RE VISITING THE WEDDING FRENZY-2 पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन २

 

RE VISITING THE WEDDING FRENZY-2

पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन

मध्यमवर्गीय-निन्म श्रीमंत -ते नव श्रीमंत -उच्च श्रीमंत-अती उच्च श्रीमंत (त्या पलिकडचे  -म्हणजे राजकारणी,अभिनेते-खॆळाडू-उद्दोगपती-सेलेब्रीटी इ.इ.यांचे विवाह समारंभ-आपल्या विचारांच्या पलिकडचेच ) यात वर्गीय आणि जात-धर्म निहायही कांही अंतर राहिलेल नाही.साखरपुडा -लग्न समारंभ-विवाह सोहळा याच उत्सवी स्वरूप ही आता नित्याची गोष्ट हो़ऊन राहिली आहे.मोहमयी-आकर्षक-आणि चंगळवादाला -संस्कार -धार्मिक- कर्म -कांड इइचा तडका मारून आता ही रूढी हॊण्याचा मार्गावर आहे.

अशा आता स्थिरावलेल्या पद्धतीत  आणि या सा़ऱ्यासह आणि जाणून बूजून कांही बदल करून साजऱ्या केलेल्या विवाह सोहळ्यात जाणवलेल्या कांही सुखद,दिलासादयक बदलांची मुद्दाम -खास जाणिपूर्वक नोंद घ्यावीशी वाटली ती मांडावीशीही वाटली.

तर यात मला नोंद घ्यावस वाटल ते अस-

जाणिव पूर्वक वाढलेला-नवऱ्यामुलीचा-वधुचा-स्त्रीयांचा समान हक्काच आग्रह्पूर्वक उपयोजन.आणि यातून कळत न कळत ल्ग्नाची सूत्रे स्त्रीच्या हातात गेल्याने हे बदल ( डामडौली उत्सवी समारंभाची कांही जणांची/जणींची हौस वगळता) नक्कीच स्वागतार्ह्य.

१.विवाहाच्या आंमंत्रण पत्रिके पासून ते लग्नात करावयाचे विधी-समारंभा पर्यंतची  प्रत्येक गोष्ट दोघांनी मिळून आणि एकमेकाच्या संमतीनेच,

२. वर आणि वधू-नवरा -नवरी -असा पक्ष भेद भाव  न ठेवता -तो प्रत्यक्ष आचरणात आणण्या साठी -म्हणजेच वधु वा तिचे आई वडिल-नातेवाईक यांच दुय्यम स्थान दर्शवणारे-कन्या दान -वरदक्षिणा, सिंदूर,बारात-आणि बिदाइ सुद्धा इ.सारख्या श्रेष्ठ-कनिष्ठता अधोरेखित करणाऱ्या रूढीना  तिलांजली,

३.लग्नाचा खर्च मुलीने स्वत: करणे-पालकाना तोशीस   न देणे.

४. विवाह विधींसाठी स्त्री-पुरोहितांचाच आग्रह.

५.प्राण्यांप्रती सहानुभुती म्हणून घोड्यांवरून बारात प्रथेला नकार.

६.अवास्तव आर्थिक खर्चाला आवर.

७.१००० लोकांच्या आगत स्वागताऐवजी -मोजक्याच लोकांची उपस्थिति-आयुष्यातील हा प्रसंग संस्मरणीय आणि अर्थपूर्ण करण याला प्राथमिकता.

८.वरातीपासून ते प्रतेक प्रसंगी वर-वधू आणि त्यांचे नातेवाईक एकत्र.अगदी हळदी आणि मेंदीही एकत्र.आणि  स्त्री-पुरूषातील समनता दृढ करणारे मंत्रोचारण विधीच फ़क्त.

आणि आणखी एक आशदायक बातमी.

एका वधूवर सूचक मंडळाने घेतलेल्या सर्वेक्षणात नुसार

५५% लोकानी-(विवाहोत्सुक मुली-मुलानी) घरगुती-कौटुंबिक विवाह सोहळा साजरा करण्याकडे कल नोंदवला-कारण-

आटोपशीर समारंभ, कुटुंबीय ,जवळचे सगे सोयरे आणि जिव्हाळयाचे मित्र परिवारांच्या उपस्थितीत-मर्यादित आर्थिक खर्च आणि सर्वांच्याच सह्भागामुळे एक छान आनंदी कौटुंबिक सोहळा साजरा करता येतो.

कांहीनी तर नोंदणी विवाह करून -नंतर छानसा स्वागत समारंभ केला.

**

तर २७% लोकानी मात्र ’ द ग्रेट  इंडियन फ़ॅट वेडिन्गच"करण्याकडॆ कौल दिला.

आणि त्यामुळे लग्नाच्या बाजारात -म्हणजे या उद्द्योगात नवीन नवीन प्रथा -पद्धती यायला लागल्या आहेत -येत आहेत -आणत आहेत.

कोट्यावधी रूपयांच्या उलाढाली असलेल्या या बाजारात -त्यामुळेच नव्हाळ्यांच्या -फ़ॅशनच्या चकचकीत -मासिकांची चलती आहे(सुमारे १०० च्या आस पास केवळ वेडिंग या नावाने अशी वेगवेगळ्या भाषेतील मासिके).मोठे मोठे हॉल आहेत,नव नवीन रेसॉर्टस उभी राहत आहेत.समारंभाचे व्यावसायिक आयोजक नवीन नवीन कल्पना आणि क्लुत्या काढत आहेत.आणि या मोहात  कळत मध्यम वर्गही गुंतत चाललाय.

दुनिया झुकती है।झुकानेवाला चाहिये।

च्या या  झगमगाटी जगात

महागाई,शेतकऱ्यांच्या आत्महत्या,बेकार तरूणांची जगण्यासाठी चाललेली तगमग-धडपद,,दलित आणि स्त्रीयांच्यावरचे अत्याचार,कुपोषित बालके,-दारिद्रा, शिक्षणापासून वंचित राहीलेले.आरोग्याच्या आणि दळण वळणासारख्या मूलभूत सुविधानाही दुरावलेले,वाया जाणारे अन्न आणि कमलीची पर्यावरण हानी(जल,वायू,ध्वनी [आणि -मानसिक}प्रदुषण )  इ.इ बद्दलची थोडी तरी जाणिव होइल का?

भारत अपराध नोंद संस्थेच्या पाहणी-व नोंदणी -नुसार २०२१-२२ मधे देशात रोज १९ हुंडाबळी जात होते -जातात.याचीही काही दखल घेतिली जाइल  का?

 जयंत लीलावती रघुनाथ

नम्र विनंती -वरील लेखावरील आपले मत-सूचना जरूर द्याव्यात

COMMENTS ARE MOST WELCOME

 

Comments

Popular posts from this blog

DESHPANDE DATTAMANDIR-KAGAL देशपांडे दत्तमंदिर ( कागल –जि.कोल्हापूर )

HUMBLE SALUTATION -REMEMBRANCE -विनम्र अभिवादन -

MODERN ART -THOUGHT-FEATURES AND COMMENTARY-नव वा आधुनिककला –विचार ,वैशिष्टे आणि भाष्य

WEDDING -A FRENZIED CELEBRATION ! विवाह -सोहळा- लग्न समारंभ –एक उन्मादी उत्सव ! 3