Posts

Showing posts from July, 2023

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

Image
  IT’S A WONDERFUL LIFE . बृहस्पती-सूत्र,चार्वाक-लोकायत,महावीर,गोतम बुद्ध,*पूर्ण काश्यप बुद्ध,मखली गोशाल,अजित केशकंबल,काकूध कात्यायन,संजय,*कपिल,कणाद,बसवेश्वर,कबिर,संत एकनाथ,संत तुकाराम,महात्मा ज्योतिबा फ़ुले,महात्मा गांधी,डॉ,बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगे बाबा पेरिआर आणि बाबा आमाटे आणि भारताचे संविधान या आणि अशाच ज्ञात –अज्ञात महान व्यक्तिमत्वानी- ज्यानी प्रस्थापित ( धर्मसत्ता,राजसत्ता,सांस्कृत्तिक सत्ता ) व्यवस्थेला आवाहन दिल,आणि न्याया साठी लढा दिला,संघर्ष केला   त्या सर्वांच ऋण स्वीकारून, सर्वांना विनम्र अभिवादन : ---१४ एप्रिल,२०२१ भीम शके -१/१/१३१-   Brihaspati-Sutra,Charwak,-Lokayat,Mahavir,Gotam Buddha,Poorna Kaashyap Buddha,Makhalee Gosavi,Ajit Keshkambal,Katyayan Sanjay, Kapil(Sankhaya), Kanad, Basveshvar, Kabir,Saint Eknath,Saint,Tukaram,Mahatmaa Jyotiba Phule,Mahatma Gandhi,Dr.Babasaheb Ambedkar,Saint Gadage Baba,PeriarAnd Baba Amate AND The Constitution Of India These and known –unknown Greats like them, WHO   challenged the Establishment/s(Religious,Cultural,State)

NOSTALGIA- सुखद स्मरण रंजन -परीक्षण एकांकिकांचे -1

  नॉस्टालजिया - एक आनंददायी सुखद स्मरण रंजन ! परीक्षण एकांकिकांचे एकांकिकीकेत भाग घेतलेल्या-कर्मचाऱ्यांची नावे बदलली आहेत. --पहिला दिवस- अखिल भारतीय पातळीवरील संस्थेच्या आंतरअंचल एकांकीका स्पर्धांचआयोजन करण्याचे यजमानपद होत यावर्षी आमच्या क्षेत्रीय  कार्यलयला कडे. 1993 च्या जानेवारीत  या स्पर्धा कला मंदिरात यशस्वीरित्या पार पडल्या. एकूण दहा झोन पैकी नाशिक झोन वगळता, सर्व झोनचा सहभाग आणि विशेषत: दक्षिण झोनचा मराठी मध्ये एकांकिका सादर करण्याचा प्रयत्न नक्कीच उल्लेखनीय होता. मराठी चित्रपट सॄष्टितील यशस्वी निर्माता- दिग्दर्शक -अभिनेते श्री महेश कोठारे यांच्या हस्ते व  नशीबवान निर्माते व दिग्दर्शक श्री अरुण गोडबोले व क्षेत्रीय व्यवस्थाकांच्या उपस्थितीत एकांकीका स्पर्धांना सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दक्षिणझोनची "म्ह्या"; मुंबई झोनची " दे लिव्हड हॅपिली देअर आफ़्टर" व नागपूर झोन तर्फे " प्रेषितांची व्यंकटी सांडो" या क्रमाने स्पर्धेसाठी सादर केल्या गेल्या. दक्षिण झोन बेंगलोरू संघाने सादर केलेल्या "म्ह्या" ह्या रमेश पवार लिखित  एकांकिकेचा उल्लेख केवळ अमहार

NOSTALGIA -सुखद स्मरण रंजन -परीक्षण एकांकिकांचे -2

 नॉस्टालजिया - सुखद स्मरण रंजन -परीक्षण एकांकिकांचे एकांकिकीकेत भाग घेतलेल्या-कर्मचाऱ्यांची नावे बदलली आहेत.  --दुसरा दिवस- ठाणे विभागातर्फे "अनन्य"भोपाळ झोनची "रामलीला" व  दिल्ली झोनची" किस्सा एक अजनबी लाशका" या क्रमाने सादर केल्या गेल्या. - अपंग व मतिमंद मुलामुळे आई-वडिलांचा होणारा मानसिक कोंडमारा ;  वाढलेल्या वयामुळे त्या अपंग मुलात निर्माण झालेली लैंगकतेची जाणिव त्यामुळे सतत धास्तावलेले  दोघे. मुलाच्या या अवस्थेमुळे त्यांने रात्रपाळी घेतली. तिचा बॉस एक चांगला गृहस्थ. या साऱ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्याला एकच पर्याय दिसतो आणि तो म्हणजे अपंग मुलाचे अस्तित्व संपवणे.जन्मूनही  न जन्मल्यासारख्या या मुलाभोवती फिरणाऱ्या  या एकांकिकेच "अजन्म" हे शीषर्क समर्पक होते. श्री.पारस यानी अपंग मतिमंद मुलाचे काम छानच केले. संपूर्ण एकांकीके मध्ये त्यांनी कोठेही भूमिकेच बेअरिंग  सोडलं नाही आणि संहितेचा जबर पाठींबा असणाऱ्या या पात्राच्या हालचालीतून आणि नजरेतून त्यांनी मतिमंदपणा प्रेक्षकापर्यंत पोचवला. त्यामुळे अर्थातच अभिनयाचे प्रथम परितोषिक श्री पारस या

NOSTALGIA -सुखद स्मरण रंजन -परीक्षण एकांकिकांचे --3

 नॉस्टालजिया -सुखद स्मरण रंजन -परीक्षण एकांकिकांचे एकांकिकीकेत भाग घेतलेल्या-कर्मचाऱ्यांची नावे बदलली आहेत. -----तिसरा दिवस आणि समारोप- स्पर्धेच्या शेवटच्या ३ ऱ्या दिवशी तीन एकांकिका बरोबरच स्पर्धेचा निकाल असा भरगच्च कार्यक्रम होता. पुणे विभागातर्फ़े "ब्रिफ़केस"लातुरकरांची "उत्तर रात्र" आणि दक्षिण महराष्ट्र झोन म्हणजे घरचा "मनपक्षी" या क्रमाने सादर झाल्या. दोन दिवसांच्या सहा एकांकिकांच्या परिणामावर उतारा म्हणून की काय पण योगायोगाने एकच एकांकिका पक्षी कथानक असलेल्या ’ब्रिफ़केस’ आणि ’उत्तर रात्र’ या वेगळ्या नावाने वेगळ्या संचात सादर झाल्या.   पत्रकाराच्या खूनाला अपघाताने साक्षीदार झालेल्या एका पूर्वाश्रमीच्या चोराला त्या पत्रकाराची बॅग सापडते. आणि त्यामुळे त्या बॅगेतील कागदपत्रांच्यासाठी ज्या लोकांनी त्या पत्रकाराचा खून घडवून आणला ते लोक त्या चोराच्या मागे लागतात. आश्रयासाठी तो एका न्यायाधीशाच्या घरात घुसतो, त्यांना पोलिसांना बोलवण्याची विनंती करतो आणि आपल्या पूर्वाश्रमिच्या कथा सांगून पटवून देतो की त्याला पकडले पाहिजे. निव्वळ तीन पात्रे आणि पैकी पत्रकार किंवा

VRS AND AFTER-स्वेच्छा निवृत्ती आणि नंतर(2001)

 स्वेच्छा निवृत्ती आणि नंतर आधी मी जेव्हा प्रत्यक्ष नोकरीतून मुक्त झालो, त्या सुरुवातीच्या काळात जर मला कोणी विचारलं की, आता कसं वाटतंय? तर मी सांगायचो I am reveling , मजेत आनंदान हा मोकळेपणा उपभोगतो आहे. आजही माझ्यात तोच आनंद भरून राहिलाआहे .आय एम रिव्हेलिंग. हा निर्णय मी जाणून समजून विचार करून घेतला. प्रत्यक्षात हा विचार  मी, ही स्वेच्छा निवृती घेण्याबाबतचा नियम अमलात आला,तेव्हापासूनच करून ठेवला होता. जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आणि त्याचे तातडीचे परिणाम यातून आलेली स्वेच्छा निवृत्तीची संधी हा केवळ एक सुंदर योगायोग होय.  शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं, घर असला सुखी संसार असे टप्पे पार करत करत निवृत्तीकडे वाटचाल करायची- तशी ती होतच असते म्हणा, की आपण काही वेगळी वाटचाल करायची रसिकतेत हे एकदाच मिळालेला आयुष्य जीवनाचा आस्वाद घेत घेत, त्या अंतिम अटळ क्षणाकडे प्रस्थान करायचं, या विचाराचा भुंगा मनात कायम आहे. माझ्या स्वेच्छानिवृत्तीच्या मागचे सर्वात प्रबळ कारण हे आहे. आर्थिक जबाबदारीसाठी अर्थाजन ही अटळ गोष्ट बनते. स्वतःच्या, प्रियजनांच्या भौतिक आणि मानसिक सुख समाधानासाठी नोकरी व्यवसायाचे ज्यू