WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 3
विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव !
WEDDING -A
FRENZIED CELEBRATION ! 3
अगदी १९५०/५१ साली प्रचारात असलेली लग्न ठरवायची- कांदे पोहे पद्धत आणि त्यावेळचा लग्न समारंभ आणि आजही ६०/६५ वर्षानंतर वरवरचा पोषाखी फ़रक सोडता म्हणजे पोह्याच्या ऐवजी उप्पिट –कदाचीत पिझ्झा आणि वॆळेच्या मर्यादेमुळे (constraint मुळे ) आवरत –आवरत एका दिवसावर,कांही तासावर आणलेले विधी सोडता यात फ़ारसा फ़रक पडलेला नांही.फ़रक झाला आहे तो समारंभाच्या स्वरूपात. स्पर्धा आणि बेगडी श्रीमंतीच प्रदर्शन याच्या हव्यासाने ओलांडलेलल्या परिसीमेतून समारंभाला आलेला दिखावू,उत्सवी आणि कांहीस उन्मादी स्वरूप यात.
उच्च शिक्षितमुल/मुली झापड्बंद
त्याच त्याच मार्गान लग्न ठरवताना दिसता आहेत.
दोघानीआधी भेटून एक मेकाना थोडफ़ार अजमाऊन,समजावून घायचा प्रयत्न करा,मग मोठी माणस भेटू देत, या युगात कसले गोत्र आणि पत्रिका घेऊन
बसला आहात,तर कधी मुला/मुली चा आग्रह तर आई वडिल
तर यावर एकदम ठाम ! कधी जुजबी पत्रिका बघायची म्हणायच तर मंगळ आणि एक नाड कांही बाही
.
-
लग्नाच्या आधी बोलताना आम्हालाही साधाच ,छोटासा समारंभ करायचा आहे वैगरे बोलण
!मात्र लग्न एक्दम जोरात!.व्याह्यांचा विषेशत: वधु पित्याचाचा आग्रह पडला,ते ऐकेचनात आणि सर्वात म्हणजे लोक काय म्हणतील आणि माझी प्रतिष्टा ? म्हणजे नक्की काय बुवा!
--
आपल्या अनुपस्थितीने परिस्थितीत फ़रक
पडत नसला तरी निषेधात्मक का होइना चर्चा होते हे ही नसे थोडके .आमच्या निषेधात्मक गैर
हजेरीतून मित्र,नातेवाईक आणि इतर मंडळींच्यात कांही
थोडा फ़ार फ़रक पडला म्हणजे या निमित्तान एखाद्या
सामाजिक कामाला देणगी देणं,निमंत्रींतांची जाणिवपूर्वक चौकशी करणं,आहेर-भेट वस्तू-फ़ुलं/पुष्प गुच्छ वस्तू
ना पूर्ण नकार .मान-पानांच अवडंबर न करणं इ.पण पोटं भरलेल्या निमंत्रीतांच्या
जेवणावळीतील आमंत्रीतांची संख्या मात्र चढ्त चढत आता १९००-२००० +पर्यंत पोचली आहे. आणि समारंभाचा देखावा ,वधु वरांचे पोषाख,दागिने आणि रोषणाईन तर सीमा ओलांड्ल्या
आहेत.आपल्या लग्नात मुलीचा पक्ष ( बाजू नव्हे) हा कायमच दुय्यम स्तरावर ( अजून ही राहिला
) आहे.मान पान नको नको म्हटल तरी वधु चे माता पिता सतत धास्तावलेले असतात.कधी सरळ तर
कधी आड वळणाने आलेल्या मागण्या कशा पुऱ्या करायच्या चिंतेत असतात.
अगदी जीन-टीशर्ट घालून फ़िरणारी आणि
सूट घालून नोकरी वर जाणारी उच्च शिक्षित मुलगी
लग्नात एकदम रूढ आणि पारंपारीक पोषाख आणि विधीयुक्त लग्नाचा आग्रह धरते.आणि मुलाच तर विचारूच
नका ५-५ वर्षे जिच्या बरोबर फ़िरला-प्रेम वैगरे केलं असा हा ;लग्न ठरवताना आपल्या आई वडलांच्या मागे लपतो.
लोकमत –हॅलो पुणे –रविवार २/०८/२०१५ – लोक्मत सर्वेक्षण
हुन्डा प्रथेची दहशत अजुन कायम पध्दत बदलते आहे . एक रकमी रोख स्वरूपा ऐवजी महगड्या चैनीच्या वस्तु,फ़्लॅट,बंगला गाड्यांची हौस
,तिच्या पगारातून कर्ज
काढणे इ. : हुंड्याला विरोध करणे
अवघड जाते का? हो -७८% नाही ३% कांही प्रमाणात -१९% .मागणी नसताना- माहेरच्यांचा देण्याचा
आग्रह : होय ४३% नाही ५७ % हुंड्या साठी प्रत्यक्ष
अप्रतक्ष धमकी हो ४०% नाही ६०%उदा: विमानानेच पाहुणे येणार
,पर्देशात हनीमून पॅकेज,सोन नाण बरोबर हिऱ्यांच्या
दगिन्यांचा आग्रह तर सरळ सरळ खर्चासाठी लाखोचे चेक इ.मित्र परिवारात हुंडा
बळीची घटना हो २९%
|
महाराष्ट्र टाइम्स :,पुणे गुरूवार ३०/७/२०१५ :धावते जग
विवाह बंधन हे अत्यंत पवित्र बंधन असते आणि ते धर्मशास्त्रानुसार होण्यातच त्याचे
सार्थक असते ही हजारो वर्षाची परंपरेने रुजलेली समजूत सर्व स्तरातील,सर्व गटांतील
माणसांच्या रक्तात इतकी खोल भिनली आहे की तिचे पालन करण्यासाठी माणसे जीवाचेरान
करतात.कुटुंबाची प्रतिष्ठा सोहळ्यवरील खर्चावरुन ठरत असल्याने आणि लग्न हा केवळ व्यक्तिगत
वा कौटुंबिक नव्हे
तर सामाजिक विधी ठरवला गेल्यामुळे ही प्रतिष्टा जपण्याचे सामाजिक
दडपण माणसांवर येत व त्या पोटी ती कर्ज बाजारी होतात.भारतीय अर्थ व्यव्स्थेत माणसांचे
कंगालीकरण होण्याची जी कारणे आहेत त्यातील प्रमुख कारण हे लग्नातला खर्च हे आहे. पुरूषप्रधान व्यव्स्थेत लग्न संस्थेची
सूत्रे कायम वरपक्षाच्या हातात राहतात आणि
वधुपक्षाला दुय्यमत्व येऊन अनेकदा तो शोषितांच्या भूमिकेत वावरतो.यातूनच पुढे हुंडा
बळी,कौटुंबिक हिंसाचारशा सामाजिक समस्या
उभ्या राहतात.ज्याचे अंतिम पर्यवसान मुलींकडे जोखिम म्हणून बघण्याच्या
समाज्याच्या मानसिकतेत होते.त्याचे अनेक दुष्परिणाम आपण राजरोस अनुभवत आहोत.त्याच्यावर
उपाय ही शोधत आहोत पण लग्न सोहळा साधा करणे हा सोप्या
उपायापर्यंत आपण येत नांही. ----
लोकसत्ता –शनिवार ,१८/१०/१४ –’अन्न ’अ’ पूर्णा ! –पंकज
भोसले : --संयुक्त राष्ट्र पाहणी मधे -जगातील
श्रींमंत असलेल्या देशांच्या यादीत भारत अकराव्या स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे तरी भारत आणि इंडिया यातली दरी कमी होण्याची चिन्हे
नाहीत.---भारतात १९.७ कॊटी
लोकाना अर्धे अन्नही मिळत नाही .१५.५ % लोकाना उपाशी पोटीच झोपावे लागते.----- शहरामधील प्रगती,जागतिकीकरणाची फ़ळे,वर्ल्ड ब्रॅंडसचा सुळ्सुळाट,पैशाचे उधळपट्टी आणि चैनीच्या
जीवन शैलीचे वाढते प्रमाण ’इंडिया’तल्या ’भारता’तील सक्तीचा उपवास वाढवत नेत आहे.----बेंगलोरू,मुंबई,पुणे,दिल्ली आणि वाढत असलेली शहरे अन्न नासाडीमधे आघाडीवर आहेत. |
समाजातील आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरावरील
कुटुंब --- लग्न प्रथेचे सामाजिक नियम पाळताना सर्वाधिक भरडले जाते..
--देसाइ ग्रामस्थ
(आगरी समाज )मंडळीनी लग्नातील अनावशक विधी ना फ़ाटा देऊन
खर्चाला कात्री लाव्ण्याचा गेतलेल्या या सामुदाइक निर्णायाचे स्वागत करयला हवे
कोल्हापुर येथिल श्री.जाधव या रिक्षा
चालकानी आपल्या मुलीचा विवाह एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
हा तेजस आणि ऐश्वर्या यांचा आंतर्जातीय
विवाह ,कोणत्याही रोषणाई,मांडव आणि
झगमगाटाविना कार्यालयाऐवजी भर चौकात साजरा झाला.वधुचे कन्यादान वृद्धाश्रमातील आजी
आजोबानी केल तर लग्नाला अंध मुलांच्या बॅंड बोलावला होता.तांदळाच्या अक्षता ऐवजी फ़ुले आणि पकळ्या याचा वधुवरांवर वर्षाव करून लग्न
लागल.आहेर द्यायचा झाल्यास तो रोख स्वरूपातच द्यावा अशी विनंती करून तो अनाथाश्रम,अंधशाळा इ. समाजसेवई संस्थांच्या
नावाने ठेवलेल्या ड्ब्यात गोळाकरून त्या त्या संस्थाना दिला जाणार होता.सर्वात महत्वाचे म्हणजे ’जेवणावळीवर ’खर्च नकरता सर्व उपस्थिताना मसाला दूध देण्यात आले
. ---[ ९/१२/२०१५ झी मराठी रात्री ८ चे बातमी पत्रावरून.]
आणि आता या करोनाकाळघातान कांही शहाणपण आल अस वाटतय म्हटल तर मंडळी यातूनही पॆटलेली-चक्क अख्ख विमानच भाड्याने घेऊन लग्नाला फ़क्त ५० व्यक्तींच्या उपस्थिती परवानगीच्या नियमाला टांग मारून सहज १५० जणांच्या साक्षिन आकाशात लग्न लावणारेही महाभाग निघाले.आता आपली एवढी माणस ओळखीची,जवळची.व्यावसायिक संबंधाची आणि नातेवाइक तर इकडचे आणि तिकडचे पण लग्न समारंभाला फ़क्त २५/५० व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी मग काय आपला नेहमीचा मेंहंदी,संगीत,हळदी,शादी+रिसेपशन आणि बिदाई शिवाय माणस धर्मिक आणि परंपरा जपणारी म्हणजे ग्रहमक,सत्य नारयणाची पुजा वगैरी यात मग हे ५० लोकांच गाणित अस विभागून बसवायच .नियमही पाळला आणि लोकाना जेवायलाही घातल अंदाजे सहज ३००-४०० माणसांच गणित जमतयकी-
म्हणूनच वाटतय २५/५० व्यक्तींच्या उपस्थितीच्या नियमाने तरी विवाह समारंभावरील होणाऱ्या अनावश्यक खर्चाची कांही जाणिव झाली असेल का? कारण कांही हजारो विवाह थांबवून-पुढे ढकलले आहेत.धूमधडाक्यात पैसे उडवायचे असल्याने थोड थांबायला काय हरकत !
या साऱ्यात प्रश्न पडतो की इतका खर्च
करण्या इतका पैसा यांच्या कडे येतो कोठून.?कांही समाजात खर्चिक विवाह आणि भरगच्च
वरदक्षिणा आणि मुलगा आणि त्याच्या कुटुंबाला /वर उधळण हा रिवाजच आहे. मग मुलीच्या ल्ग्नात
झालेला खर्च आता मुलाच्या लग्नात वसूल.हे (दुष्ट)चक्र थांबायला तयार नाही.
कुटुम्बसंस्था ही समाजाची पहिली पायाभूत वीट.कुटुम्बाचा तोल
ढासळला तर समाजस्वाथ्य बिघडण्याची श्क्यता अधिक!
म्हणूनच कुटुम्बात लोकशाही हवी-सर्वाना समान हक्क आणि (कर्तव्याची
जाणिवही) हवे.
गृहस्थधर्माचे प्रवेशद्वार म्हणजे विवाह-एका नव्या कुटुम्बाचा
मुहुर्त -पहिली वीट .म्हणूनच या विवाह पद्धतीत जे कांही श्रेष्ट कनिष्ट,अवलंबित्व आहे-त्यात
बदल होणे आवश्यक आहे -नव्हे,अत्यंत गर्जेचे आहे
[ हिंदु विवाह पद्धती
(विचारधारा)[पवित्र की विचित्र] मुग्धा देशपांडे -किस्त्रीम दिवाळी९९ वरून ]
ALLURE OF LAVISH WEDDING CURSE OF DOWRY
जयन्त लीलावती रघुनाथ
नम्र विनंती -वरील लेखावरील आपले मत-सूचना जरूर द्याव्यात
COMMENTS ARE MOST WELCOME
Comments
Post a Comment