RE VISITING THE WEDDING FRENZY-1पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन-१

 RE VISITING THE WEDDING FRENZY-1

पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन-१

३०/३५ वर्षांचा अनुभव आणि निरीक्षणातूनच साकारलेल्या या पूर्वीच्या ब्लॉगवरील् तीन लेखांच्या  अनुषंगाने,सद्य स्थितीचा विशेषत: कोविड पश्चात या लग्न समारंभ- विवाह सोहळ्यात आणि लग्न ठरवण्याच्या पद्धती इं’चा एक धावता आढावा घेतल्यावर कांही बदल झालेत का याचा शोध घेताना

जे जाणावल,दिसल वा पटल पण त्याचाच हा लेखा जोखा--

-पण तत्पूर्वी आता स्थिरावलेली आणि कांहीशी परंपरेत आणि कदाचित कांही वर्षानी रूढीतही रूपांतर होतील अशा कांही प्रातिनिधिनिक अनुभवाबद्दल प्रथम.

 -पुण्याजवळील उपनगरातील वातानुकुलीत अशी दोन भव्य संलग्न चकचकीत  दालनं .एकात समोर फ़ुलानी वगैरे सजवलेल उंच व्यासपीठ-मंच त्यावर चित्रपटातील लग्नासारखा सजवलेला सेट  उभा केलेला ,त्याच्या दोन्ही बाजुला खोल्यात जाण्याचे मार्ग . समोर  सुमारे १०००/१२०० लोक बसतील इतक्या खुर्च्या अशी आसन व्यवस्था.  मंचावर गुरुजी -कांही -पुजा विधी इत्याचीच्या सामानासह बसलेले. आसन व्यवस्थेत मधुन मोकळा मार्ग सोडलेला.जवळ जवळ सर्व खुर्च्या भरलेल्या.शेजारच्या दालनात खानपानाची व्यवस्था. तेथील पारंपारिक वेषातील सेवक -मुली नथीसह नउवारी शालूत तर तरूण आधुनिक वेषात,शुद्ध पाण्याच्या बाट्ल्या ,सरबत,ज्युस आणि वेगवेगळे स्नॅक्स -वाटत रांगामधुन फ़िरत आहेत.आणि या समारंभाच कारण आहे.

व्यावसाक संबंधानाने जवळ आलेल्या कुटुंबातील  परदेश वारी करून परतलेला तरुण मुलगा आणि तेथेच परदेशात त्याच्या प्रेमात पडलेली मुलगीही व्यवसाय संबंधातील. दोघांच्याही घरातून याना विरोध करायच कांहीच संयुक्तिक कारण नसल्याने -मुलं आता शहाणी झाली आहेत, तर आता अगोदर साखरपुडा तर करून टाकुयात.बर मंडळी नव श्रीमंत उतरंडीत वरच्या पायरीवर पोचलेली आणि उच्च पातळीकडे जाण्याच्या मार्गातील असल्याने साजेशा (त्यांच्या प्रतिष्ठेला [म्हणजे काय?]) समारंभ करण क्रमपात्रच .

मुख्य दालनातील लहान थोर -स्त्री पुरूष ,तरूण तरूणी,बालक -कन्या,प्रौढ-वयस्क,लांबून आलेले,जवळचे,नातलग,मित्र मैत्रीणी,सगे सोयरे,व्यावसायिक संबंधीत, ओळखी पाळखिचे,व्यवसाययातील कर्मचारी,शिवाय  आज काल कोणाचे तरी राजकीय पदावरील कोणातरी वजनदाराशी सबंध असतात किंवा ठेवावे लागतात -(व्यवसायाची अगतिगकता ?) त्यामुळे कांही कार्यकर्ते इं चा समुह -शीत पेयांचा ,स्नॅकचा आस्वाद घेत -आपाआपल्यात गप्पा मारत ,तर तेव्ह्ढ्यात कोणी ओळखिचा चेहरा दिसला तर हाय ! हेल्लो असा सारा माहोल .

मुख्य मंचावर गुरूजी बसलेले पण लक्ष द्यावस कांहीच घडत नव्हत.पडदा वर जाण्यापूर्वी जशी रंगमंचावर माणस एकडून तिकडे करत असतात तसे कांही चकचकीत कपड्यातील व,दागिन्यानी मढलेल्या व्यक्ती वावरत होत्या.

तोच एका बाजुने एकदम गाण्याचे आवाज यायला लागले ,सा़ऱ्यांच्या माना वळल्या -गाण्याच्या ठेक्याच्या तालावर नाचत नखशिकांत सुटातील -(सौ.का.)मुलगा व अत्यानुधिक खास संरचित(Designed)वेषातील (चि,सौ,का) मुलगी आणि मागून त्यांची मित्रमंडळी त्याच तालावर नाच करत मंचा कडे हळू हळू निघाली ‘हा सारा उत्सवी माहोल मंचाजवर गेला .मग दोघांची भॆट -मुलान मागणी कुठ,केंव्हा कधी  घातली आणि ती जागा -म्हणजे हा सॆट त्याच  नाट्य रूपांतर -सादर करून त्याला उजाळा दिला गेला.

मग काय ते मंत्र बित्र म्हणून अंगठी घालणे वगैरे नेहमीचा कार्यक्रम पार पडला,अंगठी घालण्याचा कार्यक्रमाच सर्वानी टाळ्या वाजवून जोरदार स्वागतपर अभिनंदन केल.

मग पुढच्या रांगेत बसवलेल्या अती महत्वाच्या ( आजी- आजोबा -काका काकी इ.इ.)व्यक्तींच्या पाया पडण्याच त्यांचे आशिर्वाद घेण्याच वगैरे सुरु असताना, मागील रांगेतील लोक हळूहळू पलिकडच्या दालनात जेथे भोजनाची व्यवस्था होती तिकडे सरकू लागले.

दोन्ही भावी विहीणी एक एक मदतनीस घेऊन ट्रॉलीवरून  रांगातून भेटवस्तु योग्य त्या मानकऱ्यांपर्यंत पोचवू लागल्या.विवाह अर्थातच निश्चिंत स्थळी -Destination Wedding  हे ओघनच आल.

-आइसक्रीमसह शक्य ते सर्व प्रकार -गोडाचा वेगळा स्टॉल,पंजाबी आगळा आणि आमटी भात -दही भात सुद्धा ,मंडळी तृप्त हो़ऊन आपल्या गाडीच्या चालकांना बोलावून निघत होती.समारंभाचे प्रमुख यजमान आणि यजमाणीन याना भेटून निरोप घेत होते -आणि आपल्याच घॊळक्यात दंग असलेल्या उत्सवी युगलाला  लांबूनच हात दाखवून रजा घेत होते.

परत विवाह्पूर्व फ़ोटो शूटींग,डेस्टीनेशन वेडिंग,अत्यंत महागडी निमंत्रण पत्रिका आणि त्या सोबत तशीच महागडी भेट (सोन्याच्या वर्खाची पत्रिका आणि सोन्याचीच भेटवस्तू शिवाय सोबत सुकामेवा,महागडी चॉकलेट इ.).

लग्नातील, कपडे आणि दागिने हे  डिझाइनर्स कडूनच हवेत.साऱ्या सह विवाह संपन्न झाला आणि तितक्याच धमाक्यात  डेस्टीनेशन वेडिंग ला हजर राहू न शकलेल्यांसाठी जोरदार स्वागत समारंभान याची सांगता.

आणि उच्च मध्य वर्गातील अशाच एका एंग्जेमेंटचा समारंभ थॊड्या फ़ार फ़रकान पण जरा कमी दिखाव्यात पण अस नाच आणि गाण -मध्यवर्गिय संस्कृतितील अजून त्याच संस्कारात गुर्फ़टलेले आणि मुलांच्या आग्रहापायी यात सामिल झालेले आईवडिल मागिल बाजुला कांहीसे संकोचून आनंद घेत उभे.बाकी सारा माहोल थॊड्या फ़ार फ़रकान व  विवाह समारंभही वरील सारखाच-

तर असे हे दोन प्रानिधिक अनुभव.

*

-आणि आता महाराष्ट्रात अगदी आपल्या लग्न विधी सारखा सामावून गेलेला -म्हणजे व्याही भोजन,सीमांत पूजन ,हळदी,मुहुर्त मेढ,-देवदेवक  ह्या सा़ऱ्या लग्ना आधीच्या विधी बरोबरच किंवा अधिकच म्हणजे ’मेंदी,संगीत-डीजे -नाच,हे सारे आता लग्न विधीचेच भाग झालेत.आर्थिक स्तर कोणताही असो हे सार आता जणू सक्तीच कंपल्सरी झालय. मुलगा आणि मुलगी दोघांची स्वतंत्र ब्रह्मचार्यांची -बॅचलर्स पार्टी-हा प्रकार -उच्च मध्यम वर्गात अजुन तितकासा रूळलेला दिसत नसला तरी  अती उच्च श्रीमंतांच्यात ही एक सहजची गोष्ट हो़ऊन राहीली आहे.

कोविडच्या साथीन सार समाजिक संबंधांच जगच ढवळून काढल.प्रत्यक्ष समोरा समोर भॆट-लग्नाचा गोतावळा,मित्रमंडळींच्या गटांच्या भेटी आणि सहली -संचारावरच बंधन –

           तर मग द ग्रेट  इंडियन फ़ॅट वेडिन्गच काय !

तंत्रज्ञानाने संपृक्त अशा नव्या पिढीने यातून मार्ग काढला नसता तर नवलच !

अंतरजालान तर आता सार हाताच्या बोटांवर आणून ठेवल आहे.आणि ही पिढी तर  तज्ञ तंत्रविशारद.मग सारच तंत्राच्या चौकटीत बसवून तो "द ग्रेट फ़ॅट इंडियन वेडिन्ग "चा सोहळा कसा करायचा त्याचे मार्ग त्यानी काढले.

या सर्वात दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे आमंत्रितांच्या संखेवर आलेल बंधन आणि त्यामुळे नकळत साजरा झालेला छोटासा घरगुती समारंभ-जेवणावळी सह इतर खर्चही कमीच .आता मग साऱ्या हौसेच  काय?

मग प्रत्यक्ष लग्न सोहळ्याच दृष्य प्रक्षेपण आणि शुभेच्छा व आशिर्वादही असेच वास्तविक आभासी.पण मंडळी कांही हार मानणारी नव्हती.त्यांमुळे याच पध्दतीने मग विवाह्पूर्व फ़ोटो शूटींग पार पडल.आणि छान सजवलेली आमंत्रण पत्रिकाही अशीच व्हॉट्सएपवर.पण एवढ्यान समाधान झाल तर कस चालेल.निमंत्रितानी आभासी दुकानातून  पाठवलेल्या खऱ्या भॆट वस्तुंची परत फ़ॆड तर करायला हवी.मनासारख्या भेट वस्तु देता याव्यात म्ह्णून कांहीनी तर  चक्क अंतरजालावर यासाठी स्वत:ची एक साईट्च उघडली.आता यात वेडिंग  प्लॅनिंगवाले मागे कसे राहणार, त्यानीही मग वेगवेगळ्या एप्स वरून आपला व्यवसाय चालू ठेवला.

यात कांही नवविवाहितांना आणि त्यांच्या आप्त-स्वकीयाना आणि ओळखिपाळखिवात्ल्याना लहानसा समारंभ ,सर्वांचा सहभाग-आणि नुसत्याच  उत्सवाच्या जागी एक घरगुती  सोहळ्याचा आनंदही घेता येतो व अवास्तव खर्च -टाळून सामाजिक बांधिलकी -इची जाणिव झाली असेल अशी आशा करायला हरकत नाही.

.कोविड संचारबंदीतून मूक्त झालेल्याना आता कसल्याच बंधनाची फ़िकिर नाही –

     पुन: ते "द ग्रेट फ़ॅट इंडियन वेडिन्ग" करायला मोकळॆ

मग डेस्टिनेशन वेडिंग, थीम वेडिंग( यातला एकच चांगला बदल म्हणजे पर्यावरण पूरक समारंभ) ,टेक वेडिंग वगैरे करायला मॊकळे.

 जयंत लीलावती रघुनाथ

 नम्र विनंती -वरील लेखावरील आपले मत-सूचना जरूर द्याव्यात

COMMENTS ARE MOST WELCOME

 

Comments

Popular posts from this blog

DESHPANDE DATTAMANDIR-KAGAL देशपांडे दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

MODERN ART -THOUGHT-FEATURES AND COMMENTARY-नव वा आधुनिककला –विचार ,वैशिष्टे आणि भाष्य

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 3