DESHPANDE DATTAMANDIR-KAGAL देशपांडे दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )
श्री दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )
हे श्री दत्तमंदिर जवळ जवळ ४००-५०० वर्षापूर्वीचे प्राचीन जागृत दत्तस्थान आहे .
देशपांडे घराण्यातील आमच्या पूर्वजानी तपश्चर्येने प्राप्त श्री दत्त महाराजांच्या पादुकांची कागलला आपल्या या मंदिरात स्थापना केली आहे.
“हे मंदिर पूर्वार्भिमुख असून त्या मंदिराच्या आवारात एका मोठ्या नागाची वस्ती आहे.ह्या नागाच्या अंगावर लव आहे.अधून मधून तो दृष्टीस पडतो.मंदिराच्या उत्तरेला औदुंबर वृक्ष असून तो ही बराच जीर्ण झाला आहे. **
या ठिकाणी आजही अधून-मधून सुगंध दरवळतो.तसेच स्वप्नदृष्टांत हो़ऊन प्रसंगी मार्गदर्शनही होते.
( “श्री दत्त दर्शन “ग्रंथ पृष्ट क्रं.२८३/८४“ती ही निर्मळ क्षेत्रे: ले.मधुकर घोलप पृष्ट क्रं.१९९/१२० मासिक प्रसाद ऑगस्ट १९६९”श्री दत्तात्रय संप्रदाय विशेषांक :-वरून )
प्रथमपासूननच आमच्या पूर्वजांचा ओढा दत्तभक्तिकडे होता.ते नेहमी दत्तमहाराजांच्या दर्शनासाठी नृसिंहवाडीला (नरसोबाची वाडी ) जात असत व नृसिंहवाडी येथे नियमाने गुरुचरित्राचे पारायण करीत असत.त्यांना बोलता येत नव्हते.त्यामुळे गुरुचरित्राची पोथी समोर ठेवून त्यावर नजर फ़िरवत,पारायण चालूं असता त्याना दोन वेळा संन्यासी रूपात दत्त साक्षात्कार होऊन पारायणाची सांगता करून गावी परत जाण्याची आज्ञा झाली,गावी औदुंबर वृक्षाजवळ माझ्या पादुका आहेत तेथे सेवा करित असावे असा आदेशही त्यांना मिळाला,
त्याच वेळी दत्तमहाराजांच्या कृपाप्रसादाने त्याना बोलताही येऊ लागले.
त्यांनी समाराधना करून पारायणाची सांगता केली,
ते गावी येण्यास निघाले असता हे पुढे व मागे खडावांचा आवाज असे कागलला देशपांडे यांच्या घराच्या आवारात येई पर्यंत सूरू होते.खडावांचा आवाज मंद झाला म्हणून यांनी मागे पाहताच खडावांचा आवाज बंद झाला
नंतर देशपांडे यांना स्वप्नांत संन्यासी गुरूनी दृष्टांत दिला,
“ माझ्या पादुका या ठिकाणी औदुंबर वृक्षाजवळ आहेत :
त्या नुसार तेथे त्यांना दत्तपादुकांची प्राप्ति झाली त्यावर त्यानी लहानसे मंदिर बांधले .
आमचे आजोबा रामचंद्र व्यंकटेश तथा अण्णासाहेब देशपांडॆ यांनी सध्याचे दत्तमंदिर उत्तम प्रकारे बांधून श्री दत्त महाराजांची उपासना निष्ठेने चालू ठेवली.
आजही रोजच्या पुजा अर्चे बरोबर दरवर्षी “दत्त जन्म/जयंती,गुरुद्वादशी,दत्त नवरात्र आदि सेवा नियमित
श्री दत्तचरणी रूजू केली जाते.
-रावसाहेब उर्फ़ रघुनाथ व्यंकटेश देशपांडे यांच्या आठवणीतून.
हे संपूर्ण
मंदिर आणि संलग्न वास्तू बांधकाम,जागा ही सर्व स्थावर मालमत्ता देशपांडे ,इनामदार
(कागल) यांची वडिलोपार्जित,वारसाहक्काची,वहिवाटीसह खाजगी मालकीची निर्वेध वास्तू
आहे.
या वास्तू –मंदिराचा कॊणत्याही प्रकारे कोणाही सार्वजनिक -क्षेत्राशी,व्यक्तिशी,देणगीदाराशी,संस्था,संस्थान, ट्रस्ट आदीशी कोणताही संबंध नाही.
Comments
Post a Comment