THE PERFECTIONIST ? गोष्ट एका स्वच्छतेची !
गोष्ट एका स्वच्छतेची ! THE PERFECTIONIST ?
७ वी ’ क ’च्या मुलीना एक मोठ पटांगण साफ़ करायच काम(उद्दीष्ट)
दिल होत.म्हटल तर शिक्षा म्हटल तर आव्हान.कारण खोडकर असल्या तरी सर्व खेळात आघाडीवर
असणाऱ्या या पोरी दंगा करण्यातही आघाडीवर होत्या,त्यात त्यांच्या क्लास टीचर वर्ग शिक्षिका म्हणजे ,डोळ्यात कुसळ शोधणाऱ्या त्यांच समाधान
म्हणजे कळसच,
सकाळची शाळा ,कोवळ ऊन,उबदार हवा आणि कामाला लगलेल्या पोरी तर खिलाडू
आणि खेळाडू !
मुली आनंदाने कामाला लागल्या तासाभरातच हसत खेळत करत सार पटांगण कस छान चकचकीत झाल.
हूतूतू करत,खो देत तर कधी लंगडी घालत काना कोपऱ्यात्ला कचरा गोळा करायला लागल्या.
त्यांनी हुषारीने दगड बाजुला काढले,ते एकत्र केले.गवत ,झुडप
चक्क उपटली.कागदाचे कपटे,बिस्किटाचे रिकामे पूडे,चॉकलेट्चे कागद,प्लास्टिकच्या पिशव्या सारा कचरा गॊळा
करून शाळे बाहेरच्या (कचरा) हौदात-टाकून सऱ्याजणी हात पाय धूवून आल्या,तोच;
- शळेच्या हेड बाई-प्राचार्या प्रिन्सिपाल बाई
अचानक तिथे आल्या.त्याना खूप छान वाटलं.
“मुली लगेचच सावरून उभ्या राहिल्या.
’गूड मॉर्निंग मॅम ’
’ओ या ! गुड मॉर्निंग गर्ल्स .छान साफ़ केलय तुम्ही
सार .गुड! गुड ! नाईस वर्क ,कीप अप ’ अस म्हणून त्या गेल्या.
मुली खुष ,एकमेकीना
टाळी देत कांहीनी स्वत: भोवतीच चक्कर मारली
तर समोर क्लास टीचर !
चष्मा सावरत त्यानी चौफ़ेर नजर टाकली- मुलीना वाटल आता यांही
प्रिंन्सिपाल बाईं सारखं आपल कौतुक करणार-
शाबासकी देणार !
“ हे यू ,श्रुती कम हिअर
“ त्यानी श्रुती ला –क्लासची मॉनिटर तिला जवळ बोलावल-
आणि म्हणाल्या ,
’ हे काय तुम्हाला सगळ ग्राउंड साफ़ करायला सांगितल
होत ना ! ते बघ ते काय आहे? तिथ?
जमिनिवरील दगडाच्या फ़टीत खाली अडकून बसलेली एक छोटी प्लॅस्टिकची
पिशवी फ़डफ़डत होती- सगळ्यांच्या नजरेतून सुटलेली .
“माझी लाज घालवणार तुम्ही “ क्लास टिचर नाराज
– पर्फ़ेक्शनिस्ट नेहमीच छोट्या छोट्य़ा गोष्टीनी
नाराज होतात.
मुली नाराज !रडवेल्या !
प्राथनेची घंटा झाली तशी साऱ्याजणी –ग्राऊंडवर जावून उभ्या राहील्या.सकाळचा
सगळा उत्साह आता मावळल्या सारखा झाला होता,नेहमीच सळसळ असणारा ७ वी क चा वर्ग आज एवढा शांत!,
प्रार्थना झाली.
नेहमी प्रमाणे शाळा सूरू व्हायच्या आधी –प्रिंन्सिपल बाई दोन
शब्द बोलत.
“ मुलीनो, तुम्हाला मला
एक गोष्ट आज आवर्जून सांगायची आहे , ७ वी ’क’ च्या मुलींचा दंगा
आणि खोड्या बद्द्ल सारे कांहीना कांही सांगत माझ्याकडे येत असतात.” अस म्हणून त्यानी
एकदा सगळी कडे नजर फ़िरवली.
७ वी ’क’ च्या मुली एकदम सावरल्या,कांहीश्या शर्मून ,खाली
बघत उभ्या राहिल्या,त्यांच्या क्लास टीचरनी तर आभाळाकडे बघायला
सुरूवात केली
“ पण ,मी त्यांच्या कडे
एवढ गंभीर पणे पहात नाही.’त्या पुढे म्हणाल्या
’पण आज मात्र मला नक्कीच सांगायच की या ७ वी’
क’ च्या मुलींच्यात कांही तरी खास आहे-आज त्याना ग्राउंड स्वच्छ करायला सांगितल होत
आणि त्यानी ते काम इतक चोख केलं आहे की मला राहवल नाही म्हणून मी त्यांच अस जाहीर
कौतूक करते आहे
” वेल डन गर्ल्स-नाऊ युवर टर्न टू मेक द स्कूल प्रॉऊड ऑफ़ यू
“
सारी शाळा वळून या ७ वी ’क’ च्या मुलींकडे पाहू लागला.खाली घातलेल्या
चेहऱ्यांवर आता नाजुकस हसू फ़ुटल होत.
आरोळी ठोकायची उबळ दाबून त्यानी टाळ्या वाजवून आपली कृतज्ञता व्यक्त
केली,या टाळ्याना मग साऱ्याच मुलीनी साथ दीली.
क्लास टिचरांचा कानावर विश्वास बसत नव्हता.त्यांच्या समोर अजूनही
ती दगडाखाली अडकलेली प्लॅस्टिकची पिशवीच फ़डफ़डत होती.
-जयंत लीलावती रघुनाथ-
Comments
Post a Comment