SCHAPIRO-SHAPIRO,MIRIAM-शापिरो,मिरियाम
शापिरो,मिरियाम (Schapiro-Shapiro,Miriam)
चित्रकार,शिल्पकार,मुद्राचित्रकार व फ़ेमागिस्ट"femmagist",कट्टर स्त्रीवादी व प्रकॄती(स्त्री)कलेच्या प्रवक्त्या,स्त्रीकला इतिहासकार व २० व्या शतकातील एक महत्त्वाची स्त्री चित्र_कलाकार.
ठळक,ठाशीव,करकरीत,भॊमित्तीक आकार रंगवणारी चित्रकार म्हणून कारकिर्दीच्या सुरवातीलाच मिरियामना यश मिळाले व दूसऱ्या पिढीतील अमूर्तवादी भावचित्रकर्ती Abstract Expressionist म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या होत्या.त्यांचे आपल्या रचनातून स्वतंत्र शैलीत प्रयोग करणे चालूच होते.यातून त्यानी १९६२ च्या सुमारास प्रारंभीच्या रचनाहून पूर्णपणे वेगळी अशी Shrine Paintings करायला सुरवात केली.कमानी सारख्या अर्धागोलात ;ऎनाचा तुकडा,प्रतिकात्मक प्रकॄतितत्व(स्त्रीतत्व) आणि एखाद्या महान नामवंत प्रसिद्ध कलाकॄतीचा अंश यांच्या संरचनातून ही श्राइन पेन्टीग्ज रचलेली असत.१९७० ला त्या स्त्री-मुक्ती चळवळीकडे ओढल्या गेल्य़ा.यातून त्यानी स्वत:च्या लैंगिक अनुभवार आधारीत अशीही कांही चित्रे रंगवली आहेत.संगणक हे माध्यम त्याना सॄजनशील व सक्षम वाटले आणि अमूर्त संचित्रणासाठी त्यानी त्याचा सढळ वापरही केला.
कॅलिफ़ोरनिया विद्यापिठातील शात्रज्ञ प्राध्यापक नेलिबॉफ़ यानी मिरियाम याना चित्रकले साठी एक संगणकिय प्रोग्राम करून दिला.यातूनच त्यांच सर्वात सुप्रतिष्टीत -आयकॉनिक "बिग ऑक्स " (१९६८)चित्रकृती साकरली आहे.यातील "vitruvian man" चे व्यास म्हणजे त्याच्या भुजा तर मधला गोल-म्हणजे स्त्रीचा मध्य -योनी वा गर्भाशय.झगझगीत नारिंगी रंगातील हे चित्र म्हणजे स्त्रीशक्ती आणि स्त्रीत्वाच्या पुरातन प्रतिकाची नव्याने कायिक भाषेत मांडलेल नाममुद्रा म्हटल तर वावग ठरू नये.कांहींच्या मते यातील गोल हा स्वागतशील हातातील स्त्री बीजाच प्रतिक-मात्रृत्वाचे गवाक्ष वाटते.
चार दशकाच्या कलेच्या क्षेत्रातील मरिउम यांचा संचारात त्यानी अमूर्त ,मिनिम्यालिजम,संगणक ग्रफ़िक कला,आणि अर्थातच स्त्रीवादी कला हातळल्या.कोलाज,छपाईतंत्र,चित्रकारी आणि स्त्री-वादी फ़ेमेज.
या बरोबरीने गत कालातील स्त्री चित्रकाराना मानवंदना म्हणून त्यानी मारी कासेट ,फ़्रिडा काहलो यांच्या चित्रांच्या झेराक्स वापरून त्यावर नवी चित्रे काढली तर,काह्लोची प्रतिमा आपल्या स्वचित्रांवर रेखाटली.आपल्या रशियन ज्यु वांशीक मूळाना जोडून घेत त्यानी रशियन "आवंत गाद" स्त्रीयांना आपल्या चित्रांचा विषय केला.अमूर्त चित्रशैलीतील चित्रे काढण्याच्या काळातही त्या अमूर्त चित्रशैलीवाल्या चित्रकारांच्या आड्ड्यात सामिल नव्ह्त्या.
पारंपारीक महिला , विशेषत: गृहिणींची कला, जशा विणकाम-गृह सजावट सारख्या कलाना चित्रकलेचा मूळ प्रवाहात आणण्याचे श्रेय शापिरो यान जातं. स्त्रीयांच्या- स्त्रीत्वाचा प्रतिक वा स्त्रीपणाचा रूपक या अर्थाने त्यानी हात-पंखाचा वापर आपल्या कलाकारित मुक्त पणे केला -सांस्कृतिक आणि ऐत्याहासिक मर्यादानी सीमित नसलेल अस हे हात-पंखयाचे प्र्तिक त्यांच्या स्त्रीवादाला समर्पक म्हणूनच त्यानी निवडलं असाव.
१९९० पासून त्यांनी आपल्या चित्रांतून ज्यु वंशाची ओळ्ख ठळक करायच्या प्रयत्नाना सूरूवात केलेली दिसते. "माझा इतिहास" या प्रकल्पा(१९९७) अंतर्गत त्यांनी फ़्लेमेग प्रकल्पा प्रमाणेच खोल्याचीं मांडणी ज्यु वारसाच्या आठवणींभोवती गुंफली.ज्युंशी संबंधीत -ज्युंची ओळख खणखणीत पणे व्यक्त करणारी त्यांची कलाकृती "चार कुटुंबकर्त्या"(Four Matrichs). यात खिडकीच्या रंगीत काचांवर बायबल मधिल ’सराह’, ’रेबेक्का’,रशेल’ व ’ली’या नायिकांची चित्रण केल आहे.. आपल्या रशियन ज्यु वंशाची आठव्ण म्हणून त्यानी आपल्या आवडत्या ’हात-पंख्या"च्या एकेका अऱ्यांवर रशियातील दृष्टी आडच्या प्रभावी स्त्रीयांच हॅट आणि बुरखा घेतलेल्या अशा पेहरावात चित्रित केल्या आणि प्रतेकीच्या कलाकृतील कांही अंश घेऊन आपल्या सहयोगी शैलिेतून त्यांची प्रशंसाही केली.
ज्युडी शिकॅगो आणि त्यांच्या कॅलिफ़ोर्निया इन्स्टिट्यूट ओफ़ द आर्ट्स च्या फ़ेमिनिसट आर्ट प्रोग्रॅम मधिल २१ विद्यार्थिनींच्या मद्तीने १९७२ मधे साकरलेल्या ’व्युमन हा़ऊस ’च्या रचनेने मारियांच्या कडॆ लक्ष वेधल गेल
स्त्री कलावंताना आपली कला आणि कौशल्य दाखवण्याची संधी ’वूमन हॉउस ’ या प्रकल्पांतर्गत मिळाली.यात मिरियाम यानी भाग घेतला होता व स्त्रीयांच्या(बाईच्या)जीवनातील एक एक वस्तू आणि त्याच्याशी जडलेले तिचे भावविश्व प्रतीक रूपात खोल्यांत मांडून ’बाहूली घर’ साकारले होते.
दी कॅलिफ़ोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ़ दी आर्ट्स,वॅलेन्सीया,कॅलिफ़ोर्निया येथे सह-संचालक ज्यूडी शिकॅगो यांच्यासह ’स्त्रीवादी कला’या विषयाच्या शिक्षणक्रमाच्या पहिल्याच वर्षी त्यानी एक प्रकल्प राबविला.या प्रक्लपांतर्गत एका जुन्या घराची सर्व अंतर्गत रचना आपल्या स्वप्नांतील फ़ॅंटसी- अदभूत स्वप्ना प्रमाणॆ करायाला मोकळीक देवून विद्यार्थ्याना (मुलीना) एक परिपूर्ण ’फ़ेमिनाइन’ वास्तू उभी करायला प्रोत्साहन दीले.या वास्तूचे नूतनीकरण केल्यावर तेथे त्यानी स्त्रीयांच्या प्रश्नांचा उहापोह करणाऱ्या,स्त्री आणि तिचे जग मध्यवर्ती ठेवून कलाकॄती व रचना सादर करून कला जगतात ’स्त्री’प्रतिमा उंचावली.या प्रकल्पा नंतर मिरियम यानी हातरुमाल,लेस , कापडाचे वा इतर धागे,सूत यांच्यातून स्त्री-स्वातंत्र्यावर भाष्य करणाऱ्या रुपकात्मक रचना सादर केल्या.१९७० च्या दशकातील ’नक्षिकाम व प्रारूपरचना ’चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्त्या असणाऱ्या मिरियम यानी आपल्या रचनात पेहराव,पोषाख,कपडेलत्ते आणि त्यावरील दिमाखदार नक्षी यांचा वापर केला.युरोपीइन कापडावरील पारंपारीक नक्षिकामाच्या कलेला भारतीय,चीनी,इस्लामीक आणि मेक्सिकन संस्कॄती तील कापड व नक्षी वापरून आव्हान दिले.
मिरियाम यानी कलाकुसर,भरतकाम,शिवण-टिप्पण अशा पारंपारीक खास स्त्रीयांच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कलाना नवी झळाळी दिली.लोकरीच्यालडी,बटने,बिंदी,चमकी,टिकल्या,सूताच्या गुंड्या,ज्यूट तरट,कापड व टॅफ़ेटा या सारख्या चार भिंतींच्या आतच दडलेल्या घरगूती वस्तू वापरून ’कोलाज़’ ची रचना केली.या रचनेला त्यानी ’फ़ेमेज’'Femmage' हे नाव दिले.’गृहिणीला’तिच्या कोषातून,बाहेर काढण्याचा,तिचा दबलेला,दडपलेला,ढळलेला आत्मविश्वास आपल्या चित्रकलेतून,रचनातून पुन्हा मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असतो अस त्या म्हणत.स्त्रीयाना जागे करून ,त्याना आत्मबल देण्यासाठी घरगूती वातावरणातून बाहेर आणण्यासाठी,त्यानी देशभर प्रवास केला,महिला आधार गट स्थापन केले.या त्यांच्या कामामूळे त्याना ’मिनी ऍपल सीड’ (a metaphor the hidden potentioal that exists within us all ,waiting to be nutured and brought in to life एक रूपक आपल्यात लपलेल्या क्षमातांना योग्य ते संधी मिळून त्या समोर येण्याची शक्यता असणारं ) हे नाव मिळाले.
’फ़ेमेज’'Femmage' म्हणजे स्त्री श्रमांतून -स्त्री मजूरानी हातानी विणलेल्या कलाकॄती (कोलाज) उदा.भरतकाम,कापडावरील विणकाम,गोधड्या वगैरे,जे ऊच्चभ्रू ’कोलाज’च्या खांद्याला खांदा लावून उभे राहून त्याला आवाहनही देते.स्त्री कलाकाराना - स्त्री चित्रकाराना- स्त्री कलावंताना कला जगातात सन्मानाच स्थान मिळाव आणि कलेच्या इतिहासात त्यांची समयोचीत नोंद व्हावी या साठी त्या सतत प्रयत्नशील असत.मिरियम शापिरो यानी आपली कला साधना ,स्त्री स्वातंत्र्य-स्त्री मुक्तीच्या ध्येयाशी घट्ट बांधली होती. त्या कट्टर ,हाडाच्या स्त्रीवादी होत्या.कलेच्या क्षेत्रातील किंबहूना एकंदरीतच पुरूषसत्ताक जगात स्त्रीची प्रतिष्ठा,ओळख प्रस्थापीत करण्यासाठी त्या निरंतर प्रयत्नशील राहील्या .
**
शापिरो,मिरियाम (Schapiro,Miriam) जन्म.१९२३ टोरोंटो,कॅनडा.मृत्यू -२०१५ न्युयॉर्क -अमेरिका
अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या रशियन -ज्यू पालकांची एकूलती एक लेक ,वडिल टेओदर शॅपिरो हे औद्योगिक यंत्र संरचनाकार ,विचारवंत हे मिरीयामचे आदर्श आणि गुरु तर आई फ़ॅनी कोहेन गृहिणी व झिओनिश्ट, त्यानी कलेच्या क्षेत्रात नाव करणासाठी मरियाम याना प्रोत्साहन दिल.मिरियामनी ६ व्या वर्षापासूनच चित्र काढायला सुरूवात केली होती.मारियाम यांचे आजोबा डोळे हलवणाऱ्या बाहुल्यांचे प्रणेते व नंतर ते टेडी बिअर च्या निर्मितित उतरले.इतर भारत ,अफ़्रिका इ. देशांप्रमाणे अमेरिकेत बाहुल्यांचा विचार केला जात नाही असा त्यांचा आक्षेप होत.मरियाम यानी आपल्या कलाकृतित बाहुल्यांचा (कटऑ़उट वा मासिकातील चित्रे द्वारा वापर केला. कॅनडात जन्मलेल्या मिरियाम शापिरोयांच्या कारकिर्दीला वळण मिळाल ते अमेरिकेत,न्यूयॉर्क येथे.माध्यमिक शाळेत असतानाच त्यानी न्यूयॉर्क मधील म्यूझियम ऑफ़ मॉडर्न आर्ट व फ़ेडरल आर्ट प्रोजेक्ट येथे कला अभ्यासाला सूरवात केली होती.त्यानी दि स्टेट आयोवा विद्यापिठातून १९४५ ला बी.ए.,१९४६ ला एम.ए. व १९४९ साली एम.फ़.ए.पूर्ण केल.
आय़़ओवा विद्द्यापिठात अभ्यास करत असतानाच पॉल ब्राश या चित्रकारांशी त्यांचा परिचय झाला आणि १९४६ मध्ये ही दोघे विवाह्बद्ध झाली. १९४९ मधे पदवी प्राप्त झाल्यावर ब्राश यांची मिसुरी विद्या पिठात पेंटींग इन्स्ट्रक्टर या पदावर नेमणूक झाली. मात्र मरियाम याना कोणतेच पद मिळाले नाही.१९५१ साली हे दांपत्य न्युयॉर्कला आले.येथे ते न्युयॉर्क कला शिक्षण संस्थेतेतील अमूर्त व्यक्ती चित्रशैलीच्या चित्रकारांच्या संपर्कात आले. स्वचा शोध,चित्रकार म्हणून आपल काय स्थान व आपली ओळख शोधण्याच्या धडपडीतून त्यानी सतत आपले स्ट्युदिओ बदलले. हा संघर्ष व भोवतालचा परिसर त्यांच्या कलेत प्रतीबिंबित झाला व हा प्रवास त्यांच्या जीवनाला आणि कलेलाही वळण देणारा ठरला.
"स्त्री’यांच्या कलेतील क्रांती(Women Art Revolution) या २०१० च्या चित्रपटासाठी त्यांची मुलाखात घेण्यात आली होती.
मिरियम शापिरो, याना अनेक मान सन्मान मिळाले ते असे आहेत The National Endowment for the Arts Fellowship, the Ford Foundation Grant, the John Simon Guggenheim Memorial Foundation Fellowship, the Skowhegan Medal for Collage and the Rockefeller Foundation Grant for Artist's Residency at the Bellagio Study and Conference Center in Italy.शिवाय नॅशनल असोसिएशन ऑफ़ स्कूल्स ऑफ़ आर्ट,नॅशनल वूमेन्स कॉकस फ़ॉर आर्ट यानी त्याना सन्मानीत केल आहे.त्याना the College Art Association, the Harrison-Hooks Artist , the Polk Museum of Art, Lakeland Florida.यानी जीवनगौरव पुरस्कारानी सन्मानीत केले आहे.जानेवारी २००६ मधे Rutgers University येथे Miriam Schapiro Archives for Women Artists ची स्थापना करण्यात आली.मार्च २००६ मधे त्याना व्यूमेन्स स्टूडिओ सेंटर,न्यूयॉर्क कडून दी एलान अवार्ड देण्यात आले.
त्यांच्या कलाकृती अमेरिका,युरोप,ऑस्ट्रेलीया व इस्राइल मधील कित्येक प्रसिद्ध नामवंत कला संग्रहलायात आहेत.
मिरियम शापिरो यांच २०१५ मधे वृधापकाळाने न्यूयॉर्क येथे निधन झाले.
जयंत लीलावती रघुनाथ
Comments
Post a Comment