The Auspicious Vision-पदराआडचा मुखचंद्रमा
कांतीचंद्रच्या पत्नीच निधन झाल.अजून तारूण्यात असलेल्या कांतीन पत्नीच्या मृत्यू पश्चात दुसऱ्या जीवन साथिदाराचा विचार सोडला. त्यान आपला सारा हुरीयाच बदलून टाकला.
त्यान आता परदेशी पोषाख,चालचलन सोडून गावकऱ्यां सारखा देशी
पोषाख वेशभूषा करायला सुरूवात केली.सडपातळ
बांधा,काटक ,चपळ आणि तेज नजर
वाल्या कांतीचंद्रसुबोध बाबुंचा नेमही
अचूक.त्यानी आता पशू पक्षांच्या शिकारीतच मन रमवायला
सूरूवात केली.मूळच्याच
मालदार आदमीन ,छानशौकीत
दिवस काढायच ठरवल्यावर त्यांच्या भोवती हौशे,नवशे, गवशे गोळा व्हायला कितीसा वेळ लागणार.!शिकारीच्या या षौकात हरिसिंग
पहेलवान,चक्कनलाल, संगीतकार खान साहेब ,मियन साहेब असे गाण बजावणारे आणि असेच कांहीरीकमटेकडे ,ज्यांची कोठेच कमी नसते अशांचा गोतवळा कांती भवती
जमायला वेळ लागला नाही.
मित्र मंडळी जमवून जंगलात टूर काढायची.बदक,होले जे मिळेल ते टीपायच
आणि जेवणावळी करायच्या.असे मजेत दिवस चालले होते.जमिनदारी,वतनवाडीच
कांहीका होइना यांना कशाकशाची कमी पडायची नाही.बापजाद्यानी
एवढ माग सोडल होत की चिंता कशाला ?
शिकारीसाठी, नोकर चाकरांचा लवाजमा आणि आपाल्या कांही शिकारी मित्राना घेऊन कांती बाबूनी अश्विन महिन्यात ’नायदिघी’ नदीच्या किनाऱ्याजवळ ,नावेत मुक्काम ठोकला होता.
दिवसभर जमिन आणि नदीतील पाणी बंदूकीच्या आवाजाने थरथरे,तर रोज सध्याकाळीच्या गाण्या बजावण्याच्या जल्लोशान
गावकऱ्यांच्या झोपेच वाटोळ होत होत.
गावतल्या बायकाना नदीवर पाणी आणायला जाण तर दूर ,मुष्किल हो़ऊन बसलेल ,मग आंघॊळ वैगरेची तर बातच नको .
एके दिवशी सकाळी कांतीबाबू नावेत बसून आपली आवडती बंदूक साफ़ करत होता, कसल्यातरी
आवाजान तो एकदम दचकला, हा बहुदा जंगली बदकांचा आवाज असवा अस त्याला वाटल. मान उंचलून त्यान
समोर पहिल.एक ग्रामकन्या दोन पांढऱ्या बदकांना छातीशी धरून नदीच्या पल्याडच्या काठावर येत होती. पाण्यात वाढलेल्या गळचाटान पाण्याला
धार अशी नव्ह्तीच. पाण्याचा प्रवाह जवळ थांबलाच होता.मुलीने अलगदपणे त्या बदकांच्या जोडीला पाण्यात सोडल.तीरावरील शिकाऱ्यांची उपस्थिती हीच तिच्या काळजीच कारण होत बदकांचा उनाडपणा नव्हे.
या मुलीच्या सौंदर्यात एक प्रकारची वेगळीच उत्फ़ुल्ल टवटवी होती- ही मूर्ती जणू विश्वकर्माच्या कलागृहातून आत्ताच बाहेर आली आहे. तरूणीची उंची आणि बांधा या वरून तिच्या वयाचा अंदाज करण अवघड होत. पण बालिकेचा निरागस चेहऱ्यावर जगाच्या भल्या बुऱ्या अनुभवाचे कांहीच भाव दिसत नव्हते.बहुदा तिच तिलाच कळत होत का नव्हत ? की ती आता यौवनाच्या उंबरठ्यावर उभी आहे.
कांतीबाबू क्षणभर बंदुक साफ़ करायचा थांबला,तो भारावून गेला.अशा आडग्रामी असा चेहरा दिसेल अस त्याला स्वप्नातही वाटल नव्हत. असल्या या
सौंदर्याला महालापेक्षा ही नैसर्गिक पार्श्वभूमीच अधिक योग्य..अर्धौन्मलित कळी झाडावरच खुलून दिसते, सोन्याच्या फ़ुलदाणीत नाही. कांतीबाबूंच्या उल्हसित मनाला या निसर्गसुंदर पार्श्वभूमीवर हा निरागस,उत्फ़ल चेहरा म्हणजे जणू आनंदरूपी
महोत्सवच.शिवाची ’पर्वतराणी’ कधी
कोणेकाळी तरी, स्वत: बदकांना उराशी कवटाळून ,गंगेकडे गेली होती
, हे –काव्यात
गुंफ़ायच कालिदास बहुदा विसरून गेला असावा.
पहाटेच्या कोवळ्या उन्हात बांबु बनातील कोंबावर दवबिंदो चमकत होते.कांती बघत होता, तोच ती ग्रामकन्या घाबरून दचकली आणि दु:खाची अस्फ़ूट किंकाळी फ़ोडत, घाई घाईने तिने बदकं पुन्हा उचलून छातीशी धरली आणि क्षणार्धातच काठापासून दूर पळत ती समोरच्या बांबूच्या बनात गडप झाली .
चटकन वळून पहाताच कांतीबाबूला दिसलं की त्यांच्या लोकांपैकी कोणीतरी एक रिकामी बंदूक त्या बदकांवर रोखून धरली आहे.झटक्यात त्याच्या जवळ जात
त्यानी त्याच्या हातातील बंदूक हिसकावून
घेतली आणि त्याला एक जोराची अशी कांही थप्पड मारली की
या साऱ्या प्रकाराने अचंबित झालेला तो चेष्टेखोर जमिनीवरच
कोलमडला.
कांतीबाबुनी आपल बंदूकसफ़ाइच काम चालूच ठेवल.
पण उत्सुकता त्याला स्वस्थ बसु देइना.ज्या झाडीत ती मुलगी गायब झाली होती तिथे कांती पोचला.पुढे जात जात तो एका सुखवस्तु घराच्या परसात पोचला.एका बाजुला गवताच्या गंजा रचलेल्या
होत्या आणि दुसऱ्या बाजूला गायीचा गोठा होता.जवळ एक रानटी
बोराच झुडुप वाढल होत.त्या झुड्पाखाली त्यान सकाळी पहिलेली मुलगी बसली होती.एका जखमी कबुताराच्या चोचीत आपल्या पदराच्या टोकाने पाणी घालण्याच प्रयत्न कराताना ती हुंदके देत होती.एक कबर मांजर तिच्या मांडीवर आपले पुढचे पंजे ठेवून कबुतराकडे आशेने पहात होत.आणि ते जरा जास्त जवळ येत आहे अस वाटल की ती त्याच्या नाकावर चापटी मारून त्याला माग ढकलत होती. माध्यन्हीच्या नि:श्ब्द वेळी त्या घराच्या परसदारातील या दृश्याचा कांतीच्या संवेदनशिल मनावर चांगलाच परिणाम झाला.झुडपाच्या झाडोर्यातून
ऊन- सावलीचे कवडसे तिच्या मांडीवर हिंदोळत होते. जवळच एक गाय रंवथ करत संथपणे डोक आणि शेपटी हलवून माशा उडवत होती.उत्तरेकडचा वारा हळूवारपणे बांबूच्या बनातून कुजबूजत होता.पहाटेच्या प्रकाशातील नदीकाठची जंगल राणी , आता दुपारच्या निरव शांततेत कारूण्यमयी उत्सुक गृहस्वामिनी वाटत होती.बंदुक घेतलेल्या कांतीला तिच्या
सामोर जाताना मनातून आगांवूपणाच वाटत होता.त्याला रंगे हात पकडलेल्या चोरासारख वाटल. त्याला मनापासून वाटत होत की तिला सांगव, “बदकाना मारणाऱ्यांपैकी मी नाही, तो मी नव्हेच.”हे सार तिला कस सांगाव या विचारात कांती असतानाच,"सुधा" अशी घरातून हाक आली.मुलगी टुणकन उठली."सुधा" पुन्हा एकदा आतून आवाज आला.कबुतरांना उचलून ती पळतच आत निघून गेली.’सुधा’ अगदी शोभणार सुयोग्य नाव.
कांतीनं परत जाऊन आपली बंदूक आपल्या माणसांकडे दिली आणि तो घराच्या मुख्य दरवाज्या कडे गेला. सफ़ाचट गुळगुळीत चेहऱ्याचा एक प्रौढ ब्राम्हण शांत चित्तानं अंगणातील बाकावर बसून भक्तीभावाने धर्मिक ग्रंथ वाचत बसलेला होता.त्या प्रौढाच्या प्रेमळ चेहऱ्यावर त्याला त्या मुलीच्या चेहऱ्या वरील भावा सारखाच स्निग्ध सोज्वळ भाव जाणवला.
कांतीने नमस्कार करून विचारल
"
प्यायला थॊड पाणी मिळेल का?.बाबुजी ,मला खूप तहान लागली आहे "
त्या भल्या गृहस्थानी त्याला बोलावून आपल्या शेजारी बाकावर बसवले आणि स्वत: आत जाऊन एका थाळीत बत्तासे आणि तांब्याच्या गडूत पाणीघेऊन आले.
बत्तासे खाऊन पाणी पिऊन झाल्यावर त्यानी कांतीची आस्थेने चौकशी केली.
’आपण कोण ? कोठील ? इत्यादि इत्यादि.
आपल्या घराण्याची सर्व माहिती-अगदी आजोबा,पणजोपासून ते घराचा पूर्ण पत्त्यापर्यंत, सार सार सांगून, कांती विनयान पण सहज म्हणाला
,’बाबूजी ,माझ्याकडून कांही मदत होण्या सारखी असेल,कोणतही काम असेल तर जरूर सांगा .मी स्वत:ला भाग्यवान समजेन !’
’बेटा,मला कांही नको आहे ’ ते गृहस्थ- नबीन बॅनर्जी त्यांच नाव म्हणाले.’फ़क्त एकच काळजी लागून राहिली आहे.
’ ’कोणती बरं ?’कांती.
’माझी मुलगी सुधा,तिच वय वाढतय -( कांतीला बालिश चेहरा आठवून हसू आल) पण मी अजून पर्यंत तिच्यासाठी सुयोग्य वर शोधू शकलो नांही.एकदा का तिचा विवाह सुखाने संपन्न झालेला पहिला की मी या जगातल्या ऋणातून मुक्त होइन. पण तिच्या योग्य मुलगा येथे कोठेच नाही, आणि गोपिनाथला एकट सोडून, मी या घराबाहेर इतरत्र तिच्यासाठी स्थळ शोधायला जाऊ शकत नांही.’
नमस्कार करून त्यांची रजा घेता घेता कांती
म्हणाला
" आपण जर माझ्या नावेत यायची तसदी घेतलीत तर ,आपल्या मुलीच्या लग्नाबाबत आपण बोलू शकू "
त्यान आपली कांही माणसं गावात चौकशी करण्याकरिता पाठवली .मुलीचे ’सद्गुण आणि सौंदर्य’ या कौतुका व्यतरिक्त त्याला कांहीच
ऐकायला मिळाल नाही.
दुसऱ्याच दिवशी कांतीच्या आमंत्रणा प्रमाणे, जेव्हा ते वृद्ध गृहस्थ-बॅनर्जीबाबू त्याला भेटायला आले तेव्हा कांतीने त्याना खाली वाकून नमस्कार केला आणि विनयाने त्यांच्या मुलीचा हात पत्नी म्हणून आपल्या हाती देण्याची विनंती केली.
बिचारा ब्राह्मण भांबावून गेला. उच्च कुलीन,श्रीमंत आणि अब्रुदार
कांतीन अपल्या मुलीला मागणी घातली, स्वप्नातही विचार केला नसता असं भाग्य ! उत्तरादाखल त्यांच्या तोंडून प्रथम शब्दच फ़ुटेना.त्याना वाटल बहुदा कांहीतरी गैरसमज झाला असावा,सरतेशेवटी त्यानी विचारल
" माझ्या मुलीशी लग्न करायची तुमची इच्छा आहे ?"
"आपण, ती मला देण्याची मेहरबानी केलीत ! तर अर्थातच "
" तुम्हाला सुधा म्हणायच का?" त्यानी पुन: विचारल.
"हो"
"पण तुम्ही आधी तिला पाहणार नाही का आणि तिच्याशी बोलणार ------ ?"
तिला या पूर्वी पाहिल नाही अस दाखवत तो म्हणाला
" ते घूंगट उचलून शुभ शकुनाच्या नजर भेटीच्या वेळीच ! "
( वाङनिश्चय झाल्यावर वर आणि वधू यानी विवाह विधी पूर्वी एकमेकाना पाहायच नसते ).
गहिवरून ,ऊर भरून आलेले ते वृद्ध घोगऱ्या आवाजात म्हणाले
’ माझी सुधा खरोखरीच गुणाची पोर आहे.आणि गृहकृत्य दक्ष तर विचारायलाच नको.तुम्ही एवढ्या उदार मनाने विश्वासाने तिचा स्वीकार करता आहात,हा विश्वास सार्थ ठरू दे तुमच्या आयुष्यात ती एक पळ सुद्धा पश्चातापाचा येऊ देणार नांही हा माझा तिला आशिर्वाद आहे "
--
कांतीला लगीन घाई झाली होती.त्याला आता उशीर करावयाचा नव्हता म्हणून मुहुर्त लगेचच्या माघ महिन्यातलाच काढला होता .
मुझुमदारांकडून त्यांचा मोठा वाडा विवाह समारंभासाठी घेतला होता.
यथावकाश ठरलेल्या वेळी नवरा मुलगा त्याच्या हत्तीवर बसून लवाजम्यासह,बॅंड बाजा संगीत आणि मशालीच्या मिरवणूकीने विवाह स्थळी आला.
आणि समारंभाला सूरूवात झाली.
शुभ शकुनाच्या नजर भेटी साठी जेव्हा नवपरिणीतांवर लाल्ररंगाच कपडा टाकला तेव्हा कांतीने आपल्या नवपरिणीत वधूकडे पाहिले.
चंदनाच्या ऊटीने उजळलेल्या, मुंडावळ्यानी सजलेल्या
लज्जेने खाली झूकवलेल्या चेहऱ्यात, त्याला त्याच्या कल्पनेतील ग्रामकन्येचा चेहरा जरासुद्धा
आढळला नांही.
आणि भावनेच्या आवेगान त्याच्या डोळ्यात धूक साकळून आल.
विवाहाचे सर्व विधी संपल्या नंतर बायकांच्या घोळक्यातील गावातीलच एका प्रौढेने आग्रह धरला की कांतीनेच आता नवरीच्या चेहऱ्यावरचा घुंगट काढावा.
घुंगट दूर होताच तो दचकलाच .ही ती मुलगी नव्हतीच.!
त्याच्या हृदयातून कांहीतरी उसळून आल आणि एक तीव्र सणक त्याच्या डोक्यात गेली.त्याला वाटल की दिव्यांचा प्रकाश मंदावतो आहे आणि अंध:कार नववधुचा चेहरा काळवंडतो आहे.
त्याला पहिल्यांदा आपल्या सासऱ्यांचा राग आला.
म्हाताऱ्याने एक दाखवली आणि दुसरीशीच लग्न लावून दिल.
पण शांत झाल्यावर त्याच्या लक्षात आल की त्यानी त्याला कोणतीच मुलगी दाखवलीच नव्हती-
दोष त्याचाच होता.स्वत:चा मूर्खपणा जगाला दाखवण्यात कांही अर्थ नव्हता. शांतपणे तो आपल्या पत्नी जवळ बसुन राहिला.
मूग गिळून बसला तरी त्याची कडवट चव तोंडातून जात नव्हती.
लग्नांचा जल्लोश त्याला सहन होइना.तो स्वत:वरच भयंकर संतापला होता आणि आजू बाजुच्या सर्वावरही
अचानक त्याच्या बाजुला बसलेली वधु दचकली आणि तिच्या तोंडून एक दबकी अस्फ़ूट किंकाळी बाहेर पडली.
आगंतूकपणे खोलित घूसलेल सशाच एक पिल्लू तिच्या पायावरून गेल.त्याच्या मागोमग त्यान पहिलेली मुलगी आत आली.तिन त्या पिल्लाला उचलून हातात घेतलं आणि प्रेमाने कुरवाळत ती कांहीतरी पुटपुटू लागली.
" अरे ,बिचारी वेडी !"बायकांनी एका आवाजात कल्ला केला आणि तिला खाणा खूणा करून जायला सांगू लागल्या.
पण ती अगदी भाबडेपणाने या नवीन जोडप्या समोर येऊन लहान मुलाच्या उत्सूकतेने त्यांच्या तोंडाकडे पहात बसली. जेव्हा एक नोकराणी तिला हाताला धरून ओढून घेऊन जाऊ लागली तेव्हा कांती म्हणाला
’असू दे तिला इथे ’
’तुझ नाव काय ?’ त्यान तिला विचरल.
मुलगी नुसतीच माग पुढ डुलत राहिली पण तिन कांहीच उत्तर दिल नाही.खोलितील साऱ्या बायका खूदखूदायला लागल्या.
कांतीन तिला दुसरा प्रश्न केला
’तुझी ती बद्काची पिल्ल आता मोठी झाली असतील ना ?’
ती मुलगी, पूर्वी प्रमाणेच त्याच्याकडे कांहीच संबंध नसल्या सारखी नुसतीच पहात राहिली.
साऱ्या प्रकाराने हैराण झालेल्या कांतीने सारे बळ एकवटून सौ़म्य पणे तिला विचारल,
” तुझ ते जखमी कबुतर बरं झाल का ग? “
पण कांही उत्तर नांहीच.
मोठा विनोद झाल्या सारखं आता सर्व बायका मोठाने हसायला लागल्या.
या साऱ्यात कांतीला अखेर समजल की परिसरातल्या साऱ्या पशू पक्षांशी मैत्री(ण) असलेली ती एक मूक बधीर मुलगी आहे.त्या दिवशीचा तो केवळ योगायोग होता की जेव्हा घरातून ’सुधा’ अशी हाक आली त्यावेळी ती उठून आत गेली.
हा दुसरा धक्का होता !.
त्याच्या डोळ्या समोरच कृष्णपटल दूर झाल.संकटातून सुटल्या सारखा सुस्कारा सोडून,त्यान वळून आपल्या नववधुच्या चेहऱ्याकडे पाहिले.
आताच दर्शन हे खर शुभशकूनी दर्शन !.
पेट्रोमॅक्स बत्तीच्या उजेडात,अत: करणातला प्रकाशाने .उजळलेल हे
सुंदर मुखकमल !
या चेहऱ्याच्या प्रभेत त्याला जाणवल की नबिनचंद्रांचा
"आशिर्वाद नक्कीच सफ़ल होणार."
****.
गुरूवर्य रविन्द्रनाथ टागोर यांच्या The Auspicious Vision कथेचा स्वैर अनुवाद.
Comments
Post a Comment