NOSTALGIA -सुखद स्मरण रंजन -परीक्षण एकांकिकांचे -2
नॉस्टालजिया - सुखद स्मरण रंजन -परीक्षण एकांकिकांचे
एकांकिकीकेत भाग घेतलेल्या-कर्मचाऱ्यांची नावे बदलली आहेत.
--दुसरा दिवस-
ठाणे विभागातर्फे "अनन्य"भोपाळ झोनची "रामलीला" व दिल्ली झोनची" किस्सा एक अजनबी लाशका" या क्रमाने सादर केल्या गेल्या.
- अपंग व मतिमंद मुलामुळे आई-वडिलांचा होणारा मानसिक कोंडमारा ; वाढलेल्या वयामुळे त्या अपंग मुलात निर्माण झालेली लैंगकतेची जाणिव त्यामुळे सतत धास्तावलेले दोघे. मुलाच्या या अवस्थेमुळे त्यांने रात्रपाळी घेतली. तिचा बॉस एक चांगला गृहस्थ. या साऱ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्याला एकच पर्याय दिसतो आणि तो म्हणजे अपंग मुलाचे अस्तित्व संपवणे.जन्मूनही न जन्मल्यासारख्या या मुलाभोवती फिरणाऱ्या या एकांकिकेच "अजन्म" हे शीषर्क समर्पक होते. श्री.पारस यानी अपंग मतिमंद मुलाचे काम छानच केले. संपूर्ण एकांकीके मध्ये त्यांनी कोठेही भूमिकेच बेअरिंग सोडलं नाही आणि संहितेचा जबर पाठींबा असणाऱ्या या पात्राच्या हालचालीतून आणि नजरेतून त्यांनी मतिमंदपणा प्रेक्षकापर्यंत पोचवला. त्यामुळे अर्थातच अभिनयाचे प्रथम परितोषिक श्री पारस याना मिळण क्रम प्राप्तच होत. आईच्या भूमिकेतील श्रीमती ज्योतींचा, आईचा कोंडमारा, नवऱ्याबद्दलची माया आणि प्रेम, मुलांमध्ये नव्याने निर्माण झालेल्या या भावनेमुळे वाटणारी भीती व मातृसुलभ वात्सल्यामुळे येणारा अगतिकपणा दाखवण्याचा प्रयत्न चांगला होता. त्यांचं दिसणं काहीस आकसलेल होतं, कदाचित भूमिकेच्या मागणीसाठी दिग्दर्शकानी त्याना तस सुचवलं असावं. बॉसच्या पिकनिकच्या आमंत्रणाला नकार दिल्यावर होय- नाही विचारात, काहीशा जिद्दी मूड्चे त्यानी चांगले अविष्कार दाखवले,.तसेच नवर्याला रजा काढायचा आग्रह करतानाचे त्यांचे विभ्रमही कौतुकास्पद.स्त्री पात्रांच्या स्पर्धेत त्याना अभिनयाच प्रथम पारितोषिक आपोआपच मिळालं.
वडिलांच्या भुमिकेतील श्री.संत साऱ्या प्रयोगात संकोचून वावरत होते.एकांकिकीकेतील पत्नीशी ते ज्या दुऱ्याव्याने वागत होते त्यामुळे मानसिक कोंडमाऱ्यामुळे कथेला पडलेला पीळ सैलावल्या सारखा वाटत होता.पती-पत्नी मधिल जवळिक दाखवण्यात तर सारा प्रयोगच कमी पडला. मुलाच्या मृत्यूमुळे, विशेषत: त्याला आपण अप्रत्यक्षपणे कारण झाल्याने कोसळून पडलेल्या पत्नीचे सांत्वन करतानाचा त्यांचा अभिनय प्रसंगाच सारं गांभीर्यच घालवूनन बसला. एकांकिकेचे दिग्दर्शन करणारे श्री प्रसाद बॉस झाले होते.बॉस म्हणून ते शोभले नाहितच, पण साऱ्या भोंगळ हालचालीतून,बेगडी अभिनयातून त्यांनी एका पूर्णपणे आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाची चेष्टाच केली;म्हणूनच या एकांकिकेच दिग्दर्शन त्यांचच होतं का असा प्रश्न पडावा.
- भोपाळ झोनने सध्या चालू असलेल्या मंदिर मस्जीत या ज्वलंत प्रश्नावर "रामलीला "ही एकांकिका सादर केली.समुह नाट्याच्या या प्रकारात व्यक्तिगत अभिनयाला कमी वाव असला, तरी टीमवर्कला फारच महत्त्व होते. आणि नमूद करायला काहींच हरकत नाही की याबाबतीत हा ग्रुप कोठेच कमी पडला नाही. उत्साहाने दरवर्षी "रामलीला" सादर करणाऱ्या एका मित्र मंडळींची ही कथा. मोलमजुरी करून आनंदात दिवस घालवणाऱ्या या कंपूत सर्वजण एका वेगळ्या आनंदासाठी "रामलीला" करण्यासाठी एकत्र येत असतात. अशा गोष्टींसाठी नेहमीचीच अडचण म्हणजे आर्थिक पाठबळ आणि या आर्थिक पाठबळा च्या हकिकतीतूनच एकांकिकेतील संघर्ष उभा राहतो.
-एकांकिका सुरू होते तेव्हा निवेदक राम कथेतला शुर्पपणखेच्या प्रवेशाचे नांदी करतो. आणि तिचे नाक कापले असल्याने ती हैराण हो़ऊन हैदोस घालायला सुरूवात करते.मग तिचे रावणाच्या दरबारात आगमन इत्यादी, अशी प्रयोगाची तालीम सुरू असते. रावणाच्या दरबारात बिभीषण हजर नाही, म्हणून त्याचा शोध सुरू होतो; तो कोणत्यातरी कारणामुळे मूलत: ’रामलिला’ च्या खेळासाठीच्या आर्थिक विवंचनेमुळे आलेला नसतो. आणि मग ’रामलीला’ चा प्रयोग कसा करायचा याबाबत चर्चेला सुरुवात होते.
प्रायोजक मिळाला तर किती बरे होईल या विचारात सर्व असतानाच ,सर्वांचा स्वयंसिद्ध गटनेता जाहीर करतो की एक शेटजी आपल्याला मदत करायला तयार आहेत. त्यांनी आपणा सर्वांना सकाळी भेटायला बोलावले आहे.या साऱ्या कंपू मध्ये असे तसे जमा झालेले सर्वां बरोबर ढोलकी वाजवणारे बडेमिंयाही असतात. त्यांची ढोलकी ही यांच्या रामलीला खेळाचे एक वैशिष्ट असते. शेटजी नाश्ता पाण्याबरोबर भत्ताही द्यायला तयार असतात . सर्वच मंडळी सुखावतात पण त्यांची अट असते ’ बडेमियांना’ खेळातून बाजूला करण्याची. ज्या खेळाची बडेमियांची ढोलकी ही जान आहे, अशा बुजुर्गाला वगळायची कल्पना सर्वांनाच अस्वथ्य करते.हा निर्णय त्यांच्या कानावरही घालायला कोणी तयार होत नाही. पण शेवटी मोहाचा विजय होतो. बडेमिंया बाहेर पडतात आणि ढोलकीवर डोके टेकून हुंदके दे़ऊन रडतात. ’रामलिला’ होणार असलेल्या जागेवर शेटजींचा डोळा असतो,आणि त्यातूनच त्यांनी बडे मियांना बाहेर काढायला भाग पाडलेले असते.
या कारणावरून ’सुलेमान’चे लोक व रामलीलाचे लोक यात संघर्ष पेटतो, त्यावेळी गटनेत्याच्या वडिलांना मारायला धावलेल्या सुलेमांनच्या लोकांपासून बडेमिंया त्यांना वाचवतात. सर्वांना झाल्या गोष्टीचा पश्चाताप होतो.बडेमिंया पुन्हा गटात सामिल होतात. आणि शेठजींच्या पाठिंब्याविना "रामलीला "जोरात करण्याचे ठरते.
हिंदीतून सादर केलेल्या या प्रयोगात, पात्रांच्या हालचाली व संवाद सफाईदार होतेच, पण पेटी, ढोलकीची रंगमंचावरील संगीत साथ दाद देण्या जोगी होती. सीमित वेळात या साऱ्या घटना मांडताना, नाट्याचा वेग कोठेही कमी पडला नाही. हिंदू मुस्लिम संघर्षाची झलक पेश करण्यात कोठेही भडकपणा येऊ दिला नसला, तरी सुलेमान आणि त्याचे साथिदार दाखवताना मात्र चक्क हिंदी चित्रपटाची छाप दिसत होती.गॉगल लावलेला सुलेमान पक्का मुसलमान दिसला तरी आवाजात एकदम कच्चा होता. आणि त्याचे साथिदार तर स्वतःवर खुश असल्या सारखे गळ्यात लाल रुमाल वगैरे बांधून चित्रपटातील बॉसच्या हुकमाची वाट पाहणाऱ्या स्मगलरच्या साथिदारा सारखे वाटत होते. बहुतेक सर्वांचा अभिनय सहज होता. तथापि आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो बडेमिंयांच काम करणाऱ्या श्री वर्मा यांचा. सर्व अंकात त्यांनी भूमिकेचा तोल कुठेही जा़ऊ दिला नाही. आवाज, चालणे, वागणे यातून त्यांनी बडेमिंया पूर्णपणे उभा केला. पारितोषिकांच्या रांगेत त्य त्यांचा क्रम लागायलाच हवा होता. श्री कांधेरे यांनी शेटजीची मगरुरी आणि मस्ती बोलण्या, वागण्यातून तर दाखवलीच पण दात चावण्याची व एक गाल हलवण्याच्या लकबेन त्यात भर घातली. श्री खेमकर यांचा रावण जबरदस्त दाद घेऊन गेला. मुळातून त्यांना दिलेलेले संवादही तसेच खणखणीत होते, आणि तेवढ्याच ठणठणीत आवाजात त्यांनी ते सादर केले. भरगच्च दाढी आणि दणकट शरीरयष्टीच्या श्री.खेमकरानी, प्रयोगाची चर्चा चालू असताना अथवा शेटजींच्या घरी सतत कोठेही पेंगणारा या रामलिलातला "रावण" आवाज देताच संहितेतील रावणाचा डायलॉग अकृत्रिमपणे टाकून दंगा उठवून दिला तसेच नंतर वाटणारी शरमही त्यानी तेवढी चांगली दाखवली. सर्व एकांकिकेत लक्षात राहिलेला "रावण" ला त्यामुळेच खास लोक आग्रहास्तव रावणाचा डायलॉग परत ऐकावायला लावला गेला. सामूहिक अभिनयाद्वारे सादर केलेल्या आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर आधारलेला या एकांकिकेला पहिला क्रमांक मिळाला आणि बरोबरीने दिग्दर्शन व संगिताचे ही प्रथम पारितोषिकही.
- दिल्ली झोन तर्फे "किस्सा एक अजनबी लाशका "ही एकांकिका सादर केली गेली. जमीन जुमला, पैसा अडका यातुन आयुष्य भराच उभं वैर पत्करलेल्या दोन सख्या जमीनदार भावांचं आणि त्यांच्या बगलबच्चांच, पर्यायाने माणसांच्या हव्यास आणि लोभ किती टोकाला जा़ऊ शकतो आणि त्यातून माणुसकीचा पुन्हा खून होत राहतो याच चित्रण या प्रयोगात होतं.
गावाच्या मध्ये एक रेष काढून दोन भाग केलेले असतात या सीमा रेषेवर एका अनोळखी माणसाचे कलेवर पडलेले असते. त्याचं काय करायचं यावरून भांडण सुरू होतं. एक नवखा माणूस या गावात येतो. आयुष्याला कंटाळलेल्या त्या श्रीमंत माणसाने आपल्या पश्चात त्याच्या मृतदेहावर यथावीत अंत्यसंस्कार करणाऱ्याला पाच लाख रुपये मिळतील असं पत्र आपल्या बॅगेत ठेवललं असतं. प्रथम बॅग सापडताच ते पत्र त्या मेलेल्या माणसाचा आहे असं समजून त्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी भांडण सुरू होते आणि त्यातून सौदेबाजी करता करता भांडण विकोपाला जात,पण जेव्हा कळतंय की हे पत्र त्या नवख्या प्रवाशाच आहे तेंव्हा सर्व वैर विसरून त्याची सामुहिक हत्या केली जाते. अनोळखी माणसाचे कलेवर तसेच पडलेल असत.जमीनदाराचा एक मुका नोकर आणि कडवट सत्य बोलणारा एक भडंग त्यावर अंत्यसंस्कार करावयाचे ठरवतात.
याही एकांकिकीकेत पात्रांची संख्या खूप असल्याने व्यक्तिगत अभिनयाला कमी वाव होता. मुक्याची भूमिका करणारे त्यांच्या छोट्या चणीमुळे लक्षात राहिले दोन जमीनदारांपैकी छोट्या जमीनदाराची भूमिका श्री.मोहित यांना शोभून दिसली. त्यांच्या साथिदारांच्या भुमिकेतील कलाकार बलदंड आणि मठ्ठ जाणवले..पण दोन्ही भावांच वैर आणि त्यांना साथ देणारे त्यांचे नोकर एकाच पट्टीत बोलत होते. त्यात भांडणाचा जोर किंवा वैराची द्वेषाची भावना ते कुठेच दाखवू शकले नाहीत. भडंग कनहया श्री. एस. भावी यांचे काम चांगलं झालं आणि त्यांनाअभिनयाच उत्तेजनपर पारितोषिकही मिळाल. मात्र ते दारू पिल्याचा अभिनय करत असल्यासारखे जाणवत होते. आणि शरीराराल इतके झोके देत होते की या अंगविक्षेपामुळे प्रसंगी त्यांची तोंडी असणारे संवाद जे चांगले होते ते दुर्लक्षीत झाले.
-नेपथ्य मात्र अगदिच बाळबोध होत.एका झाडाच्या चित्राच्या बाजूला दोन मंदिरे, त्यावर वेगळ्या रंगाचे झेंडे, रंगमंचावर त्यापुढे ठेवलेल्या बाकामुळे लाश झालेल्यांलाना निवांत झोपता आले. या गावात फूट पडली आहे आणि त्यासाठी मधेच एक रेष आखली आहे हे प्रेक्षकां पर्यंत पोचायला फ़ार कष्ट पडले.
जयंत लीलावती रघुनाथ
Comments
Post a Comment