाटानी वाहून पण जातं आहे !

[कशासाठी ? पोटा(नोटा) साठी .(.अनघा लवळेकर –लोकसता-१८/०७/१५ च्या चतुरंपुरवणीतून ]         

 

--दोन मंगलाष्टक झाली की ,मधेच आशिर्वादाचा कार्यकम सूरू होतो.झाडून सगळ्या पक्षाचे पुढारी,गटा तटाचे नेते,आध्यात्मिक क्षेत्रातले महाराज मंडळी सारे पुढे सरसावतात,वर उन्हाची काहिली आणि खाली हा सारा प्रकार.महिला,लहान मुलं आणि सर्वांचाच जीव भुकेन आणि तहानेन व्याकूळ झालेला असतो, साऱ्यांन्या त्याचे कांहीच वाटत नांही.—वीस वर्षापासून मीही आशिर्वाद दॆ थांबवलय.विवाह हा एक अगदी कौटुम्बिक असा सोहळा आहे.त्याला मोठ अस सार्वजनिक स्वरूप येत चाललय. या सगळ्या भव्य-दिव्य लग्न समारंभाची रसभरीत  वर्णन छापली जात्तात --- समाजातील गरीब-दारिद्र रेषेखालील विवाहोत्सूक तरूण/तरूणींच्या मनावर याचे काय परिणाम होत असतील ?   समाजामधे कुठले आदर्श आपण घालून देत आहोत याच भान सुटत चाललं आहे.—

--- आपली संस्कृती ही कुटुम्ब- व्यवस्थेवर आधारीत आहे आणि ---त्याचा पाया विवाह्संस्था आहे. त्यालाच बटबटीतपणाच स्वरूप यायला लागल आहे.—

--- दोन्ही कुटुम्ब ,मोठा मांडव घातला –खूप लोक जेवले –खूप दारू उडवली यातच समाधान मानतात.---

( यशवंतराव गडाख लिखित ’अंतर्वेध ’ या ऋतुरंग प्रकाशनाच्या पुस्तकातील प्रकरणाचा संपादित अंश –लोकमत ,पुणे   रविवार २२/०४/२०१२  अंकातून.)

 

---- एकूणच हे लग्न म्हणजे बिग बजेटचा हिंदी चित्रपटच --! पूर्वायुष्यात गरीब असलेल्या आणि सरकारी नोकरीत मजल –दर मजल करत वर वर पोचलेल्या एका नव श्रीमंत बापान आपल्या छकुलीच्या लग्ना साठी अशी प्रतिभा आणि पैस खर्च केला होता.

पाण्या सारखा पैसा आणि पैशातून खुलून दिस्णार लग्न अशा समारंभात कुणी विचार करत नाहीत की हा इतका पैसा येतो /आला कोठून ?जगातला एक श्रीमंत अंबानी लग्नावर असा पैसा उधळत नांही तर ’कर ले दुनिया मुठ्ठींमे ’म्हणत तो फ़ोन मधे पैसे गुंतवतो.लग्नात नाही.मग नव श्रीमंताच्या भेज्यात अशी कोणती रासायनिक प्रक्रीय सुरू असेल की भपक्याला,ऐष्वर्याला आणि खालून वर सरकणाऱ्या स्टेजलाच तो लग्न म्हणायला लागला. ? या प्रेमळ बापान कुठून आणला पैसा ! अस कुणी विचरणार नांही .कारण लोकांकडं पैसा कोठून आला ,याच ऑडिट करणाऱ्या संस्थेत तो काम करतोय ---बुद्धाच्या नावानं ’ सम्यक काया’,सम्यक संग्रह’ चा रोज रोज उच्चार  करतोय.---  

---लग्न म्हणजे एक संस्कार सोहळा की डोळ्यांच्या बाहुल्या क्षीण करणाऱ्या, फ़्लड लाइटचा मारा (बॅंड, तुम्हाला पटो ना पटो १०-२० लाखांचे डीजे लग्नात वाजवणारेलोक आपल्या कडे आहेत आणि संगीत ) कांही कळत नांही.सजावट प्रचंड झाली की तिचाचाही तिटकारा येतो.संस्कार झाकून जातात.—

-- लोकाना लग्नासाठी बोलवायच की ( स्वत:च) ऐष्वर्य दाखवण्यासाठी?—नवश्रीमंत नसलेले  आणि कागदाच कार्ड हातात घेऊन ’बीपीएल’ च्या लायनीत लटकलेले कोणता आदर्श घेतील यातून ? ----अकराच लग्न पाचला लागताना मी पहिलय.मारुतीच्या मूर्तीसमोर अडणारा नवरा आणि झिंगणारे त्याचे गणगोत  पाहिलेत–( उत्तम कांबळे –फ़िरस्ती-’लग्न एक बिग बजे शो ! –सकाळ –रविवार १०/०५/२०१५ सप्तरंग पुरवणीतून  )

 

तीन दशकापूर्वी ,१९९०च्या मुक्त अर्थिक खुलेपणा-पर्यंत लग्न समरांभ हा साधारणत: घरगुती स्वरूपाचा कांहीसा कौटुंबिक मेळाव्याच्या स्वरूपाचा होता.मुक्त अर्थव्यवस्थेतून मध्यम वर्गाची नुस्तिच आर्थिक परिस्थितिच सुधारली नाही तर मानसिकताही आणि दृष्ट्रीकोनही बदलला.मध्यमवर्गीय मानसिकतेतून एकदम नवश्रीमंत -आणि ती श्रीमंती दाखवव्ण्याच्या -मिरवण्याच्या मानसिकतेत तो कधी झाला हे त्याला कळाल नाही.जबाबदार ,बंधिलकी मानणारा, ,अथित्यशील,तत्वनिष्ट,मूल्यमानणारा म्हणूनच समाज प्रभोधनात ज्या वर्गाकडे आशेन पाहिल जात (असे) आता त्या असा अचानक लाभलेल्या श्रीमंतीन बदलेल्या, या वर्गाने लग्न समारंभाला एक उत्सवी रूप आणलं.आहेत पैसे माझ्याकडे तर ते मी खर्च करणार.

त्यामुळे आता विवाह सोहळा न राहता तो विवाह -समारंभ झाला आहे.

आता आगदी लहान सहान गोष्टीपासून ते ,विवाह स्थळ,ते सजावट,ते,जेवणावळी-खाण्याचे पदार्त,हे सार उत्कृष्ट -एक नंबर हवं.या मागणीतून - लग्न समरंभाचे नियोजन व्यवसायाची उलाढाल अंदाजे ७००० कोटी रुपये (२०१५साली)इतकीपोचली.

निश्चित रकमेच्या अंदाजी लग्नातील साध्या फ़ुलांच्या सजावटी साठी  २०,०००/-रुपये,तर पंचतारांकीत हॉटेलातील रेखिव सजावटी चा खर्च रु.५लाख अधिक.इतका करण्याची तयारीही आहे.

 

फ़क्त सजावटी आणि मेजवानी ते -शाही खाना यासाठी लोक रू.एक कोटी सहज खर्च करायला तयार आहेत.उच्च मध्यवर्गीय तर बचत करून लग्नात ३ ते ६ कोती रुपया पर्यन्त खर्च करतात.

शाही  विवाह्सोहळ्या-समारंभा बाबत तर विचारच करायला नको..सहज १०ते २०कोटी रुपयाचा मामला आणि अति उच्च श्रीमंतांच्या विवाह उत्स्वात २० कोटी रु पासूनच पुढे –

[ ५जाने,२००१४ द.हिंदू मधील रश्मी प्रताप यांच्या लेखातून-रश्मी प्रताप या Assistant Editor at Harper's Bazaar Bride मधे कार्यरत आहेत.]  

 

परत विवाह्पूर्व फ़ोटो शूटींग,डेस्टीनेशन वेडिंग,अत्यंत महागडी निमंत्रण पत्रिका आणि त्या सोबत तशीच महागडी भेट (सोन्याच्या वर्खाची पत्रिका आणि सोन्याचीच भेटवस्तू शिवाय सोबत सुकामेवा,हागडी चॉकलेट इ.).

केवळ लग्नातील ’लेहंगा"२ लाख रुपयांचा,मग कपडे आणि दागिने हे अंतरराष्ट्रीय डिसाइनर्स कडूनच हवेत.

 

BIG FAT INDIAN WEDDINGhttps://1drv.ms/w/s!AgGy5_eDat9Qry6VzLES1nKaluGo


नम्र विनंती -वरील लेखावरील आपले मत-सूचना जरूर द्याव्यात

COMMENTS ARE MOST WELCOME

 

 Continued – 2

Comments

Popular posts from this blog

DESHPANDE DATTAMANDIR-KAGAL देशपांडे दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

MODERN ART -THOUGHT-FEATURES AND COMMENTARY-नव वा आधुनिककला –विचार ,वैशिष्टे आणि भाष्य

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 3