A BRIEF ENCOUNTER -एक छॊटीशी मुलाकात
एक छॊटीशी मुलाकात -- सिनेमाचे जग म्हणजे सर्वांच्या कुतूहलाचा विषय या दृकश्राव्य माध्यमाने भुरळ घातले नाही असा माणूस विरळाच या जादुभरी दुनियेत डोकावून पाहायचं , त्याचा अंतरंगाचे दर्शन घेण्याचा मोह सर्वाना पडतोच. बस मधून , रेल्वेतून प्रवास करत असताना जर कोठे रस्त्याच्या बाजूला , शेतात एखाद्या शूटिंग चालू असलं , तर , बस , ट्रेन मधील सारी डोकी-नजरा अगदी ड्रायव्हरसह तिकडे वळणार्च ; अशा या माध्यमाचा वापर व्यापारी तत्वावर मोठ्या प्रमाणात होणार निश्चितच पण- साहित्य , चित्रकला , संगीत-नृत्य , शिल्प ,- नाट्य जणू सा़ऱ्या चौसष्ट कलांचं एकवटलेल्या या माध्यमाकडे सर्जनशील , सशक्त , कसदार , कलाकृती निर्माण करण्याच एक प्रभावी साधन म्हणून पाहणारेही कमी नाहीत. चित्रपटांच्या या जगात सत्यजीत रे , आकिरा कुरुसोवा , फ़ेलिनी , डिकासा , मायकेल ऍंजेलो ऍटनी -- -- या सारखे श्रेष्ठ , प्रतिभावंत दिग्दर्श्क आपल्या अजोड कलाकृती , चित्रपट यांच्यामुळे , इतर क्षेत्रातील दिग्गज जसे , लि़ओनार्ड द विन्ची , मायकेल ऍंजेलो , पिकासो , वा शेक्स्पियर , कालिदास किंवा बेथोवेन , तानसेन हे किंवा त्यांच्या सारखे ,