: LAURENCIN,MARIE-लॉरांसा,मारि
लॉरांसा,मारि: LAURENCIN,MARIE
प्रातिनिधिक –छायाचित्र-व्यक्त-अव्यक्त
भन्नाट ,हरहुन्नरी, चौफ़ेर व्यक्तिमत्वाची चित्रकर्ती,कवयत्री आणि Avant-Garde ब्राक,पिकसो आदी कलाकांरांच्या परिमंडळातील एक सद्स्य पण स्वत:
घनवादी( Cubist) चित्रकर्ती न मानणारी मारि लोरांसा तशी विस्मृतीतच गेली
होती.
मारियाच्या चित्रकतृत्वाच –कलेचा एकंदरीत आढावा घेताना,समीक्षकानी तिला
’अपोलिनेर आणि त्याचे मित्र’ या चित्रातच कोंडून ठेवल होत.
पण १९७५
हे जागतिक महिला वर्ष म्हणून यूनोन जाहिर केल
तस स्त्री मुक्ती चळवळ अधिक सक्रिय झाली.पाश्चिमात्य जगतात विषेशत: अमेरिकेत स्त्रीयांच्या हक्काबाबत
मोठ्य प्रमाणात जागृती होऊ लागली होती.या चळवळीचाच
महत्त्वाचा भाग म्हणून स्त्री-पुरूष समानतेचा मुद्दा
ऐरणीवर आला. लिंगभेद विषमतेवर वैचारिक मंथन -चर्चा अभिसरणाला सुरूवात झाली.समरती ,वेगळी कामिक-वैषयिक
ओळखिचा-समानतेचा –मुद्दाही
परिघावरून केंद्राकडे सरकू लगला होता.या वातावरणात या
विषयांना स्पर्श केलेल्या –सहानुभवी-सहानभुती असणाऱ्या –लेखक ,कलावंत आणि या विषयाना स्पर्श करणाऱ्या कलाकृती कडे
चळवळीच लक्ष जाण क्रमप्रातच होत.
बिलितीसचे गीत (The Song of Bilitis) या कवितांतील मूलसंकल्पाना –ज्या
समरती स्त्री च्या कामभावना अप्रत्यक्षपणे अधोरेखित करतात या वर आधारीत कोरीव
मुद्रण्पट्ट चित्र (एचिन्ग) वापरून मारिने १९०४-५ दरम्यान वेगवेगळे रंग आणि छ्टांच्या जवळ जवळ २० प्रती छापल्या पण मूल चित्रात कोणताच बद्दल केला नाही,
या मुद्रण पट्टावरील कोरीव चित्रात
– दोन स्त्रीया आहेत.किंचित पारदर्शक
तांबूस-पिवळ्या व करड्या कपड्यातील कांहीस्या तरंगत्या दोन धुसर आकृती. एकमेकीपसून
दूर पण एकमेकीकडे पूर्णपणे झुकलेल्या आणि चुंबनात विरघळून बुडालेल्या या
स्त्रीया.भावनेच्या उत्कटतेत एकमेकींच्या चेहऱ्यात हरवून गेलेल्या,एकमेकीत विरघळून
गेलेल्यात. या स्त्रीयांचे केस एकत्र वाऱ्यावर लहरत आहेत.हे
कदाचित्त त्यांच्या मानसिक अभिसरणाचे प्रतिक म्ह्णूनही चित्रीत केल असाव.
तदनुषंगिक
तिच्या इतर कलाकृतीं आणि कलेच्या क्षेत्रातील कामाकडे पाहिले तर तिच्या कामाचा घनवादी
शैलीच्या पार आणि स्वतंत्र, वेगळा,गंभीर आणि निराळ्या
दृष्टिकोनातून विचार करावा लागेल.
मारि ही पॉवलीन लॉरांसा आणि ऑल्फ़्रेड त्युले यांची अनौरस मुलगी.बालपणी अधून मधून अचानक घरी येणाऱ्या कडक स्वभावाचा
ऑल्फ़्रेड त्युले या पुरूषाचा तिला
फ़ार धाक वाटे .हाच पुरूष आपला जन्मदाता आहे हे तिला त्यांच्या त्युलेंच्या मृत्यू नंतर ८
वर्षानी तिच्या वयाच्या २२ व्या
वर्षी समजले.बालपणातील या अनुभवामुळे तिच्या मनात
पुरूष जातीबद्दलच कडवटपणा आला आणि तो आयुष्यभर राहिला,इतका की तिच्या चित्रकारीतून,कलेतून आणि एकंदरीत तिच्या कामात
पुरूषांबद्दल कांहीसा आक्रमक निषेध आणि म्हणून असेल कदाचित आवर्जून आणलेल्या प्रतिमांतून
स्त्री जाणिवा दृगोचर होताना दिसतात.
स्त्रीत्वाची ओळख
जाणिव व्यक्त करणाऱ्या प्रतिमां, उत्स्फ़ूतर्तेतून साकरलेल्या वस्त्र प्रावर्णांच्या
रचना यातून तिच समरती आकर्षण आणि सर्जनशील निर्मिती यांच नात समोर येत. चित्रे,रेखाटने,रचना वा मुद्राचित्रे यात
नाजुक प्रतिमां आणि स्त्री महिला जगतातील ओढणी,दुपट्टा,स्कार्फ़ वा पाळिव प्राणी या सारख्या रूपकांचा वापर आणि
चित्रांकनासाठी हळवे, नाजुक ,आल्हादयक
पेस्टल रंग यांतून स्त्रीत्वाची ओळख, जाणिव ठळक करतानाचा तिच्या कामात जाणिव पूर्वक
एका पूरूष विरहित -अपौरूषेय जगात निसटण्याच्या शक्यता दिसतात.
काव्यगत स्वप्नवत नाजुक तरलता, पंखे ,हरिण या सारख्या रोको
चित्रातून उसन्या घेतलेल्या प्र्तिकात्मक प्र्तिमां,दृकप्र्त्ययवादी कले
प्रमाणे विलक्षण रंगसंगती आणि चित्रांकनात बारिक सारिक बाह्य तपशीलाना फ़ाटा देऊन
कांहीशाअमुर्तततेकडे झुकणार चित्रांकन व पूर्वानुभववातून आणि तसेच कलेतील आणि
साहित्यातील चळवळींच्या अनुषंगाने प्राप्त ज्ञान यातून मारिने आपली स्वत:ची अशी खास स्वतंत्र शैली घडवली. आपॉलिनेर यांच्या बरोबर प्रेमसंबंध असताना आणि संपुष्टात आल्यावरही .मारिने नेहमीच तिच्या
कामावर घनवादाचा प्रभाव आहे किंवा ते घनवादी शैलीशी जवळिक साधत याला तीव्र्तेन
विरोध केला.
मारिची चित्रकला बेदिक्कत नेत्रसुखद आनंददायी,जीवनांचा उत्सव साजरा करणारी आणि चक्क
शोभिवंत म्हणून सजावटी करिताही वापरली तरी चालतील.पन वास्तावाला धरून अशी होती. बॅले नृत्याच्या रंगमंचावारील नेपथ्य,,त्याकरिता कपडे -रेखाटन,त्यांची फ़ॅशन,सजावटी आणि त्यांची रचना करताना
अत:प्रेरेणेला जाणवेल तेच उगाच बौद्धिक,पुस्तकी कल्पनावर
आधारीत नव्हे तर सौंदर्याचा उत्सव-त्याच मोल अधोरेखित करणाऱ्या प्र्तिमांकनांची
योजना करून या काळात शास्त्रीय -तांत्रिक प्रभावा खालील कला साकारण्यांच्या समोर तिने एक अहं
विधान केल.
छांदिस्ट,तिरकस विक्षिप्त आणि एकलकोंडी पण हळव्या मरिनी २०व्या शतकाच्या पूर्वार्धातील
पुरूषी वर्चस्वाखालिल नव कलेच्या चळवळींत स्त्रीत्व आणि समरती स्त्री यांची ओळख जाणिवा जागृत ठेवण्याकरिता तिने केलेली धडपड नक्कीच मह्त्वाची
आणि नोंद
घेण्यासार्खीचआहे..
शांत-कलहविविहिन,स्वतंत्र आणि
मुक्तपणे विहार करणाऱ्या स्त्रीयांच्या विश्वाच्या संकल्पेत मारिला तरूणपणापासूनच
रस होता.स्व-व्यक्तीचित्रातून आणि स्त्रीत्वाच्या, तिच्याअस्तित्वाच्या जाणिवा
अधोरेखित करणाऱ्या प्रतिमा प्रतिंकांच चित्रांकनातून तिने या विश्वाला रूप दिले.
आयुष्यभर क्षणभन्गुर
तात्कालिक आणि संदिग्ग्धतेला सामोर जात तिने अशी कामगीरी केली आहे ज्यात एक ठाम
,विश्वसनिय ,आत्मनिर्भर,स्वावलंबी स्त्रीची कणव आणि निर्मिती क्षमता प्रतिबिंबित होते.
मारि चे हे काम म्हणजे १८ व्या शतकापासून चालत आलेल्या
स्त्री व्यक्ती चित्रणाच्या परंपरेला तिने दिलेली दाद आणि पुरूषी कला वर्तुळात ती
पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्नही.
मारिच्या व्यक्तिचित्रणात वास्त्विक शारीर आकृती बंधाशी फ़ारस
साधर्म्य आढळत नाही हे तिलाही मान्य होत.कारण या चित्रणात स्वप्नातील धूसर स्त्री आकारातून
वास्तवापेक्षा भावनेला प्राधान्य असणाऱ्या
तिला अभिप्रेत असलेल्या विश्वाच दर्शन मी घडवते अस तीच म्हणण होत..
तिरसट,पुरूषद्वेष्टी मारि हळवी असली तरी पक्की व्यवसायिक होती.कोणतही काम
स्वीकारताना ती पुरूषाना स्त्रीयांच्या दुपट्ट शुल्क लावत असे आणि असाच न शोभणारा तिचा विक्षिप्त्पणा म्हणजे
श्यामलेच्या कामाला ,गोरी पेक्षा जादा दाम आकारणे, .
पण याने .ना तिच्या कतृत्वाला बाधा आली ना तिच्या नावाला -प्र्सिध्दीत कांही फ़रक
पडला.
१९८३ मधे "मारि लॉरेन्सीन चित्र
संग्रहालय"नागानो जपान मधे स्थापन झाले .स्त्री चित्रकाराच्या नावाने उघडलेल हे जगातील पहिले एकमेव चित्र संग्रहालय होत.
लॉरांसा,मारि: जन्म:३१
ऑक्टोबर १८८३;मृत्यू
: ८ जून , १९५६
शालेय विषयात रस नसणाऱ्या मारिला लहानपणापासूनच
वाचनाची आवड होती आणि तिला व्यक्तिचित्रां मधे विषेषत: स्त्रीयांच्या रस होता.
Lycée
Lamartine येथे अभ्यासात सर्वच विषयात
मागे पडल्यावर, मारिने
वयाच्या २० व्या वर्षी Sèvres factory. या कारखान्यात चिनी मातीची भांडी
रंगवणे शिकून घेतले.त्या
नंतर तिने चित्रकलेच्या अभ्यासासाठी the Académie Humbert कला विद्यालयात प्रवेश
घेतला.
तिला, त्या काळात दिगगज
म्हणून प्रसिध्द पावलेले व तत्कालीन Avant-Garde म्हणून ओळखले जाणारे ब्राक,पिकासो,आन्द्रे डेरेन,मॅक्स जेकॉब आदि
चित्रकारांचा सहवास लाभला. तिचे कलाक्षेत्रातील
मान्यवरांचे वर्तुळ विस्तारत गेले.आंद्रे सालमन यांच्या सारखे कलासमीक्षक, गीयोम आपॉलिनेर सारखे कवी आणि घनवादाचे (Cubism) पुरस्कर्ते यांच्याशी गाढ मैत्री झाली तर गीयेम यांचे बरोबर प्रेमसंबंध
जुळून आले.
पॉल रोझेनबर्ग या मात्तबर चित्रविक्रेत्यांची
–जे मातिस,पिकासो,ब्राक यांच्या
चित्रांचा व्यवसाय बघत होते यांचाही परिचय झाला.वयाच्या २४ व्या वर्षी तिच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन झाले.त्या नंतर घनवादी
शैलीतील चित्रकांरांच्या बरोबरीने तिने सार्ली इंडिपेंडंट्स या कला दालनात आपली
चित्रे मांडली होती.पुस्तकाच्या
मजकुराच्या स्पष्टीकरण्यासाठी लागणारी रेखाटनेही (Illustrations)तिने केली होती.अशी रेखाटने असलेली जवळ जवळ ४० पुस्तके आहेत.
आपॉलिनेर यांच्या
बरोबरील प्रेमसंबंधामुळे दोघांच्याही प्रतिभेला बहर आला.. मारिनेही
कविता केल्या व त्या प्रसिध्दही झाल्या.आपॉलिनेर यांच्या कविता संग्रहातील कित्येक कवितांची
नायिका मारीच होती./आहे..आंरि रूसो यांनी या
दोघांचे "म्युज इनस्पायरिंग द पोएट "नावाचे चित्र रंगवले आहे.
वयाच्या ३२ व्या वर्षी ,आपॉलिनेर यांच्या बरोबरील प्रेमसंबंध संपुष्टात
आल्यावर मारिंच्या कलेवरील
घनवादाचा प्रभावही संपला. पुढच्याच वर्षी तिने ओटोफ़ोन वॅटेज या जर्मन सरदारां
बरोबर विवाह केला..याच
सुमारास पहिले महायुध्द सुरू झाले.या जोडप्याला विजनवासात जावे लागले.हा काळ त्यानी प्रथम
स्पेन (
माद्रिद,बार्सेलोना ) व नंतर जर्मनीत घालवला.स्पेनमधील वास्तव्यात मारि तेथील चित्रकारांशी कलेच्या
संदर्भात संपर्कात होती..पॅरिसल्या परतल्यावर मात्र तिने नवरयाला घट्स्फ़ोट दिला.
मारींच्या प्रतिभेला एव्हाना धार येऊ लागली होती. तिने बॅले नृत्यासाठी नेपथ्य,-रंगमंच
रचना व कलाकारांच्या पोषाखांचे नमुना रेखांकन केले.या बॅले
नृत्याचा प्रथम प्रयोग मॉंतेकार्लो ( पॅरिस) येथे झाला व त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले.परिणामी
या कामाची तिच्याकडे मागणी
वाढली.
समूह
व्यक्तिचित्रांसाठी तिची ख्याती होती. तिने पिकासो,त्यांची( पिकासो यांची) सखी
मैत्रीण व आपॉलिनेर असे ’ग्रुप ऑफ़ आर्टिस्ट्स ’ नावाचे चित्र रंगवले आहे(होते).हेच ते विकलेले
गेलेले तिचे पहिले चित्र.मारिचा चित्रविक्रिचा व्यव्हार १९४० पर्यंत
पॉल रोझेनबर्गच पहात असत.मारीने कांही काळ कला शिक्षक
म्हणूनही काम केले.१९४२ मधे तिने आपल्या तारूण्यातील आठवणी व कवितां यांचा संग्रह ’ले का दे न्यू ’(Le carneta desa nu^^itsa) या शिर्षकाने
प्रसिध्द केला.तिने आपल्या नोकराणीच्या एका मुलीच्या पालन
पोषणाची व शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली होती.याच मुलीला
–स्युझॅन मोरू -१९५४ मधे तिने दत्तक
घेतले.
आपॉलिनेर यांच्या
अकाली मृत्यूने (१९१८) व विरहाने मारिला खरोरीच जबर धक्का बसला होता. मारिच
त्यांच्या वर अत्यंतिक प्रेम होते. मृत्यू पश्चात आपले दफ़न करताना आपॉलिनेर यांच्या कवितांचा
संग्रह आपल्या ह्रदयाजवळ ठेवायची (
अखेरची ) इच्छा तिनेव्यक्तवली होती...
मारी
लॉरेंसॅंच्या एकंदरीत कार्यकर्तृत्वाचा
आढावा घेताना लक्षात येत ते Avant-Garde
च्या स्त्री मुक्तीच्या भूमिकेच्या मर्यादा,स्त्रीला
समान दर्जा देण्य़ाबाबत असलेले (Avant-Garde)चे धरसोडीचे ,अस्थिर धोरण,आणि कलाकृतींचे लिंगभेदाधिष्ट मूल्यांकन.या साऱ्यां ( गोष्टींचे)चे
मारींच्या कामात प्रतिबिंब दिसते.आणि तीच त्यांची ओळखही बनते.कलेच्या क्षेत्रातील पुरषी
वर्चस्वावर टीका करण्यासाठी जरी त्यानी त्यांच्या स्त्रीत्वाचा –स्त्री असण्याचा
उपयोग केला असला,तरी आपण केवळ स्त्री (कलाकार) आहोत ,म्हणून आपल्याला, म्हणजेच आपल्य़ा कामाला दुय्यम दर्जा दिला गेल्याची खंत त्याना कायम राहिली.
अपोलिनेर आणि त्याचे मित्र’ -(१९०९) पिकासो कलासंग्रहालय
-पारिस
’

Comments
Post a Comment