RE VISITING THE WEDDING FRENZY-2 पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन २
RE VISITING THE WEDDING FRENZY-2 पुनश्च विवाह समारंभ -एक उन्मादी सोहळा : पुनरावलोकन मध्यमवर्गीय-निन्म श्रीमंत -ते नव श्रीमंत -उच्च श्रीमंत-अती उच्च श्रीमंत (त्या पलिकडचे -म्हणजे राजकारणी , अभिनेते-खॆळाडू-उद्दोगपती-सेलेब्रीटी इ.इ.यांचे विवाह समारंभ-आपल्या विचारांच्या पलिकडचेच ) यात वर्गीय आणि जात-धर्म निहायही कांही अंतर राहिलेल नाही.साखरपुडा -लग्न समारंभ-विवाह सोहळा याच उत्सवी स्वरूप ही आता नित्याची गोष्ट हो़ऊन राहिली आहे.मोहमयी-आकर्षक-आणि चंगळवादाला -संस्कार -धार्मिक- कर्म -कांड इइचा तडका मारून आता ही रूढी हॊण्याचा मार्गावर आहे. अशा आता स्थिरावलेल्या पद्धतीत आणि या सा़ऱ्यासह आणि जाणून बूजून कांही बदल करून साजऱ्या केलेल्या विवाह सोहळ्यात जाणवलेल्या कांही सुखद , दिलासादयक बदलांची मुद्दाम -खास जाणिपूर्वक नोंद घ्यावीशी वाटली ती मांडावीशीही वाटली. तर यात मला नोंद घ्यावस वाटल ते अस- जाणिव पूर्वक वाढलेला-नवऱ्यामुलीचा-वधुचा-स्त्रीयांचा समान हक्काच आग्रह्पूर्वक उपयोजन.आणि यातून कळत न कळत ल्ग्नाची सूत्रे स्त्रीच्या हातात गेल्याने हे बदल ( डामडौली उत्सवी समारंभाच...