NOSTALGIA- सुखद स्मरण रंजन -परीक्षण एकांकिकांचे -1
नॉस्टालजिया - एक आनंददायी सुखद स्मरण रंजन !
परीक्षण एकांकिकांचे
एकांकिकीकेत भाग घेतलेल्या-कर्मचाऱ्यांची नावे बदलली आहेत.
--पहिला दिवस-
अखिल भारतीय पातळीवरील संस्थेच्या आंतरअंचल एकांकीका स्पर्धांचआयोजन करण्याचे यजमानपद होत यावर्षी आमच्या क्षेत्रीय कार्यलयला कडे. 1993 च्या जानेवारीत या स्पर्धा कला मंदिरात यशस्वीरित्या पार पडल्या. एकूण दहा झोन पैकी नाशिक झोन वगळता, सर्व झोनचा सहभाग आणि विशेषत: दक्षिण झोनचा मराठी मध्ये एकांकिका सादर करण्याचा प्रयत्न नक्कीच उल्लेखनीय होता.
मराठी चित्रपट सॄष्टितील यशस्वी निर्माता- दिग्दर्शक -अभिनेते श्री महेश कोठारे यांच्या हस्ते व नशीबवान निर्माते व दिग्दर्शक श्री अरुण गोडबोले व क्षेत्रीय व्यवस्थाकांच्या उपस्थितीत एकांकीका स्पर्धांना सुरुवात झाली.
पहिल्या दिवशी दक्षिणझोनची "म्ह्या"; मुंबई झोनची " दे लिव्हड हॅपिली देअर आफ़्टर" व नागपूर झोन तर्फे " प्रेषितांची व्यंकटी सांडो" या क्रमाने स्पर्धेसाठी सादर केल्या गेल्या.
दक्षिण झोन बेंगलोरू संघाने सादर केलेल्या "म्ह्या" ह्या रमेश पवार लिखित एकांकिकेचा उल्लेख केवळ अमहाराष्ट्रीयनानी मराठी मध्ये सादर केलेली एकांकिका एवढ्या पुरताच पुरेसा आहे "म्ह्या"चे काम करणाऱ्या देवचकीनी घेतलेले काही पॉज तर विनोद विडंबना ऐवजी ग्राम पातळीवर गेले. अर्थातच भाषेची आंतरिक जाणीव नसल्याचा हा परिणाम असू शकेल. --मुंबई झोन तर्फे सादर झालेली एकांकिका विशेषता "म्ह्या"च्या पार्श्वभूमीवर फारच सफाईदार वाटली.मुळातून अनुभवी आणि जाणकार अभिनेते दिग्दर्शक व अभिनेत्री कलावंता कडून त्यांना मिळालेला उत्तम प्रतिसाद, यामुळे सर्वच प्रयोग अतिशय, सुटसुटीत, आकर्षक आणि लक्षवेधी झाला. साऱ्या प्रयोगाच्या सादरीकरणांमध्ये एक प्रकारचा प्रोफेशनल फायनेस जाणवत होता. एका नुकत्याच लग्न झालेल्या झोपडपट्टीतील कुष्ठरोगी जोडप्याची ही कथा. वास्तवाला विसरून, एका हाय सोसायटीच्या स्वप्नील जगात वावरत राहून ते आला दिवस सुखाचं करत/मानत ,जगतात, देवाचे आभार मानतात. पण वास्तवाच्या कारूण्याची झालर.बोच , त्या स्वप्नील जगात वावरताना दाखवण्यात दोघेही आणि विशेषत: बायकोच काम करणाऱ्या श्रीमती बन्सी कमी पडल्या. फक्त गाडी ओढतानाचा नवऱ्याच काम करणाऱ्या बोंद्रे यांचा मुद्राअभिनय, विशेषत: डोळे आणि आवाजाचे पट्टी या दाद देण्यासारख्या होत्या. श्रीमती बन्सींवरील भक्ती बर्वेंच्या पगडा विशेषत: त्यांच्या ओरडण्यातून चांगलाच जाणवत होता. एका संयत प्रस्तुती करणाच्या ऐवजी प्रसंगी ओव्हर अक्टींग मुळे,यातिल कारुण्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात प्रयोग यशस्वी ठरला नाही असे म्हणावे लागेल. कुष्ठरोगाबाबत सामाजिक मानसिकता ही काहीशी घृणा आणि करुणा अशा संमिश्र -संदिग्ध स्वरूपाचे असते. या विषयाबाबतचे असणारे समज, गैरसमज याचा या प्रस्तुतीकरणात कुठेच जाणीवपूर्वक विचार केला गेला नव्हता आणि म्हणूनच इतक्या व्यावसायिक सफाईने सादर केलेल्या या प्रयोगाला त्यावेळी जरी प्रेक्षकांची जोरदार दाद मिळाली असली तरी समीक्षकांच्या परीक्षेत मात्र तो उणा ठरला. कदाचित एकसमाविष्ट प्रयोगाचा चांगला आविष्कार म्हणून श्रीमती बन्सीना अभिनयाचे द्वितीय पारितोषिक देऊन गेला.
--नागपूर झोन कडून सादर केलेली एकांकिका "प्रेषितांची व्यंकटेश सांडो" विषय आणि आशयाच्या दृष्टीने खूपच चांगली होती. श्री भिडे यानी स्वतंत्ररीत्या लिहिलेल्या या एकांकिकेत; स्वतंत्र विचारसरणीचा, उत्तुंग वेध असणारा आणि तारूण्यातच मानवतेच्या सेवेची बांधिलकी स्वीकारून, स्वतंत्र विचाराने, संघटन आणि श्रमातून कुष्ठरोगी,वृध्द यांच्यासाठी करुणाश्रम काढणारा तरूण- आबा; स्वतःच्याच प्रतिमेतच गुंतून पडले आहेत; आणि मिळणाऱ्या मान, सन्मान, पुरस्कारात, मूळच्या स्वतःला विसरून चालले आहेत. त्यामुळे ते अधून मधून अस्वस्थही होतात. त्यांच्या या प्रतिमेचा फायदाही घेणारे नाथा सारखे लोक आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यावर होणाऱ्या टीकेमुळे ते अस्वस्थ होतात, किंबहुना त्याचा प्रतिवाद करण्या इतपत ते खाली उतरतात. यावेळी ज्या दादाजींच्या प्रेरणेने ते या कार्याला उद्युक्त झाले; ते दादाजी येतात.ते त्याना त्यांच्या मूळ प्र्कृतीची जाणीव करून देतात.
मुळात नाटकाचा विषय होऊ शकणाऱ्या या एकांकिकीकेत घटना अशा कांहीच नव्हत्या.आबांची भुमिका करणाऱ्यांच बेअरिंग चांगल होत.आणि त्याना अभिनयाच द्वितीय पारितोषिक देऊन परीक्षकानी त्याचे पोची दिली.तथापी प्रौढत्वाकडे झुकलेल्या आबानी पेपर वा पत्र वाचताना चष्मा लावला असता तर ते त्यांच्या व्यक्तिमत्वाला अधिक शोभल असत.इतर वेळी मात्र ते एकांकिकाभर चष्मा लवून वावरत होते.एकूण नऊ एकांकिका पैकी स्त्री पात्र अस्णाऱ्या फ़क्त तीनच होत्या,त्यातील एक म्हणजे "प्रेषितांची ---- "पण आबांच्या पत्नी- ताई इतक्या हळू बाई होत्या की आबांसारख्या व्यक्तिमत्वामुळे दबून गेलेल्या वा त्याना समर्थ साथ देणाऱ्या सहचारिणी ऐवजी चक्क रडूबाई वाटत होत्या.प्रयोगाच नेपथ्य नीटस होत आणि पत्र वाचत असताना त्यावर दादाजींची प्रतिमा प्रोजेक्ट करण्याची अभिनव कल्पना प्रेक्षक आणि परीक्षकांचीही दाद घेऊन गेली.अर्थातच प्रकाश योजनेच पहिल पारितोषिक नागपुरकराना मिळाल.
जयंत लीलावती रघुनाथ
Comments
Post a Comment